AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पसरले थेट या देशाकडे हात, पाकिस्तानला दिली जोरदार लाथ, मोठी खळबळ..

इराण आणि अमेरिका युद्धाला दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच आता पाकिस्तानला तोंडावर पडण्याची वेळ आली. अमेरिकेने यादरम्यान अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पसरले थेट या देशाकडे हात, पाकिस्तानला दिली जोरदार लाथ, मोठी खळबळ..
Donald Trump
| Updated on: May 10, 2026 | 1:11 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तान मध्यस्थीच्या भूमिकेत आहे. मात्र, पाकिस्तानच्या मध्यस्थीला यश मिळत नाही. युद्धविराम होण्याऐवजी परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. होर्मुज खाडीत इराण आणि अमेरिका दोन्ही देश माघार घेत नाहीत. पाकिस्तान फक्त आणि फक्त आपल्या फायद्यासाठी पुढाकार घेत आहे. दोन महिन्यांपेक्षाही अधिक काळ या युद्धाला होत आहे. मात्र, युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अॅक्सिऑसच्या अहवालानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी मोठे पाऊल उचलले. पाकिस्तानला बाजूला सारून मार्को रुबियो आणि व्हाईट हाऊसचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी शनिवारी मियामी येथे कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली. पाकिस्तानला मोठा हा धक्काच आहे. कतारही युद्धात मध्यस्थी करण्याकरिता मैदानात उतरला आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम फक्त तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही. त्याचा परिणाम जगावर होत आहे. युद्धविरामासाठी वाटाघाटी सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कतारची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कतार सुरूवातीपासूनच पडद्यामागून भूमिका बजावत असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तान फक्त जगाला आम्ही युद्ध थांबवत आहेत, हे दाखवत आहे.

दुसरीकडे यादरम्यानच पाकिस्तानचे तेलवाहू जहाज कतारच्या दिशेने निघाले आहे. कतारकडून एलपीजी गॅस घेण्यासाठी हे जहाज कतारकडे निघाले. कतारच्या पंतप्रधानांनी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींची भेट घेतली आणि त्यानंतर थेट मियामीला प्रवास केला. तिथे त्यांनी सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांशीही चर्चा केली. कतारच्या मध्यस्थीला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याकरिता कतारकडे मदत मागितल्याचे सांगितले जाते.

अमेरिका अजूनही इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. तणाव कमी करण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर कराराच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी दोन्ही बाजूंवर दबाव टाकला जात आहे. पाकिस्तानची मध्यस्थी सुरूवातीपासूनच इस्त्रायलला मान्य नव्हती. त्यामध्येच इराणकडूनही पाकिस्तानच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला. आता कतारला नक्की किती यश मिळते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?