भारत अमेरिकेची ट्रेड डिल संकटात, भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारी, व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याचे..

H-1B Visa Chasing Rules : H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल करण्यात आला असून त्यामुळे भारतीय नागरिक अडचणीत सापडली आहेत. शिवाय यामुळे आता परत भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणले आहेत. याचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावरही पडलाय.

भारत अमेरिकेची ट्रेड डिल संकटात, भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारी, व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याचे..
H 1B visa
| Updated on: Sep 21, 2025 | 9:16 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा US ट्रेड डिलवर संकट आल्याचे बघायला मिळत आहे. यापूर्वीच टॅरिफच्या मुद्द्यामुळे भारत आणि अमेरिकेत तणाव बघायला मिळाला. त्यानंतर आता परत एकदा H-1B व्हिसाच्या बदललेल्या नियमामुळे US ट्रेड डिल संकटात सापडली. डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसावर मोठे शुल्क लावले असून 88 लाख रूपये H-1B व्हिसा मिळवण्यासाठी मोजावी लागणार आहेत. यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न अनेकांचे स्वप्न राहू शकते. 88 लाख रूपये शुल्क देऊन H-1B व्हिसा मिळून अमेरिकेत नोकरीसाठी गेल्यावर नोकरी मिळेल, याचीही गॅरंटी नाही. शिवाय एखादी कंपनी 88 लाख रूपये खर्च दुसऱ्या देशातून कर्मचाऱ्याला अमेरिकेत बोलवणेही टाळेलच.

अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील व्यापार चर्चा बंद होती. मात्र, अमेरिकेने पुढाकार घेऊन परत व्यापार चर्चा करण्यासाठी आग्रह धरला. शिवाय अमेरिकेच्या H-1B US ट्रेड टीमने भारतावर गंभीर आरोप करत म्हटले की, भारताकडून आमच्यासोबत व्यवस्थित व्यवहार केला जात नाही. शिवाय त्यांच्याकडून व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाहीये. अमेरिकेचे काही अधिकारी महत्वाचे करार करण्यासाठी भारतात आले.

काही सकारात्मक गोष्टी घडण्याचे संकेत असतानाच H-1B व्हिसाच्या नियमात बदल करून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा धक्का हा भारताला दिला आहे. कारण अमेरिकेत H-1B व्हिसावर सर्वाधिक नोकऱ्या हे भारतीय नागरिकच करतात. त्यांना या नियमाचा फटका बसू शकतो. परत एकदा हे सिद्ध झाले की, अमेरिकेकडून भारताला कोंडीत पकडण्यासाठीच हा व्हिसाबद्दल धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे.

आता याचा परिणाम हा थेट दोन्ही देशांच्या व्यापारावर होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा दोन्ही देशातील व्यापार चर्चा बंद होण्याचे मोठे संकेत आहेत. भारत आता यामधून कसा मार्ग काढतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प हे भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत असल्याचे सांगताना दिसतात. हेच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.