भारतीय ज्याची वाट बघत होते ते झालेच, अमेरिकेतून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, थेट आदेशावर सही, 25 टक्के…

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात बघायला मिळत आहेत. आता भारतासाठी अमेरिकेतून मोठी आणि महत्वाची बातमी पुढे येताना दिसत आहे. विशेष म्हणजे या बातमीची प्रत्येक भारतीय वाट पाहत होता.

भारतीय ज्याची वाट बघत होते ते झालेच, अमेरिकेतून भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी, थेट आदेशावर सही, 25 टक्के...
Donald Trump
| Updated on: Feb 07, 2026 | 8:12 AM

मागील काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात बघायला मिळाली. अमेरिका भारतावर गंभीर आरोप करताना दिसली. फक्त आरोपच नाही तर थेट रशियाचे कपडे धुण्याचे मशिनही भारताला म्हणण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लावला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर अतिरिक्त 25 टक्के आणि मुळ टॅरिफ 25 टक्के लावण्यात आला. अमेरिकेने लावलेल्या या टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत होणारी निर्णयात जवळपास बंद झाली. मात्र, यादरम्यान भारताने यामधून मार्ग काढत नुकसान टाळण्यासाठी अनेक देशांसोबत थेट मुक्त व्यापार करार केले. फक्त हेच नाही तर भारताने नुकताच युरोपियन युनियनसोबतही करार केले. आता भारतासाठी अमेरिकेतून अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी येत आहे.

काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा करत म्हटले की, भारतावरील मुळ टॅरिफ आम्ही कमी करून 18 टक्क्यांवर आणत आहोत. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावलेल्या दंडात्मक 25 टक्के टॅरिफबद्दल अत्यंत मोठी अपडेट येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ काढण्याचा आदेश दिला असून त्यांनी त्या आदेशावर सही केल्याचीही माहिती मिळत आहे.

व्हाईट व्हाऊसच्या माहितीनुसार, दोन्ही देशातील व्यापार करार अंतिम टप्प्यात असून जवळपास पूर्ण झाली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकारी आदेशावर सही केली. ज्या आदेशात भारतावरील 25 टक्के दंडात्मक टॅरिफ हटवण्याबाबत आहे. भारतावरील 25 टक्के दंडात्मक टॅरिफ कधीही काढला जाऊ शकतो. म्हणजे भारतावर आता फक्त 18 टक्के टॅरिफ असणार आहे.

बांग्लादेशापेक्षाही कमी टॅरिफ अमेरिकेचा भारतावर असेल. भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी थांबवल्याचेही सांगितले जात आहे. भारत आणि अमेरिकेतील संबंध सतत तणावात होते, आता भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी ही नक्कीच आहे. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा परिणाम अनेक क्षेत्रांमध्ये स्पष्टपणे बघायला मिळाला. आता मोठा दिलासा भारतीयांना नक्कीच मिळाला आहे. कोणत्याही क्षणी अमेरिकेतून मोठी घोषणा होऊ शकते.