AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ?, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारस्कर आक्रमक..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्यांच्यासोबत उपोषणात पहिल्या दिवसापासून सहभागी असलेले लोक त्यांच्याविरोधात भूमिका घेताना दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ?, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बारस्कर आक्रमक..
Manoj Jarange Patil
| Updated on: Nov 24, 2026 | 12:56 PM
Share

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केली जात आहेत. त्यातच आता त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याच्या पहिल्या दिवसापासूनसोबत असलेल्या ललिता तारख यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले. यासोबतच सर्वांच्या संपत्तीची चाैकशी करण्याचीही मागणी केली. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या ललिता तारख यांनीहीच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अजय महाराज बारस्कर अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. हेच नाही तर गंभीर आरोप करत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

अजय महाराज बारस्कर यांनी थेट पुराव्याचा पेनड्राइव्ह पोलिसांकडे सुपूर्द केला. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये अजय बारस्करांनी काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. तीच तक्रार वर्ग झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी अजय महाराज बारस्कर आज जालन्यातील अंबड पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत.

मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टच्या उपोषणा दरम्यान महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात अश्लील शब्द वापरल्याचा आणि महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केल्याचा आरोप बारस्कर यांनी केला आहे. याशिवाय मराठा समाजातील तरुणांना फाशी घेण्यास प्रवृत्त केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी बारस्कर यांनी पोलिसांकडे केली आहे.

तसंच आपल्या तक्रारीच्या समर्थनार्थ पुराव्यांचा पेनड्राइव्हही त्यांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. आता या तक्रारीवर अंबड पोलिस काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अजय महाराज बारस्कर हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहेत. त्यातच आता त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे . पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल होतो का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चा...
राष्ट्रवादीत अंतर्गत वादाची ठिणगी! रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे सुप्रिया सुळे नाराज?
एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर..
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार; 35 जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र