विजय मल्ल्या भारताच्या ताब्यात मिळणार का? आज सुनावणी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याचा प्रत्यार्पणावर आज ब्रिटनमधील न्यायालय निर्णय देणार आहे. या सुनावणी दरम्यान भारतातील ईडीचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. फसवणूक आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज फेडू न शकल्याने मल्ल्या देश सोडून फरार झाला होता. गेल्यावर्षी […]

विजय मल्ल्या भारताच्या ताब्यात मिळणार का? आज सुनावणी
विजय माल्ल्या
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय बँकांचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याचा प्रत्यार्पणावर आज ब्रिटनमधील न्यायालय निर्णय देणार आहे. या सुनावणी दरम्यान भारतातील ईडीचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. फसवणूक आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात विजय मल्ल्यावर भारतीय बँकांचे तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज फेडू न शकल्याने मल्ल्या देश सोडून फरार झाला होता. गेल्यावर्षी एप्रिलला ब्रीटनमध्ये मल्ल्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्ट मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सुनावणी करणार आहे. सुनावणीनंतर दोन्ही पक्षांना 14 दिवसांच्या आत कोर्टात आव्हान द्यावे लागेल. आव्हान दिले गेले नाही तसेच सेक्रेटरी ऑफ स्टेटची सहमती असल्यास गृह सचिवांच्या आदेशाने 28 दिवसांच्या आत मल्ल्याचं प्रत्यार्पण केलं जाईल.

भारताकडून क्राऊन प्रोसिक्यूशन सर्व्हिस (सीपीएस) खटला पाहत आहेत. सीपीएस प्रमुख मार्क समर्सने सांगितले की, मल्ल्याच्या प्रर्त्यापणात काही अडथळे येणार नाहीत.

बँकेकडून घेण्यात आलेले कर्ज उद्योगातील तोट्यामुळे फेडता आले नाही, यामध्ये फसवणूक केली नसल्याचा दावा मल्ल्याच्या बचाव पक्षाकडून करण्यात येत आहे.

सोमवारच्या सुनावणीसाठी सीबीआयचे निर्देशक एस. साई मनोहर उपस्थित असणार आहेत. मनोहर विशेष निर्देशक राकेश आस्थानाची जागा घेणार आहेत. आतापर्यंत मल्ल्याच्या सर्व सुनावणींमध्ये राकेश आस्थाना उपस्थित होते.

बुधवारी मल्ल्याने ट्वीट करत सांगितले की, मी सर्व कर्ज फेडण्यास तयार आहे. याआधीही मी हा प्रस्ताव भारत सरकारला दिला होता. मात्र भारताकडून यावर काही उत्तर आलं नाही. असं विजय मल्ल्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.