AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीत दोन जहाजांची भीषण टक्कर, एका जहाजाच्या ठिकऱ्या… इराणने जे केले त्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

Strait of Hormuz Horrific collision: होर्मुजच्या समुद्रधुनीत मोठा भीषण अपघात घडला. एक मोठे जहाज दुसर्‍या जहाजाला जोरदार धडक दिली. ऐन अमेरिका आणि इराणमध्ये मोठा संघर्ष पेटलेला असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

होर्मुज खाडीत दोन जहाजांची भीषण टक्कर, एका जहाजाच्या ठिकऱ्या... इराणने जे केले त्याने, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
दोन जहाजांची भीषण टक्कर
| Updated on: Jul 14, 2026 | 1:52 PM
Share

Iran Rescue 23 Crew Members: इराण आणि अमेरिकेत पुन्हा शिलगली आहे. दोन्ही देशात युद्ध भडकले आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले वाढले आहेत. दरम्यान होर्मुज समुद्रधुनीत आज एक भीषण अपघात घडला. दोन जहाजांमध्ये मोठी टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की एक जहाजाच्या ठिकऱ्या उडाल्या. यावेळी इराणच्या माणुसकीचे दर्शन जगाला घडले. इराणच्या नौदलाने त्या जहाजावरील कर्मचाऱ्यांसह 23 लोकांचे प्राण वाचवले. त्यांची सुटका केली. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असताना ही घटना घडली.

तातडीने बचाव कार्याला सुरुवात

इराणच्या केश्म(Qeshm) बेटाच्या उत्तरेस हा अपघात घडला. दोन जहाजांची जोरदार टक्कर झाली. बल्क कॅरिअरवरील 23 खलाशांना वाचवण्यात मंगळवारी यश आले. त्यांना जहाजातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. इराणच्या फार्स न्यूज एजन्सीने याविषयीचे वृत्त दिले. त्यानुसार, दक्षिणेकडील अब्बास बंदर शहरातील अधिकाऱ्यांना अगोदर मंगळवारी पहाटे समुद्रात दोन जहाजांची टक्कर झाल्याची माहिती मिळाली.

प्राथमिक तपासात एका बल्क कॅरिअर जहाज समुद्रात दुसर्‍या जहाजाला धडकल्याचे कळले. होरमुजगान प्रांताच्या सागरी शोध आणि बचाव केंद्राच्या समन्वयाने एक पायलट बोट आणि इतर बोटी तातडीने मदतीसाठी पाठवण्यात आल्या. बल्क कॅरिअरला मोठा फटका बसला. जहाजाच्या मध्यभागाला सर्वात मोठा फटका बसला. जहाजात पाणी शिरले. कॅप्टनने सर्व खलाशांना तात्काळ जहाज सोडण्याचे आदेश दिले होते. इराणच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 23 खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हे सर्व कर्मचारी केश्म बेटावर नेण्यात आले.

केश्म बेटावर सहा स्फोट

ही दोन जहाजं कशी धडकली याचा तपास सुरू आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA ने एक मोठी वार्ता दिली आहे. त्यानुसार अब्बास बंदरावर स्फोटाचे आवाज ऐकू आले. तर किश बेटावर सहा स्फोट झाल्याचा दावा या वृत्तात करण्यात आला आहे. होर्मुज समुद्रधुनीत अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढल्यानंतर स्फोटाच्या मालिका सुरू आहेत. गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही देशात वातावरण तणावपूर्ण आहे. जूनमध्ये वॉशिंग्टन आणि तेहराण यानी एक सामंजस्य करार केला होता. कतार आणि पाकिस्तानच्या मदतीने दोन्ही देशात युद्धविराम झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण होर्मुज समुद्रधुनीतील वाहतुकीवरून पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. दोघांनीही या कराराला केराची टोपली दाखवली आहे.  दोन्ही देशात संघर्ष वाढला आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक