पंतप्रधानांनी सीट बेल्ट लावला नाही, भरावा लागला १० हजारांचा दंड, पाहा व्हिडिओ

| Updated on: Jan 21, 2023 | 12:48 PM

राजकीय नेते किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख दाखवली जाते. मग बऱ्याचवेळा त्यातून सुटका होते. परंतु एखादा कर्तव्यत्पर अधिकारी असल्यास दंड होतो. भारतात असे प्रकार नेहमी होतात. परंतु साहेबांच्या देशांत कोणीही नियम मोडला म्हणजे दंड होणारच.

पंतप्रधानांनी सीट बेल्ट लावला नाही, भरावा लागला १० हजारांचा दंड, पाहा व्हिडिओ
पोलिसांकडून दंड आकारणी
Image Credit source: social media
Follow us on

लंडन : वाहतुकीचे नियम तोडल्यास वाहतूक पोलीस दंड करतात. त्यावेळी आपण आपल्या अनेक ओळखी दाखवून दंड टाळण्याचा प्रयत्न करतो. राजकीय नेते किंवा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची ओळख दाखवली जाते. मग बऱ्याचवेळा त्यातून सुटका होते. परंतु एखादा कर्तव्याला प्राधान्य देणारा अधिकारी असल्यास दंड होतो. भारतात असे प्रकार नेहमी होतात. परंतु साहेबांच्या देशांत कोणीही नियम मोडला म्हणजे दंड होणारच. आता ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (rishi sunak)यांना वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल १० हजारांचा दंड भरावा लागला. लंकाशायर पोलिसांनी (UK Police )शुक्रवारी पंतप्रधानाविरूद्ध १०० पाँड म्हणजेच जवळपास १० हजार रुपयांचे चालन जारी केले. सुनक यांनी याप्रकरणात माफी मागितली होती. त्यानंतही पोलिसांनी त्यांना दंड ठोठावला आहे.

ऋषी सुनक होते मागील सीटवर 

पंतप्रधान ऋषी सुनक हे स्वतः गाडी चालवत नव्हते. ते गाडीच्या पुढच्या सीटवरही बसलेले नव्हते. मागच्या सीटवर बसून ते व्हिडिओ काढत होते. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरुन समोर आल्यानंतर ब्रिटीश पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून एक निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले की, ‘सुनक यांनी आपली चूक पूर्णपणे मान्य केली आहे. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली. तसेच ते दंड भरण्यास तयार आहेत. जेव्हा पंतप्रधानांनी हा व्हिडिओ बनवला तेव्हा ते उत्तर इंग्लंडमधील लँकेशायरमध्ये होते.’ पंतप्रधानांच्या या निवेदनानंतही पोलिसांनी त्यांचा दंड माफ केला नाही. ब्रिटनमध्ये जर एखाद्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तर त्याला १० हजार रुपयांचा दंड केला जातो. हे प्रकरण न्यायालयात गेल्यास त्याला ५० हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

पोलिसांकडून ट्विट

पोलिसांनी ही माहिती ट्विट करून दिली. मात्र, त्यात पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या नावाचा उल्लेख नाही. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लंकाशायरमध्ये चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्याबद्दल लंडनच्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला दंड ठोठावण्यात आला आहे, असे पोलिसांनी ट्विटमध्ये लिहले.

भारतात पंतप्रधानांना कधी झाला का दंड

भारतातही पंतप्रधानांच्या गाडीला वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला होता. ही घटना १९८२ मधील आहे. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार होत्या. त्यानंतर कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलजवळील मिंटो ब्रिज परिसरात इंदिरा गांधींची गाडी आली. गाडीच्या चालकाने नियम मोडून कार पार्क केली. देशातील पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी वाहतूक शाखेच्या प्रमुख होत्या. बेदी यांच्या कर्मचाऱ्यांनी गाडी दुसरीकडे लावण्याचे चालकाला सांगितले. परंतु चालकाने ऐकले नाही. यामुळे क्रेन बोलवून गाडी हटवण्यात आली. तसेच दंडही ठोठवण्यात आला. यानंतर इंदिरा गांधी यांनी किरण बेदी यांचे कौतूक करत त्यांची बदली केली. अर्थात ती बदली शिक्षा म्हणून नव्हती तर व्हिआयपी सिक्योरिटीचे प्रमुखपद बेदी यांना दिले.