
रशिया आणि युक्रेन युद्ध पेटले असून युक्रेनने थेट रशियाच्या अध्यक्षांनाच झोपेत मारण्याचा कट रचला. 91 ड्रोन पुतिन यांच्या घरावर युक्रेनने सोडले. रशियाच्या लष्कराने हा मोठा हल्ला उघळून लावला. मात्र, यानंतर जगात मोठी खळबळ बघायला मिळली. त्यानंतर अनेक देश रशियाच्या बाजूने पुढे आली आणि या हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे युद्ध थांबवायचे नसल्याचे थेट रशियाने म्हटले. अमेरिकेकडून हे युद्ध थांबवण्यासाठी जोरदार प्रयत्न केली जात असून शांतता प्रस्ताव तयार केला जात आहे, हा शांतता प्रस्ताव शेवटच्या टप्प्यात असतानाच युक्रेनने हा हल्ला केला. अमेरिकेचीही झोप या हल्ल्यानंतर उडाली. 1 जानेवारी 2026 रोजी जगभरात नवीन वर्षाचे स्वागत केले जात असून लोकांमध्ये उत्साह बघायला मिळाला. मात्र, यादरम्यानच युक्रेनने कुरापती करत थेट नव्या वर्षीच रशियावर मोठा हल्ला केला.
1 जानेवारीच्या रात्री रशियन तेल पायाभूत सुविधांवर ड्रोन हल्ला करण्यात आला. हा अत्यंत मोठा हल्ला असून थेट आगीचा भडका उडाला. रशियन माध्यमांनुसार, कालुगा प्रदेशातील ल्युडिनोवो तेल डेपोमध्ये आणि क्रास्नोदार क्रायमधील इल्स्की तेल शुद्धीकरण कारखान्यात आग लागली. युक्रेनने काही ड्रोनच्या मदतीने हा हल्ला केला. आतापर्यंतचा सर्वात भीषण हा हल्ला होता. काही तास आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता लागले.
नुकताच मिळालेल्या अहवालानुसार, ल्युडिनोवो तेल डेपोवरील हल्ला 31डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या काउंटडाउनच्या अगदी आधी झाला, तर क्रास्नोडार क्रायमधील इल्स्की तेल शुद्धीकरण प्रकल्पावरील हल्ला 1 जानेवारी 2026 रोजी झाला. दोन्ही हल्ल्यानंतर तेल प्रकल्पांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. युक्रेनकडून रशियावर जोरदार हल्ले केली जात आहेत. ज्यामुळे खळबळ उडाली.
रशियाने अगोदरच युक्रेनला मोठा इशारा दिला. पुतिन यांच्यावर थेट हल्ला करण्याची हिंमत युक्रेनने केल्याने रशियात अगोदरच संतापाची लाट आहे. यादरम्यान नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशाप्रकारचा हल्ला युक्रेनकडून करण्यात आल्याने भविष्यात हे युद्ध अधिक पेटण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेने रशियाला शांतता राखण्यास सांगितले असून रशियाने देखील स्पष्ट केले की, कीवला या हल्ल्यांची किंमत मोजावीत लागेल.