युक्रेन-रशियात पुन्हा संघर्ष पेटला; सर्वात मोठ्या कंपनीच्या गोदामावर हल्ला 9 जणांचा मृत्यू

ukraine vs russia : युक्रेनने रशियावर भीषण हल्ला केला. गोदामावर केलेल्या हल्ल्यात 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

युक्रेन-रशियात पुन्हा संघर्ष पेटला; सर्वात मोठ्या कंपनीच्या गोदामावर हल्ला 9 जणांचा मृत्यू
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 19, 2026 | 12:22 PM

युक्रेन आणि रशियामधील संघर्ष पुन्हा एकदा भडकला आहे. युक्रेनने रशियावर ड्रोनने भीषण हल्ले केले आहेत. युक्रेनने रशियाची सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग कंपनी वालल्डबेरीजच्या दोन मोठे गोदाम, ऑइल डेपो आणि इतर ठिकाणावर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रशियन अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर 80 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

सर्वात प्रथम तांबोव क्षेत्राच्या कोतोवस्कव येथील वाइल्डबेरीज गोदामावर हल्ला झाला. हे गोदम युक्रेनपासून 360 किमी दूर अंतरावर आहे. या कंपनीच्या गोदामात रात्रीच्या सुमारास काम करणाऱ्या 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले. दुसरा हल्ला हा इलेक्स्ट्रोस्टालमध्ये करण्यात आला. मॉस्कोच्या पूर्वेला 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या इलेक्स्ट्रोस्टालमध्ये करण्यात आला. मॉस्को क्षेत्राचे गव्हर्नर आंद्रेई व्होरोब्योव यांनी सांगितलं की, या हल्ल्यात 61 जण जखमी झाले. त्यातील 40 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर जखमीपैकी एकाचा मृत्यू झाला.

यूक्रेनने ड्रोनने नोगिंस्कच्या ऑइल डेपोजवळ देखील हल्ला केला. या हल्ल्यामुळे डेपोला आग लागली. यामुळे सुरक्षेच्या कारणात्सव डेपोजवळील हॉस्पिटल आणि इमारत रिकामी करण्यात आली. त्याचबरोबर युक्रेनचा ड्रोन हा बालवाडीवर पडून आग लागली. त्यानंतर या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आलं. तर बेलगोरोड प्रदेशात झालेल्या एका युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात देखील एकाचा मृत्यू झाला. तर दुसरा व्यक्ती जखमी असल्याची माहिती मिळतेय.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी म्हटलं की, आम्ही मॉस्को आणि तांबोवमधील लॉजिस्टिक्स केंद्रावर हल्ला केलाय. या केंद्राचा वापर रशियाकडून ड्रोनचे प्रतिबंधित सुटे भाग पुरवण्यासाठी केला जात होता. युक्रेनने रशियाच्या ताब्यातील ताब्यात असलेल्या लष्करी तळांवरही हल्ला केल्याचेही म्हटलं आहे. युक्रेनचा दावा आहे की, ‘नोगिंस्क ऑइल डेपो रशियन लष्कराला इंधन पुरवत होता. तसेच काळ्या आणि आझोव समुद्रात दोन टँकर जहाजांनाही लक्ष्य करण्यात आल्याचा दावा केलाय.

Follow Us