AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : टेन्शन वाढलं! डोनाल्ड ट्रम्प यांना थेट अल्टिमेटम? कायदा पाळा, उगीचच…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर लष्कराने अनेक जहाजांना उडवून दिलं आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देण्यात आला आहे.

Donald Trump : टेन्शन वाढलं! डोनाल्ड ट्रम्प यांना थेट अल्टिमेटम? कायदा पाळा, उगीचच...
donald trump
| Updated on: Oct 31, 2025 | 10:56 PM
Share

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय करतील हे सांगता येत नाही. अमेरिकेतील ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी प्रशांत महासागरात थेट काही जहाजांवर हल्ले करून त्यांना नेस्तनाबूत केलं आहे. ट्रम्प यांच्या या कारवाईमुळे अनेक देशांनी अमेरिकेचा निषेध केला. काही देशांनी तर ट्रम्प यांनी अशा प्रकारच्या कारवाया थांबवाव्यात अशी मागणी केली आहे. असे असतानाच आता ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राने ठणकावलं आहे. कायद्याचे उल्लंघन करून तुम्ही कारवाई करू नये, असे ट्रम्प यांना संयुक्त राष्ट्राने सांगितले आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यात 60 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

दोन महिन्यांत ट्रम्प यांनी कॅरेबियन आणि प्रशांत महासागरात काही जहाजं उडवून टाकली आहेत. या जहाजांच्या माध्यमातून ड्रग्ज आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांची तस्करी केली जात होती, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन सैन्याच्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत एकूण 60 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. हीच बाब लक्षात घेता संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार विभागाचे प्रमुख व्होल्कर टुर्क यांनी ट्रम्प यांनी कायद्याचे उल्लंघन करू नये, असे सांगितले आहे. ट्रम्प यांची ही कृती म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. कायद्याला डावलून कोणत्याही प्रकारे लोकांचा जीव घेणे ही हत्याच आहे. अमेरिकेने अशा प्रकारच्या हत्या लवकरात लवकर थांबवायला हव्यात, असे व्होल्कर टुर्क म्हणाले आहेत.

घातक ल्ले करण्याऐवजी…

ड्रग्ज तस्करीविरोधात लढाई करणे गरजचे आहे. मात्र अशा प्रकारचे घातक हल्ले करणे हे समस्येवरील समाधान नाही. नियमानुसार अशा प्रकारची कारवाई तेव्हाच केली जाते जेव्हा समोरची व्यक्ती ही अन्य लोकांच्या आयुष्यासाठी घातक ठरते. अमेरिकेने आपल्या हल्ल्यांबाबत खूपच कमी माहिती दिलेली आहे. जहाजांवर असलेली माणसं लगेच कोणाच्यातरी जीवासाठी घातक होते, असे वाटत नाही. अशा प्रकारचे घातक हल्ले करण्याऐवजी काययदेशीर कारवाई करावी. जहाजे रोखून धरणे, संशयितांना ताब्यात घेणे, गुन्हा दाखल करणे अशा प्रकारच्या कारवाया केल्या जाऊ शकतात, असेही मत व्होल्कर टुर्क यांनी व्यक्त केले.

आम्हाला हल्ला करण्याचा अधिकार- डोनाल्ड ट्रम्प

दुसरीकडे अशा प्रकारची कारवाई करण्याचा अमेरिकेला अधिकार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आहे. अमेरिकेने कथितपणे ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या जहाजांना रोखण्यासाठी समुद्रात सैनिकांची गस्त वाढवलेली आहे. तर दुसरीकडे मेक्सिको, कोलंबिया, व्हेनेझुएला या देशांनी अमेरिकेच्या कारवाईची निंदा केलेली आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने आवाहन केल्यानंतर आता ट्रम्प या प्रकरणात काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...