जग तणावात! अमेरिकेने थेट दिल्या नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना, महायुद्धाला सुरूवात? कोणत्याही..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकच्या लष्कराने मोठी कारवाई करत वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून ताब्यात घेतले. त्यानंतर जगात मोठी खळबळ बघायला मिळाली. आता अमेरिकेने मोठ्या सूचना त्यांच्या नागरिकांना दिल्या आहेत.

जग तणावात! अमेरिकेने थेट दिल्या नागरिकांना देश सोडण्याच्या सूचना, महायुद्धाला सुरूवात? कोणत्याही..
America
| Updated on: Jan 11, 2026 | 9:51 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेजुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करत त्यांच्या पत्नीसह अमेरिकेत आणले. यावेळी त्यांनी अगोदर मोठा हल्ला वेनेजुएलावर केला. सध्या वेनेजुएलावर अमेरिकेचे नियंत्रण आहे. हेच नाही तर वेनेजुएलाच्या तेलाची अमेरिका जगभर विक्री करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून वेनेजुएला आणि अमेरिकेतील तणाव वाढत होता. अंमली पदार्थांची तस्करी वेनेजुएलाकडून केली जात असल्याचा सतत आरोप अमेरिकेकडून केला जात होता. काही हल्लेही त्यांनी केली. अंंमली पदार्थांच्या तस्करीचे कारण देत अमेरिकेकडून वेनेजुएलाचे तेलही जप्त केले जात होते. शेवटी त्यांनी वेनेजुएलावर मोठा हल्ला केला, त्यामध्येच तेथील 40 लोक मारले गेले. थेट वेनेजुएलाच्या अध्यक्षांना अटक केली. नुकताच वेनेजुएलातील तेल कंपन्यांसोबत अमेरिकेने महत्वाची बैठक घेतली.

एका रात्रीत अमेरिकेने वेनेजुएलावर हल्ला केला आणि थेट त्यांच्या देशावर आणि तेलावर नियंत्रण मिळवले. ज्यानंतर जगभरात खळबळ उडाली. अनेक देशांनी अमेरिकेने केलेली कारवाई चुकीचे असल्याचे म्हटले. हेच नाही तर रशिया आणि युक्रेन युद्धात शांततेची भूमिका दाखवणारे वेनेजुएलाविरोधात थेट हल्ले करताना दिसले. आता नुकताच अमेरिकेने वेनेजुएलामधील त्यांच्या नागरिकांना मोठा इशारा देत सूचना दिलीये. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले की, अमेरिकी नागरिकांनी वेनेजुएला सोडावा.

वेनेजुएलाची सेना अमेरिकी नागरिक आणि त्यांच्या समर्थकांना शोधत आहे. त्यांच्या गाड्या तपासल्या जात आहेत. अमेरिकेच्या कारवाईनंतर हे विधान आले. वेनेजुएलाचे अध्यक्ष मादुरो अमेरिकेच्या ताब्यात आहेत आणि त्यांच्यावर कोर्टात खटला सुरू आहे. निकोलस मादुरो यांच्या जागी आता वेनेजुएलाच्या उपराष्ट्रपती डेल्सी यांना अंतरिम अध्यक्ष बनवले आहे. अमेरिकेच्या सहकार्याने वेनेजुएला देश चालवला जाईल, असे अमेरिकेने अगोदरच स्पष्ट केले असून वेनेजुएलाच्या तेलावर पूर्ण नियंत्रण अमेरिकेचे असणार आहे.

शिवाय निर्णय घेण्याचा प्रत्येक अधिकार फक्त अमेरिकेलाच असणार आहे. अमेरिकेच्या हातात जरी आता वेनेजुएलाचे तेल असले तरीही सुरक्षेवर वेनेजुएलाच्याच हातात आहे. यामुळे अमेरिकेचे समर्थक आणि त्यांच्या नागरिकांची कसून चाैकशी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमेरिकेच्या सरकारने आपल्या नागरिकांना वेनेजुएला सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. अमेरिकेच्या मनात नक्की काय याची जोरदार चर्चा सुरू असून मोठा हल्ला करण्याच्या तयारीत अमेरिका असल्याचेही सांगितले जात आहे.