AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युद्धाच्या धामधुमीदरम्यान मोठा धक्का, अमेरिकेत माजली खळबळ, US आर्मी चीफलाच ..

US Army Chief General Randy George Removed by Pete Hegseth : महिन्याभरापासून इराणशी सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिक पीट हेगसेथ यांनी अमेरिकेच्या लष्करप्रमुखांना पदावरून दूर केले आहे. त्यांनी लष्करप्रमुख रँडी जॉर्ज यांच्या राजीनाम्याची मागणी केली. लष्करप्रमुखांना तात्काळ राजीनामा देऊन निवृत्त होण्यास त्यांनी सांगितल्याचं समोर आलं आहे. आता त्यांच्या जाण्यानंतर या पदाचा कारभार कोण सांभाळणार या कडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

युद्धाच्या धामधुमीदरम्यान मोठा धक्का, अमेरिकेत माजली खळबळ, US आर्मी चीफलाच ..
रँडी जॉर्ज
| Updated on: Apr 03, 2026 | 7:26 AM
Share

US Army Chief General Randy George : अमेरिका-इस्रायलने इराणवर चढवलेल्या हल्ल्यानंतर युद्ध सुरू झालं आणि गेल्या 25 दिवसांपासून हा संघर्ष अविरत पेटलेलाच आहे. याच युद्धादरम्यान आता अमेरिकेत मोठी खळबळ माजली आहे. त्याचं कारणं म्हणजे अमेरिकेकडून एक मोठा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेने त्यांच्या सेनाप्रमुखा हटवलं आहे.अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अमेरिकी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना पदावरून हटवले असून त्यांना तात्काळ सेवानिवृत्त होण्याचे आदेश दिले आहेत. हो, हे खरं आहे, अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी गुरुवारी (स्थानिक वेळेनुसार) अमेरिकी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तात्काळ राजीनामा देऊन सेवानिवृत्त होण्यास सांगितले. त्यांच्या जाण्यानंतर, उपप्रमुख जनरल क्रिस्टोफर लानेव्ह हे प्रभारी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

नाव न सांगण्याच्या अटीवर पेंटागॉनच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, अमेरिकी लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ, रँडी जॉर्ज यांना त्यांच्या पदावरून मुदतीपूर्वीच निवृत्त होण्यास सांगण्यात आलं आहं. जॉर् हे ऑगस्ट 2023 पासून चीफ ऑफ स्टाफ म्हणून कार्यरत होते. मात्र आज झालेल्या हा निर्णय महत्त्वपूर्ण नेतृत्व बदल दर्शवत आहे, कारण प्रशासन अशा कमांडरच्या शोधात आहे जो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि हेगसेथ यांची लष्करासाठीची दूरदृष्टी प्रत्यक्षात आणेल.

याचा अर्थ असा की, अमेरिकेच्या लष्करप्रमुखाची विचारसरणी विशेषतः इराण युद्धाच्या बाबतीत, त्यांचे विचार हे ट्रम्प आणि हेगसेथ यांच्या विचारसरणीशी जुळणारे हवेत. इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना अमेरिकेच्या लष्करी नेतृत्वात बदल हवा असल्याचं यातून सूचित होतंय.

कोण आहेत रँडी जॉर्ज ?

खरं सांगायचं झालं तर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रँडी जॉर्ज यांची अमेरिकी लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्ती केली होती. जर जॉर्ज यांना सक्तीने निवृत्त केलं नसतं, तर ते साधारणपणे 2027 सालापर्यंत या पदावर कार्यरत राहिले असते. रँडी जॉर्ज हे एक अनुभवी पायदळ अधिकारी असून वेस्ट पॉइंट येथील अमेरिकी लष्करी अकादमीचे पदवीधर आहेत. त्यांनी आखाती युद्ध, इराक आणि अफगाणिस्तान यांसारख्या मोठ्या संघर्षांमध्ये सेवा बजावली होती, ज्यामुळे त्यांना युद्धाचा मोठा अनुभव आहे.

आता कोण सांभाळणार अमेरिकी सैन्याची कमान ?

मिळालेल्या माहितीनुसार, रँडी जॉर्ज यांच्या निवृत्तीनंतर, व्हाईस चीफ जनरल क्रिस्टोफर ला नेव्ह हे लष्कराचे प्रभारी चीफ ऑफ स्टाफ म्हणून पदभार स्वीकारतील. ला नेव्ह हे अमेरिकेचे संरक्षण सचिव हेगसेथ यांचे माजी सहाय्यक असून त्यांनी यापूर्वी लष्कराच्या 82 व्या एअरबोर्न डिव्हिजनचे नेतृत्व केलं आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते शॉन पार्नेल यांनी ला नेव्ह यांचे वर्णन, प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असलेले, युद्धानुभवी नेते असे केले आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा