इराणच्या केश्म बेटाजवळ अमेरिकेचा हल्ला, मोजताबा खामेनेई म्हणाले, आता युद्ध केव्हा संपवायचे ते आम्ही ठरवणार
अमेरिकेने इराणच्या केश्म बेटाजवळ दोन मच्छीमार नौकांवर हल्ला केला आहे. यात दोन मच्छीमार बेपत्ता तर एक जखमी झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या सुप्रीम लीडर मोजतबा खमेनेई यांनी शत्रूच्या आगळीकला तातडीने चोख उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

इराणने दावा केला आहे की अमेरिकेने केश्म बेटाजवळ दोन मच्छीमार नौकांवर हल्ला केला आहे. यात दोन मच्छीमार बेपत्ता तर एक जखमी झाला आहे. त्यामुळे संतापलेल्या सुप्रीम लीडर मोजतबा खमेनेई यांनी शत्रूच्या कोणत्या कृतीला तातडीने उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
इराण आणि अमेरिकेतील संघर्स संपण्याचे काही नावच घेत नाहीए, आता इराण अमेरिकेवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. इराणी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टींगने शनिवारी होर्मोजगान प्रांताच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की अमेरिकेने केश्म द्वीपच्या जवळ दोन मासे पकडणाऱ्या नौकांना टार्गेट केले आहे.
या घटनेत दोन मच्छीमार बेपत्ता झाले आहे, तर एक मच्छीमार जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेच्या वतीने या हल्ल्याला तात्काळ दुजोरा दिलेला नाही. या दरम्यान, इराणचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनेई यांनी शत्रूच्या कोणत्याही कारवाईला तत्काल आणि प्रभावी उत्तर देण्याचा आदेश दिला. त्यांच्या लिखित संदेशाच्या मते आता
उत्तराची कोणतीही भौगोलिक सीमा असणार नाही. ते म्हणाले की जर दुश्मन पुन्हा सैन्य वा अतिरेकी हल्ला केला तर इराण नव्या संघर्षाला समाप्त करण्याची वेळ आणि अटी स्वत:च निश्चित करेल.
खामेनेई यांनी सशस्र दलांना सर्व अमेरिकन आणि इस्रायली स्थळांना आणि मालमत्तांना टार्गेटच्या निशाण्यावर आणण्याची लिस्ट अपडेट करण्याच्या आदेश दिलेला आहे. तसेच दारुगोळा आणि शस्रास्रांचे उत्पादने वाढवण्याचे, सैन्य गुप्तचर क्षमतांना मजबूत करणे आणि घरगुती क्षमतांचा विकास करण्याचे आदेश दिले आहे.
अमेरिकन निवडणूकानंतर इराणवर नवा हल्ला
या घटनाक्रम अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अमेरिका आणि इराण दरम्यान तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात पुन्हा सैन्य कारवाईच्या शक्यते विषयी संकेत दिले आहेत. बातमीनुसार अमेरिकेत ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावती निवडणूकानंतर इराणवर नव्या हल्ल्याची शक्यतेवर चर्चा सुरु आहे. अमेरिकेच्या शीर्ष सैन्य अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या समोर इराणच्या विरोधात संभाव्य सैन्य कारवाईचे पर्याय ठेवले आहे. या दरम्यान इस्रायलमध्ये देखील इराण संदर्भात सैन्य कारवाईची तयारी सुरु आहे.