100 टक्के टॅरिफमधून मोठा दिलासा, थेट भारतासाठीही गुड न्यूज, जगभरातील..

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट टॅरिफबद्दलही आदेश काढले जात आहेत. त्यांनी काढलेल्या एका आदेशाने जगभरातील औषध उत्पादन कंपन्यांची झोप उडाली.

100 टक्के टॅरिफमधून मोठा दिलासा, थेट भारतासाठीही गुड न्यूज, जगभरातील..
Tariff Donald Trump
| Updated on: Apr 05, 2026 | 11:32 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका मागून एक जगाला धक्के देताना दिसत आहेत. अमेरिका आणि इराण युद्ध सुरू असताना त्यांनी 100 टक्के टॅरिफबाबत मोठे आदेश काढला. औषधांवर 100 टक्के टॅरिफ लावत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा धक्का सर्वांना दिला. ट्रम्प प्रशासनाने पेटंट असलेल्या औषध उत्पादनांना मोठा धक्का दिला. थेट 100 टक्के टॅरिफ लावला. त्यामध्येच आता मोठा दिलासा देण्यात आला. मोठ्या कंपन्यांसाठी 120 दिवसांची आणि लहान कंपन्यांसाठी 180 दिवसांची मुदत दिली आहे. युरोपियन युनियन, जपान, कोरिया, स्वित्झर्लंड आणि लिकटेंस्टाईनमधून येणाऱ्या उत्पादनांवर केवळ 15  टक्के टॅरिफ आकारला जाईल. यूकेमधून होणाऱ्या आयातीवर त्याहूनही कमी शुल्क आकारले जाईल. सर्वांनाच एक सारखा टॅरिफ लावण्यात आला नाहीये.

हेच नाही तर ज्या कंपन्या अमेरिकेत उत्पादन करण्यास  ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ किंमत करार करण्यास सहमत आहेत. त्या कंपन्यांना 20 जानेवारी 2029 पर्यंत शुक्लात सूट मिळणार आहे. हा देखील मोठा दुसरा दिलासा अमेरिकेकडून देण्यात आला. ज्या कंपन्या केवळ ऑनशोरिंग करारांना सहमत आहेत, त्यांना सुरुवातीला 20 टक्के शुल्काचा सामना करावा लागेल.

त्यानंतर त्यांच्यावर थेट 100 टक्क्यापर्यंत शुल्क आकारले जाईल.  MFN किंमत म्हणजे खरेदीदाराला ती कंपनी आपल्या कोणत्याही ग्राहकाला देऊ करत असलेली सर्वात कमी किंमत मिळेल. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाचा सन फार्मावर परिणाम होऊ शकतो. फक्त सन फार्माच नाही तर इतरही अनेक भारतीय कंपन्यांवर त्याचा थेटपणे परिणाम होऊ शकतो. ब्रँडेड औषधांच्या बाजारपेठेत लक्षणीय हिस्सा असलेली ही देशातील एकमेव मोठी कंपनी आहे.

महसुलापैकी सुमारे 20 टक्के महसूल ब्रँडेड औषधांमधून येतो. मात्र, युरोपीय उत्पादित होणाऱ्या तिच्या इल्युम्या या प्रमुख औषधाला कमी शुल्काचा फायदा होऊ शकतो. यामुळे भारतीय कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात थेटपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत टॅरिफ आकारताना दिसत आहेत. टॅरिफच्या माध्यमातून जगाला त्यांनी ताप आणला. इराण युद्धात गुंतलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटपणे टॅरिफबद्दल आदेश काढला.

Follow Us