AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Wars: मिस्टर ट्रम्प, इतक्या देशांनी अमेरिकेचा केलाय पराभव, या छोट्या देशांचं नाव आठवतंय ना?

These Small Countries Defeated America: अमेरिका सध्या इराण युद्धात फार जेरीस आल्याचे दिसत आहे. ट्रम्प हे रोज नवनवीन विधानं करून जगाला बुचकाळ्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर अमेरिकेतील नागरिकांनीच त्यांना मिस्टर ट्रम्प या छोट्या छोट्या देशांनी अमेरिकेचा पराभव केला याची आठवण करून दिली आहे. तुम्हाला माहिती आहेत का ते देश?

US Wars: मिस्टर ट्रम्प, इतक्या देशांनी अमेरिकेचा केलाय पराभव, या छोट्या देशांचं नाव आठवतंय ना?
अमेरिका Image Credit source: गुगल
| Updated on: Apr 03, 2026 | 4:53 PM
Share

These Small Countries Defeated America: पहिल्या महायुद्धानंतर अमेरिका हा जगातील सर्वात शक्तीशाली देश म्हणून ओळखला जातो. सैन्य ताकद, शस्त्रास्त्र आणि आर्थिक बळ या सर्वच गोष्टीत अमेरिका सरस आहे. इराणविरोधात अमेरिकेने युद्ध सुरू केले आहे. त्याला एक महिना उलटला आहे. पण चिवट इराणने अद्याप नांगी टाकलेली नाही. अमेरिकेच्या या युद्धखोर धोरणाला युरोपातील अनेक देशांचा नाही तर अमेरिकेतील जनतेचाही पाठिंबा नसल्याचे समोर येत आहे. जगाचा दादा म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेलाच नागरिकांनी आरसा दाखवला आहे. या छोट्या छोट्या देशांकडून पराभव पत्करावा लागला हे विसरु नका असा सल्लाच अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांना दिला आहे.

अमेरिकेला जेरीस आणणारे देश कोणते?

व्हिएतनाम

व्हिएतनाम युद्ध जगाच्या इतिहासात गाजलेले आहे. व्हिएतनामकडे ना जास्त सैनिक ना आधुनिक शस्त्र होती. पण या देशाने अमेरिकन सैनिकांना गोरिला युद्ध तंत्रज्ञानाने जेरीस आणले. घनदाट जंगलात नेऊन त्यांनी अमेरिकन सैनिकांना पाणी पाजले. अनेक अमेरिकन सैनिक या युद्धात ठार झाले. अमेरिकेत या युद्धाविरोधात मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यावर अखेर 1973 मध्ये अमेरिकेने सर्व सैनिकांना माघारी बोलावले. दोन वर्षात सर्व सैनिक परतले.

अफगाणिस्तान

9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने 2001 मध्ये अफगाणिस्तानवर हल्ले चढवले. दहशतवाद्यांविरोधात अमेरिकेने व्यापक मोहीम हाती घेतली. पण दहशतवाद्यांचा बिमोड करणे काही अमेरिकेला लवकर शक्य झाले नाही. उलट तालिबान सारखे भूत अमेरिकेने बाहेर काढले. या मोहिमेत अमेरिकेचे कोट्यवधीच नाही तर अब्जावधी रुपये पाण्यासारखे खर्च झाले. सैनिकांना कित्येक वर्ष अफगाणिस्तानमध्ये राहावे लागले. तालिबान उलट मजबूत झाले आणि डोंगरी भागात अमेरिकन सैनिकांना काहीच करता आले नाही. अमेरिकेन सैनिक दोन दशकानंतर तिथून बाहेर पडले आणि तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला.

सोमालिया

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला सोमालियाच्या गृहयुद्धात अमेरिका दाखल झाली. मोगादिशूच्या युद्धात वातावरण बदलले. या युद्धात सोमालियाच्या बंडखोरांनी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर खाली पाडेल. अनेक अमेरिकन सैनिकांचा बळी गेला. त्यामुळे सोमालियातून तातडीने सैनिकांची तुकडी मागे बोलवण्यात आली. येथेही अमेरिकेचे हात पोळले.

लाओस

व्हिएतनाममध्ये युद्ध सुरू असतानाच त्याची झळ पार लाओसपर्यंत पोहचली. अमेरिकेने येथील कम्युनिस्ट सरकार उलथवण्यासाठी सैनिक उतरवले. अनेक ठिकाणी बॉम्ब टाकले. इतके करूनही कम्युनिस्ट पाथेट लाओचे सरकार आले. येथेही अमेरिकेचे तोंड भाजले. आता इराण युद्धातही अमेरिकेचे हाच चांगलेच भाजले आहेत. पण इराण किती दिवस अजून तग धरणार यावर या युद्धाचे गणित अवलंबून आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा