AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा गेम, पीस डीलसाठी पुढे करुन अमेरिका-इस्रायलने असं काम केलं, त्याची अजिबात अपेक्षा नव्हती

US Iran Peace Deal : पाकिस्तान युद्ध समाप्तीसाठी अमेरिका-इराणमध्ये पीस डील घडवून आणण्यासाठी खूप पुढे-पुढे नाचत आहे. पण आता अमेरिकेने अक्षरश: त्यांना तोंडावर पाडलय. अमेरिका-इस्रायलने असं काम केलय ज्याची पाकिस्तानला अजिबात अपेक्षा नव्हती. त्यांच्यासाठी हा धक्काच आहे.

पाकिस्तानचा गेम, पीस डीलसाठी पुढे करुन अमेरिका-इस्रायलने असं काम केलं, त्याची अजिबात अपेक्षा नव्हती
Donald Trump
| Updated on: Apr 03, 2026 | 1:33 PM
Share

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धात शांतता करार घडवून आणण्यासाठी पाकिस्तान खूप पुढे-पुढे करतोय. पाकिस्तानला युद्ध थांबवण्याचं श्रेय हवं आहे. पण अमेरिकेने पाकिस्तान सोबतच मोठा गेम केला आहे. अमेरिकेच्या लेखी पाकिस्तानचं काय स्थान आहे? पाकिस्तानच्या शब्दाला किती किंमत आहे? ते दिसून आलय. शांतता घडवून आणण्यासाठी पाकिस्तान इराणच्या ज्या नेत्याच्या संपर्कात होता, ज्यांच्याशी चर्चा चाललेली, त्यांच्यावरच अमेरिका-इस्रायलने हल्ला केला. पाकिस्तानची कमाल खराजी यांच्याशी चर्चा सुरु होती. खराजी इराणचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत. पाकिस्तान शांततेसंदर्भात त्यांच्याशी वाटाघाटी करत होता. पाकिस्तान कमाल खराजी यांच्या मार्फत इराणला संदेश पोहोचवत होता. पण आता अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात कमाल खराजी जखमी झाले आहेत.

इराणी वर्तमानपत्र मिहानने दिलेल्या बातमीनुसार, बुधवारी एक एप्रिलला तेहरानच्या अजौरानियेह भागात खराजी यांच्या घरावर हल्ला झाला. या हल्ल्यात खराजी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलय. कमाल खराजी याचं वय 81 आहे. त्यांच्याकडे इराणचे कूटनितीक एक्सपर्ट म्हणून पाहिलं जातं. 1997 ते 2006 खराजी इराणचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्र मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर ते सुप्रीम लीडरच्या ऑफिसमध्ये जॉईन झाले. त्यांना इराणचे दुसरे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांचं निकटवर्तीय मानलं जायचं.

जन्म इराणमध्ये शिक्षण अमेरिकेत

खराजी सध्याच्या घडीला मोज्तबा खामेनेई यांचे परराष्ट्र सल्लागार असल्याचं म्हटलं जातय. म्हणून पाकिस्तान आपले संदेश खराजी यांच्याकडे पाठवत आहे. इराणमध्ये जन्मलेल्या खराजी यांचं शिक्षण अमेरिकेत झालय. त्यांनी 1975 साली ह्यूस्टन यूनिवर्सिटीमधून पीएचडीची डिग्री मिळवली.

तो पर्यंत कदाचित हे युद्ध सुरु राहिलं

81 वर्षीय खराजी इराणकडून शांतता कराराच्या चर्चेमध्ये सक्रीय होते. त्यांच्यावर अमेरिका-इस्रायलने का हल्ला केला? हा प्रश्न निर्माण होतो. युद्ध सुरुच राहणार. इराणवर इतके हल्ले करणार की त्यांना पाषाण युगात पाठवणार अशी अमेरिकेने धमकी दिली आहे. इराणचे नवीन सुप्रीम लीडर मुज्तबा खामनेई यांना संपवेपर्यंत कदाचित हे युद्ध सुरु राहू शकतं.

चीनने पाच सूत्री कार्यक्रम दिला

इराण आणि अमेरिकेत शांतता वाटाघाटी घडवून आणण्यासाठी पडद्यामागे चीन, टर्की, पाकिस्तान आणि इजिप्त हे देश प्रयत्न करतायत. अमेरिकेकडून उपराष्ट्रपती जेडी वेन्स या चर्चेमध्ये आहेत. पाकिस्तानला संदेश पोहोचवण्याच काम दिलय. चीनने पाच सूत्री कार्यक्रम अमेरिकेला दिलाय. त्यात युद्धविराम मुख्य मुद्दा आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा