AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US-Israel Iran News LIVE : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले, तेहरान, करज या भागांनाही सोडलं नाही!

| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 8:29 AM
Share

US-Israel Iran News LIVE : अमेरिका-इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरुच आहेत. या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. इस्रायलची युद्धात सरशी झाली असली, तरी दुसऱ्याबाजूला मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे. पुढच्या काही दिवसात हे युद्ध आणखी तीव्र होईल.

US-Israel Iran News LIVE : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले, तेहरान, करज या भागांनाही सोडलं नाही!
Israel-Iran War

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायलने पुकारलेल्या युद्धाचा आज सहावा दिवस आहे. अमेरिका-इस्रायलकडून इराणवर जोरदार हल्ले सुरु आहेत. काल अमेरिकी नौदालाने टॉरपीडो हल्ला करुन श्रीलंकेजवळच्या समुद्रात इराणी युद्धनौका बुडवली. यात 80 पेक्षा जास्त नौसैनिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांमध्ये इराणी नौदल आणि एअरफोर्सची ताकद मोठ्या प्रमाणात संपवण्यात आली आहे. दुसरीकडे इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धावर मर्यादा आणण्यासाठी अमेरिकी सिनेटकडून आणलेल्या वॉर पावर्स रेजोल्यूशनला मंजुरी मिळालेली नाही. राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादीत करणाऱ्या या विधेयकात सैन्य कारवाई करण्याआधी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी घेणं बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती. पण या विधेयकाला मंजुरी मिळू शकली नाही. आता इराण सोबत कुठलीही चर्चा होणार नाही हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 05 Mar 2026 05:40 PM (IST)

    माणिकराव कोकाटे यांचे मंत्री पद गेल्याचे नाशिक महानगरपालिकेला विसर

    कृषी विभागाच्या कार्यालयाबाहेर अद्यापही माणिकराव कोकाटे मंत्री असल्याचा फलक आहे. कोकाटे कृषी मंत्री असताना नाशिक मनपाने लावला होता मंत्री पदाचा फलक. कृषिमंत्री पदाचा पदभार काढून क्रीडा मंत्री पदाचा दिला होता पदभार. मात्र, सदनिका गैरव्यवहार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर कोकाटे यांनी राजीनामा दिला होता. कोकाटे यांचा राजीनामा होऊन दोन ते अडीच महिने झाल्यानंतरही कृषिमंत्री पदाचा फलक कायम आहे.

  • 05 Mar 2026 05:17 PM (IST)

    बीड – गेवराई पोलिसांनी दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश

    बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या एका गोडाऊनवर गेवराई पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 17 दुचाकी तसेच एकूण 25 लाखाचे दुचाकींचे स्पेअर पार्टस सापडले आहेत. या प्रकरणी तिघांना अटक केले आहे.

  • 05 Mar 2026 04:58 PM (IST)

    अमेरिका, इस्त्रायलचा इराणच्या बंदरावर भीषण हल्ला

    अमेरिका, इस्त्रायलचा इराणच्या बंदरावर भीषण हल्ला

    हल्ल्यामध्ये इराणचं प्रचंड नुकसान

    आज युद्धाचा सहावा दिवस

    इराणकडूनही अमेरिका, इस्त्रायलच्या सैन्यावर हल्ले सुरूच

  • 05 Mar 2026 04:50 PM (IST)

    कल्याणमध्ये दुचाकी चोराला अटक

    कल्याण बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई

    आग्र्यावरून डुप्लिकेट चाव्या आणून दुचाकी लांबवणारा चोरटा गजाआड

    शाहरुख झाकीर हुसेन असे या सराईत चोरट्यांचे नाव

    पोलिसांनी आरोपी कडून ४ महागड्या दुचाकी केल्या जप्त

  • 05 Mar 2026 04:30 PM (IST)

    रिसोड शहरालगतच्या पॉवर हाऊस परिसरात भीषण आग

    रिसोड शहरालगतच्या पॉवर हाऊस परिसरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वाऱ्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले, त्यामुळे  परिसरातील झाडे-झुडपे जळून खाक झाली आहेत. आगमुळे महात्मा फुले नगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाने सुमारे ४५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

  • 05 Mar 2026 04:15 PM (IST)

    सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण

    जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण

    आज दिवसभरात सोन्याच्या दरात 1 हजार 500 रुपयांची तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची घसरण

    सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 65 हजार 315 रुपयांवर

    चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 72 हजार 915 रुपयांवर

    अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम झाल्याने सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू

  • 05 Mar 2026 04:00 PM (IST)

    इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले, तेहरान, करज या भागांनाही सोडलं नाही!

    इस्रायलकडून इराणवर ड्रोन डागले जात आहेत. इस्रायलने इराणच्या हमेदान या प्रांतात हर्मीस ड्रोन टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे ड्रोन इराणनी सैन्याने हाणून पाडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे तेहरान आणि करज या भागातही इस्रायलने हल्ले केले आहेत.

  • 05 Mar 2026 03:41 PM (IST)

    इस्रायलकडून तेहरानवर पुन्हा मोठे हल्ले

    मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने पुन्हा एकदा तेहरान शहराच्या काही भागांवर हल्ले केले आहेत. इराणी माध्यमांनी तसे वृत्त दिले आहे. या हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

  • 05 Mar 2026 03:18 PM (IST)

    इराणकडून अझरबैजानवर क्षेपणास्त्र हल्ले

    अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इराणने डागलेले अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन त्यांच्या देशात पडले आहेत. यातील एक क्षेपणास्त्र नखचिवन आंतरराष्ट्रीय विनानतळाच्या टर्मिलन इमारतीवर तर दुसरे क्षेपणास्त्र हे शकराबाद गावातील एका शाळेवर जाऊन आदळले आहे.

  • 05 Mar 2026 03:06 PM (IST)

    इराण इस्रायल यांच्यातील युद्धामुळे दक्षिण कोरियाचा मोठा निर्णय

    इराण इस्रायल यांच्यातील युद्धामुळे दक्षिण कोरियाने मोठा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपासून इराणला जाण्यावर बंदी घातली आहे.

  • 05 Mar 2026 02:55 PM (IST)

    आझाद मैदानात ई-चलन विरोधात आजपासून आंदोलन

    आझाद मैदानात ई-चलन विरोधात आजपासून आंदोलन. ई-चलनाच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने आंदोलनाची हाक. वाहतूकदार संघटनांकडून आझाद मैदानात आंदोलन. आंदोलनात रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक चालक सहभागी होणार

  • 05 Mar 2026 02:35 PM (IST)

    मुलुंडमधील जकात नाक्यावर ई-चलन प्रणालीविरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक

    मुलुंडमधील जकात नाक्यावर ई-चलन प्रणालीविरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक. वाहतूकदार संघटनांनी मुंबईकडे येणारा मार्ग रोखला. सुमारे पाचशे ते हजार वाहतूक व्यावसायिक आझाद मैदान येथे एकत्र येऊन आंदोलन करणार.. परिवहन मंत्र्यांसोबत बैठक निष्फळ ठरल्याने ठाण्यातील बस मालक संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला

  • 05 Mar 2026 02:25 PM (IST)

    अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची 47 लाखांना फसवणूक

    अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि मृणालिनी जांभळे यांची ४७ लाखांची फसवणूक. दिग्दर्शक तसेच बांधकामा व्यावसायिक अविनाश जाधव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

  • 05 Mar 2026 02:15 PM (IST)

    मुंबईत ई-चलन प्रणालीविरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक

    मुंबईत ई-चलन प्रणालीविरोधात वाहतूकदार संघटना आक्रमक. वाहतूकदार संघटनेचं कळंबोलीत आंदोलन. मुंबईकडे येणाऱ्या लेनवरील वाहने काही काळासाठी थांबवली. वाहतूकदार संघटनेच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा. सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

  • 05 Mar 2026 01:55 PM (IST)

    घरफोडी करणाऱ्या ‘सनी गँगच्या’ सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या बेड्या

    दिल्लीसह, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात खुनाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि विमानाने पुण्यात येऊन घरफोडी करणाऱ्या ‘सनी गँगच्या’ सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल पुणे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील चार पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपींकडून घरफोड्या करण्यात आल्या आहेत. तर आरोपींवर उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आकाश सुभाष आणि जितेंद्र चतुर्वेदी असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

  • 05 Mar 2026 01:45 PM (IST)

    30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर होईल- दत्तात्रय भरणे

    30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार याबाबत निर्णय घेतील. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध आहे, असं दत्तात्रय म्हणाले.

  • 05 Mar 2026 01:35 PM (IST)

    शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंचं नाव जवळपास निश्चित

    शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारेंचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेनेकडून राहुल शेवाळेंचा पत्ता कट करण्यात आल्याचं कळतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ज्योती वाघमारे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

  • 05 Mar 2026 01:25 PM (IST)

    शरद पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर आनंद दवेंची प्रतिक्रिया

    “पार्थ पवार यांना जेव्हा लोकसभेची उमेदवारी मिळाली होती, तेव्हा माननीय शरद पवारांनी त्यांची लोकसभेची उमेदवारी माघारी घेतली होती आणि कारण सांगितलं होतं की एकाच घरातील किती लोकांनी दिल्लीला जावं? माननीय पवार साहेब दिल्लीला जाणार आहेत. पुन्हा एकदा पार्थ जाणार आहे, सुप्रिया सुळे आहेत. विधानसभेत सुद्धा सुनेत्रा पवार आहेत, रोहित पवार आहेत. काय बोलावं कळत नाही. मात्र आम्ही पवार साहेबांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून दिली,” अशी प्रतिक्रिया हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली.

  • 05 Mar 2026 01:15 PM (IST)

    व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के सिंग यांची दीड तासांपासून सीआयडी ऑफिसमध्ये चौकशी सुरू

    व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के सिंग यांची दीड तासांपासून सीआयडी ऑफिसमध्ये चौकशी सुरू आहे. दिवंगत नेते अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांनी रोहित सिंग यांचा व्हीएसआर कंपनीच्या विमानामध्ये झोपलेला व्हिडिओ पोस्ट केला होता. पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये व्ही. के. सिंग यांची चौकशी सुरू आहे.

  • 05 Mar 2026 01:06 PM (IST)

    भाजपकडून 4 जणांचे राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज

    रामदास आठवलेंनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. विनोद तावडेंसह 2 उमेदवार थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. रामदास आठवलेंशिवाय विनोद तावडे, रामराव वडकुते आणि ईवनातेंचा अर्ज भरण्यात येणार आहे.

  • 05 Mar 2026 12:57 PM (IST)

    नागपूर – रस्त्यालगत सापडला मृतदे, माजली खळबळ

    नागपूर –  खापरखेडा ते कोराडी मार्गावरील रस्त्यावर एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आलं.  रस्त्यालगत मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.  अनैतिक संबंधाच्या संशयातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून मृत व्यक्तीची ओळख पटवंण्याचे व आरोपींचा शोध सुरू आहे.

  • 05 Mar 2026 12:44 PM (IST)

    मविआकडून शरद पवारांनी राज्यसभेसाठी दाखल केला अर्ज

    मविआकडून शरद पवार यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. संजय राऊत, सुप्रिया सुळे, हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत अर्ज भरला.  10 आमदारांनी सूचक आणि अनुमोदक म्हणू या अर्जावर सह्या केल्या.

  • 05 Mar 2026 12:41 PM (IST)

    पार्थ पवार विधान भवनात दाखल

    पार्थ पवार विधान भवनात दाखल, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ते अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित आहेत.

  • 05 Mar 2026 12:39 PM (IST)

    संजय राऊत, सुप्रिया सुळे विधानभवनात दाखल

    संजय राऊत, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे विधानभवनात दाखल झाले आहेत.  शरद पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हे सर्व जण तिथे पोहोचले आहेत. थोड्याच वेळात विधान भवनात महाविकास आघाडीची बैठकही होणार आहे.

  • 05 Mar 2026 12:26 PM (IST)

    नाशिक – फक्त ६ स्वीकृतस्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुकांचे अर्ज

    नाशिक –  स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे तब्बल 500 इच्छुकांचे अर्ज आले आहेत.  फक्त 6 स्वीकृत नगरसेवक पद आहे, मात्र ५०० जणांची स्पर्धा असल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पक्ष नेतृत्व योग्य निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.

  • 05 Mar 2026 12:14 PM (IST)

    आखातील देशातील युध्दामुळे सोलापूर जिल्हातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत

    आखातील देशातील युध्दामुळे सोलापूर जिल्हातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.  सोलापूर जिल्हातील २५ हजार टन केळी कोल्ड स्टोरेज मध्ये अडकून पडली आहेत. तर एकट्या माढा तालुक्यातील १०० हुन अधिक केळीचे कंटेनर केळी भरून उभे आहेत. आखाती देशातील इराण येथे सोलापूर जिल्हातून निर्यात होते. मात्र सध्या सुरू असलेल्या युध्दाचा थेट परिणाम केळी उत्पादक शेतकऱ्यांनप  झाला असून कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

  • 05 Mar 2026 12:05 PM (IST)

    VSR कंपनीचा मालक रोहित सिंहची CID चौकशी सुरू

    VSR कंपनीचा मालक रोहित सिंहची CID चौकशी सुरू झाली आहे. जय पवार यांनी रोहित सिंगचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याने मोठी खळबळ माजली होती.

  • 05 Mar 2026 11:57 AM (IST)

    जामखेड येथे गोळीबार झालेला सागर मोहळकर उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात…

    जामखेड येथे गोळीबार झालेला सागर मोहळकर उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  सागर मोहोळकरची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. काल जामखेड येथे न्युरानी काँलनी येथे सात साडेसात वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. जखमी मोहोळकरला उपचारासाठी अहिल्यानगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र आज सकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले…

  • 05 Mar 2026 11:47 AM (IST)

    तळकोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

    आकर्षक, कल्पक आणि भव्यदिव्य असे वैविध्यपूर्ण चित्ररथ देखावे मांड उत्सवात लक्षवेधी असतात. चलचित्रांसोबतच पारंपरिक वेशभूषेचा साज, विविध सोंगांसह खेळांच्या कलाविष्काराचे अप्रतिम सादरीकरण करीत कलाकार उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकतात. अफाट गर्दी, नेत्रदीपक तसेच भव्यदिव्य, पौराणिक देखावे पाहण्यासाठी सिंधुदुर्गासह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो रसिक प्रेक्षकांनी गर्दी केली आहे.

  • 05 Mar 2026 11:35 AM (IST)

    बोगस प्रमाणपत्रांच्या साह्याने बांधकाम कामगार कल्याण मंडळातील अधिकाऱ्यांनीच लाटले 3 कोटी 62 लाख रुपये

    भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी तारांकित प्रश्न मांडण्यापूर्वीच 3 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची मुले परराज्यात उच्चशिक्षण घेत असल्याचे बोगस प्रमाणपत्र दाखवत शिष्यवृत्तीचे 3 कोटी 26 लाख लाटले. या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोषसिंग राजपूत आणि उज्वल सूर्यवंशी यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना आहे. कामगारांच्या पाल्यांना उच्चशिक्षणासाठी प्रतिवर्षी प्रत्येकी 60 हजार रुपये शासनाकडून मिळतात.  सोलापूर जिल्ह्यात सुमारे एक लाखांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांची नोंद आहे. त्यातील बांधकाम कामगार कल्याण विभागाकडे यातील 223 लाभार्थ्यांनी सहा महिन्यांपूर्वी आपल्या पाल्यांच्या नावे पैसे उचलल्याची तक्रार दिली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. तत्कालीन कामगार आयुक्तांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबत अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला आहे. मात्र हा प्रश्न मांडण्यापूर्वीच सहाय्यक कामगार आयुक्तांकडून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

  • 05 Mar 2026 11:20 AM (IST)

    राजगृहात शिवसेना नेता आमदार संजय शिरसाट प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला

    राजगृहात शिवसेना नेता आमदार संजय शिरसाट प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला आले आहेत.  दादरमधील राजगृह येथे भेटीला आले.  आबासाहेब कर्डक यांच्या स्मारक आणि सुशोभीकरणासाठी विशेष आमंत्रण देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरही दोघांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 05 Mar 2026 11:16 AM (IST)

    ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चैत्र नवरात्रीचे आयोजन

    दरवर्षी प्रमाणे ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात तुकाराम मैदानात शिवसेनेच्या वतीने शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चैत्र नवरात्रीचे आयोजन केले जात असते …आज देवीच्या मंडपाची भूमिपूजन सोहळा पार पडत आहे..स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूजा अर्चा करत आहे……थोड्याच वेळात भूमिपूजन पार पडणार आहे ..अनेक शिवसैनिक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित आहेत….

  • 05 Mar 2026 10:58 AM (IST)

    जळगावातील चटई उद्योगाला युद्धाचा फटका, 40 ते 50 कोटींचे नुकसान

    अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू युद्धाचा मोठा फटका जळगाव जिल्ह्यातील चटई उद्योगाला बसला आहे. राज्यातीला सर्वात मोठा चटई उद्योग हा जळगावमध्ये आहे. जळगावातील १५० चटई उद्योगांमधून आकाराला येणाऱ्या चटई देशाच्या विविध भागांसह २५ वेगवेगळ्या देशांमध्ये निर्यात होते. जळगावातून आखाती देशांमध्ये होणारी चटईची निर्यात युद्धामुळे ठप्प झाल्याने 40 ते 50 कोटी रुपयांच्या नुकसानीला चटई उद्योजकांना सामोरे जावे लागत आहे. अमेरिका व इराण यांच्यात सुरू युद्धामुळे सात देशांनी चटईची मागणी थांबविली आहे. त्यामुळे  उद्योगांचे नियोजन कोलमडल्याचे पाह्यला मिळत आहे.

  • 05 Mar 2026 10:48 AM (IST)

    महाविकासआघाडीची विधानभवनात आज बैठक, सर्व आमदार उपस्थित राहणार

    महाविकासआघाडीची विधानभवनात दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाविकासआघाडीतील सर्व आमदारही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला उद्धव ठाकरे, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत.

  • 05 Mar 2026 10:36 AM (IST)

    नाशिकच्या ज्योतिषाविरोधात लूक आउट नोटीस जारी, 12 कोटींची केली फसवणूक

    नाशिकच्या ज्योतिषाविरोधात लूक आउट नोटीस जाहीर करण्यात आली आहे. ज्योतिष सचिन देशमुख याच्या विरोधात लूक आऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी ही नोटीस बजावली असून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्याने फसवणूक केली होती. लोकांना भविष्य सांगतांनाच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून जादा परताव्याचे आमिष दाखवले होते. हा फसवणुकीचा आकडा 12 कोटींवर पोहोचला आहे. त्याने तब्बल 50 ते 60 जणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  या ज्योतिषाच्या कार्यालयाला पोलिसांनी सील केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सचिन देशमुख हा फरार झाला आहे.

  • 05 Mar 2026 10:25 AM (IST)

    विलीनीकरण दंतकथा, ही दंतकथा आता संपलीय – संजय राऊत

    विलीनीकरण दंतकथा आहे. ही दंतकथा आता संपलीय. काल सर्वानुमते शरद पवारांच्या नावाला सहमती मिळाली आहे. संख्याबळ पाहता आदित्य ठाकरेंची भूमिका योग्य होती, असे संजय राऊत म्हणाले.

  • 05 Mar 2026 10:16 AM (IST)

    शरद पवार महाविकासआघाडीच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार – संजय राऊत

    शरद पवार महाविकासआघाडीच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार आहेत. शरद पवार यांच्या उमेदवारीला काँग्रेस आणि ठाकरेंनी पाठिंबा दिला आहे. काल सर्वानुमते शरद पवारांच्या नावाला सहमती दर्शवली आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

  • 05 Mar 2026 10:09 AM (IST)

    इराणकडून इस्त्रायलच्या प्रमुख शहरांमध्ये बॅलस्टिक क्षेपणास्त्राने हल्ले

    इराणकडून इस्त्रायलच्या प्रमुख शहरांमध्ये बॅलस्टिक क्षेपणास्त्राने हल्ले करण्यात येत आहेत तेल अवीवमध्ये इराणी बॅलिस्टिक मिसाईलने हल्ला केला आहे. इरणी बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

  • 05 Mar 2026 09:50 AM (IST)

    अमेरिका इराण युद्धाचा फटका थेट भारताला

    अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम थेट भारताला बसताना दिसत आहे. भारता आयात होणारा एलपीसी गॅस पूर्णपणे बंद झाला

  • 05 Mar 2026 09:40 AM (IST)

    मुंबई, ठाणे, कोकणाला ‘यलो अलर्ट’, दादर चौपाटी परिसरात पहाटेच उन्हाचे चटके

    आर्थिक राजधानी मुंबईमध्ये उष्णतेची लाट तीव्र; तापमान थेट ३९ अंशांवर. दादर परिसरात पहाटेपासूनच उन्हाचे चटके; मॉर्निंग वॉकसाठी गर्दी घटली. दुपारी ३८°C ते ४०°C दरम्यान तापमान जाण्याची शक्यता; उकाडा असह्य. मंगळवार-बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात ३ अंशांची वाढ. फेब्रुवारीत ३६.३°C असलेला पारा मार्चच्या सुरुवातीलाच उच्चांकावर. मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून टोपी, गॉगल्स, पाण्याच्या बाटल्यांचा आधार.

  • 05 Mar 2026 09:30 AM (IST)

    शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दूधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड

    रात्री दूध खरेदी करुन दुध गरम केले तेव्हा दुधाचा रबरा सारखा बनला गोळा. दुध उकळल्यानंतर दुधाचा रबरा सारखा झाला होता गोळा. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील आशाबाई बोरसे यांनी खरेदी केले होते दुध. नेहमीच्या दुधवाल्याकडून दुध घेत असतांना पहिल्यांदाच घडला हा धक्कादायक प्रकार. यापूर्वी शिरपूर शहारत देखील भेसळयुक्त दुधाची घडली होती गंभीर घटना

  • 05 Mar 2026 09:20 AM (IST)

    वसई विरार महापालिकेचा दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

    सुर्या टप्पा 01 जुनी सुर्या योजना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नाल्यामध्ये ना दुरुस्त झाली असल्याने, भरती , ओहोटी वेळी काम करावे लागत असल्याने कामास अडथळा निर्माण होत आहे. जुन्या योजने अंतर्गत होणारा 100 द ल ली पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू असून, उध्या 6 मार्च पर्यंत नादुरुस्त पाईपलाईन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे असे अहवान पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र ठाकरे यांनी केले आहे.

  • 05 Mar 2026 09:05 AM (IST)

    पाकिस्तान आणि दुबईतून बाहेर पडा…

    पाकिस्तान आणि दुबईतून लवकरात लवकर बाहेर पडा, असे थेट आपल्या नागरिकांना अमेरिकेने सांगितले आहे.

  • 05 Mar 2026 08:57 AM (IST)

    दुध गरम केले तेव्हा दुधाचा रबरा सारखा बनला गोळा

    शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दूधाचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघड. रात्री दूध खरेदी करुन दुध गरम केले तेव्हा दुधाचा रबरा सारखा बनला गोळा. दुध उकळल्यानंतर दुधाचा रबरा सारखा झाला होता गोळा. शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील आशाबाई बोरसे यांनी खरेदी केले होते दुध. नेहमीच्या दुधवाल्याकडून दुध घेत असतांना पहिल्यांदाच घडला हा धक्कादायक प्रकार.

  • 05 Mar 2026 08:45 AM (IST)

    दादर चौपाटी परिसरात पहाटेच उन्हाचे चटके; मुंबईत पारा ३९°C वर, मुंबई, ठाणे, कोकणाला ‘यलो अलर्ट’

    आर्थिक राजधानी मुंबईमध्ये उष्णतेची लाट तीव्र; तापमान थेट ३९ अंशांवर. दादर परिसरात पहाटेपासूनच उन्हाचे चटके; मॉर्निंग वॉकसाठी गर्दी घटली. दुपारी ३८°C ते ४०°C दरम्यान तापमान जाण्याची शक्यता; उकाडा असह्य. मंगळवार-बुधवारच्या तुलनेत कमाल तापमानात ३ अंशांची वाढ. फेब्रुवारीत ३६.३°C असलेला पारा मार्चच्या सुरुवातीलाच उच्चांकावर.

  • 05 Mar 2026 08:38 AM (IST)

    युद्धामुळे पुण्यातून होणारी चार ते पाच टन मालवाहतूक थांबली

    इस्रायल अमेरिका इराण युद्धामुळे दोन हजार हवाई प्रवाशांना तर चार टन मालाच्या वाहतुकीला फटका. दुबई अबुधाबीची आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने मालवाहतूक ठप्प झाली आहे. पाच दिवसांमध्ये पुणे विमानतळावरून होणारी चार ते पाच टन मालवाहतूक थांबली आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो मध्ये सर्वाधिक 70 टक्के वाटा ऑटो पार्ट्स आहे तसेच फळे भाजीपाला आणि अन्नपदार्थ हे पुण्यातील शेतकऱ्यांकडे परत पाठवले जात आहेत.

  • 05 Mar 2026 08:35 AM (IST)

    पुण्यात विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध

    पुण्यातील न्हावी गावातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कपाळावर टिळा लावून शाळेत येण्यास विरोध केल्याचा आरोप मुख्याध्यापक एस. एन. कांबळे यांच्यावर झाला आहे. ही बाब समजताच शिव प्रतिष्ठानच्या धारकऱ्यांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना जाब विचारत गोंधळ घातला

  • 05 Mar 2026 08:27 AM (IST)

    अमेरिकेत वॉर पावर्स रेजोल्यूशन विधेयक नामंजूर

    इराण विरुद्ध सुरु असलेल्या युद्धावर मर्यादा आणण्यासाठी अमेरिकी सिनेटकडून आणलेल्या वॉर पावर्स रेजोल्यूशनला मंजुरी मिळालेली नाही. राष्ट्रपतींचे अधिकार मर्यादीत करणाऱ्या या विधेयकात सैन्य कारवाई करण्याआधी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी घेणं बंधनकारक करण्याची मागणी करण्यात आली होती.

  • 05 Mar 2026 08:26 AM (IST)

    इस्रायलचं मोठं आर्थिक नुकसान

    इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धाला 6 दिवस झाले आहेत. यामुळे इस्रायली अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. दर आठवड्याला $2.9 अब्जपेक्षा अधिक नुकसान होत आहे. शाळा बंद आहेत. अर्थ मंत्रालय नुकसान कमी करण्यासाठी प्रतिबंधांमध्ये सवलत देण्यावर विचार करत आहेत.

Published On - Mar 05,2026 8:24 AM

Follow Us
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणानंतर मोठा बदल, कंपनीतील उच्चपदस्थांनी घेतला.
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष
मोठी बातमी! महिला आरक्षणबाबत पंतप्रधान मोदींची पुढची रणनिती तयार, भविष.
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र
महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा न देऊन विरोधकांनी... पंतप्रधान नेरेंद्र.
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या
मोठी बातमी! नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानच्या त्या.