Iran Israel News LIVE : युद्ध अजून संपलेले नाही – भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर

Iran Supreme Leader Ayatollah ali Khamenei Death news LIVE Updates : इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर इराणमध्ये ४० दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे.

Iran Israel News LIVE : युद्ध अजून संपलेले नाही - भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर
Ayatollah Ali Khamenei Killed
| Edited By: | Updated on: Mar 02, 2026 | 7:45 AM

अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणवर अत्यंत मोठा हल्ला केला.युद्धाला सुरूवात झाली आहे. इराणवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये युद्धाचे सायरन वाजली. इस्त्रायलने हा हल्ला केल्यानंतर म्हटले की, आमच्यावर हल्ला होणार होता, यामुळे आम्ही हल्ला केला. इराणमधील सरकारी इमारतींना टार्गेट केले जात आहे. इराण आणि अमेरिकेत प्रचंड तणाव वाढलेला असता हा हल्ला करण्यात आला. इराणमधील सत्तासंघर्षाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या ऐतिहासिक घटनेमुळे पश्चिम आशियातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. यामुळे इराणमध्ये ४० दिवसांचा शोक जाहीर करण्यात आला आहे, असा दावा इराणच्या प्रेस टीव्ही केला आहे. इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला असून इराणच्या जनतेसाठी ही देश परत मिळवण्याची मोठी संधी आहे, असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Mar 2026 06:53 PM (IST)

    युद्ध अजून संपलेले नाही – भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर

    इस्रायल-इराण संघर्षाबाबत, भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी युद्ध अजून संपलेले नाही असे म्हटले आहे. हे खूप मोठे यश आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील इस्रायल संरक्षण दलाने एकत्रित ऑपरेशन केले.आम्ही त्या व्यक्तीचा खात्मा केला आहे जो दशकांपासून अनेक इस्रायली आणि अमेरिकन लोकांना मृत्यूला कारणीभूत होता. पंतप्रधान नेतन्याहू यांनी म्हटल्याप्रमाणे, इराणमधील २,५०० हून अधिक लष्करी टार्गेटना लक्ष्य करून ऑपरेशन सुरू ठेवत आहोत.

  • 01 Mar 2026 06:41 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची बैठक बोलावली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची बैठक बोलावली आहे. इराण – इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता या बैठकीला महत्व आले आहे.

  • 01 Mar 2026 05:44 PM (IST)

    खामेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात तणाव, लोक उतरले रस्त्यावर

    इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसत आहे. परंतु आता पाकिस्तानातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानात अनेक ठिकाणी शहरांत लोक रस्त्यावर उतरले आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात लोक आंदोलन करत आहेत.

  • 01 Mar 2026 05:33 PM (IST)

    ओमान येथे ऑईल टँकरवर भीषण हल्ला, 4 जण जखमी

    ओमान येथे एका ऑईल टँकरवर हल्ला करण्यात आला आहे. मुसंदम तटावर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. या जहाजात 20 क्रू मेंबर, 15 भारतीय नागरिक, 5 इराणी नागरिक होते. हे सर्वजण सध्या सुरक्षित आहेत. या हल्ल्यात मात्र चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

  • 01 Mar 2026 05:33 PM (IST)

    रशियाचा अमेरिकेवर संताप, इराण-इस्रायल युद्धादरम्यान केला गंभीर आरोप

    इराण-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता रशियाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत आहे, असे रशियाने म्हटले आहे. रशियाने एका प्रकारे अमेरिकेचा निषेधच केला आहे.

  • 01 Mar 2026 05:20 PM (IST)

    उन्हाळी रब्बी हंगाम जोमात, भात रोवणीमुळे महिलांच्या हाताला काम

    गोंदिया जिल्ह्यात सध्या उन्हाळी रब्बी हंगामातील भात लागवड जोमात सुरू असून शेतकरी शेतीच्या कामात पूर्णपणे व्यस्त झाले आहेत. पेरणीनंतर आता रोवणीच्या कामाला वेग आला असून शेतांमध्ये महिलांची लगबग पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या रोवणीमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे…. 
  • 01 Mar 2026 05:09 PM (IST)

    सिंधुदुर्ग- कोकणात  जलवाहतुकीचा नवीन अध्याय सुरू

    सिंधुदुर्ग- कोकणात  जलवाहतुकीचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. मुंबईतून निघालेली सागरी रो-रो सेवा विजयदुर्ग बंदरापर्यंत पोहोचली आहे.  अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई कोकण सागरी रो रो सेवा आता सुरू झाली आहे.  मुंबई ते विजयदुर्ग अशी रो पॅक्स प्रवासी बोट पहिल्यांदाच विजयदुर्ग किनाऱ्याला आली आहे.
  • 01 Mar 2026 04:54 PM (IST)

    तेहरानमधील 7 महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले, नागरिक भयभीत

    तेहरानमधील सात ठिकाणी झालेल्या हल्ल्यांनंतर इराणी लोक घाबरले आहेत. तेहरानच्या विमानतळाच्या परिसरातील सात ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे. यातील काही हल्ले हे हॉटेल्स आणि मॉल्सजवळ झाले आहेत. त्यामुळे इराणी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • 01 Mar 2026 04:40 PM (IST)

    इराणवर शक्तिशाली हवाई हल्ले सुरू ठेवणार: इस्रायल

    इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘इराणी राजवटीशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून सैन्य शक्तिशाली हल्ले करत आहे. इराणमधील लक्ष्यांवर निशाणा साधून आम्ही हवाई हल्ले सुरू ठेवू.’

  • 01 Mar 2026 04:26 PM (IST)

    इराणच्या संरक्षण दलाचे प्रमुख अब्दुल रहीम मौसावी यांच्या हत्येचा इस्रायलचा दावा

    इस्रायल संरक्षण दलांनी दावा केला आहे की इराणच्या सशस्त्र दलाचे प्रमुख अब्दुल रहीम मौसावी मारले गेले आहेत. तसेच आयडीएफने तेहरानमध्ये इराणच्या सर्वोच्च सुरक्षा नेतृत्वातील सात सदस्य आणि 40 वरिष्ठ कमांडर मारले असल्याचेही इस्रायलने म्हटले आहे.

  • 01 Mar 2026 04:14 PM (IST)

    अयातुल्लाह अलिरेझा अराफी यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती

    अयातुल्लाह अली खमेनी यांच्या मृत्यूनंतर वरिष्ठ धर्मगुरू अयातुल्लाह अलिरेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात खमेनी यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आता अराफी हे सर्वोच्च पद सांभाळणार आहेत.

  • 01 Mar 2026 04:03 PM (IST)

    इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी

    अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे, याबाबत अमेरिका आणि इस्रायलकडून आधीच माहिती देण्यात आली होती. मात्र आता इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानं देखील अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.

  • 01 Mar 2026 03:47 PM (IST)

    इस्रायल, इराण युद्धाचा भारतीय विमान सेवेला फटका

    इस्रायल, इराण युद्धाचा भारतीय विमान सेवेला फटका

    विमान सेवा विस्कळीत

    दिल्ली विमानतळावरील 60 उड्डाणं रद्द

    युद्धामुळे प्रवाशांचे हाल

  • 01 Mar 2026 03:23 PM (IST)

    Iran US War : एअर इंडिया, इंडिगोचा मोठा निर्णय; अनेक उड्डाण रद्द

    शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला, या हल्ल्यानंतर भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. मध्य पूर्वेत मोठा तणावर असून, या सर्व पार्श्वभूमीवर एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला असून, जवळपास मध्य पूर्वेतील सर्वच विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.

  • 01 Mar 2026 03:10 PM (IST)

    इस्रायलच्या तेल अवीववर इराणचा हल्ला

    मोठी बातमी समोर येत आहे अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर हल्ले सुरूच आहेत. त्याला इराणकडून देखील प्रत्युत्त दिलं जात आहे. आता इराणकडून थेट इस्रायलच्या तेल अवीव शहरातील काही भागांमध्ये मोठा हल्ला करण्यात आला आहे.

     

     

  • 01 Mar 2026 01:55 PM (IST)

    डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणकडून फतवा जारी 

    युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणकडून फतवा जारी करण्यात आला आहे. इराणच्या पवित्र जामकरन मशिदीवर लाल ध्वज फडकावण्यात आला आहे. खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी ध्वज फडकावला आहे. दरम्यान इराणकडून आता ओमानच्या बंदरावर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे.

     

  • 01 Mar 2026 01:45 PM (IST)

    खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमधील शिया समुदाय आक्रमक

    खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमधील शिया समुदाय आक्रमक झाला आहे. पाकिस्तानात निदर्शनं केली जात असून जमावानं UN च्या कार्यालयाला आग लावली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे.

  • 01 Mar 2026 01:30 PM (IST)

    नेपाळहून ओमानला जाणाऱ्या महिला मुंबई विमानतळावर अडकल्या

    नेपाळहून ओमानला जाणाऱ्या महिला मुंबई विमानतळावर पोहोचल्या होत्या. पण त्यांची फ्लाइट रद्द झाल्यामुळे त्या कालपासून मुंबई विमानतळावर अडकल्या आहेत. या सर्व नेपाळी महिला नोकरीसाठी ओमानला जात होत्या, पण आता त्या जाऊ शकणार नाहीत. या सर्व नेपाळी महिला संध्याकाळच्या विमानाने नेपाळला परतणार आहेत.

  • 01 Mar 2026 01:12 PM (IST)

    आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी मीडियाकडून व्हिडीओ जारी

    इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी मीडियाकडून व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. बलिदान व्यर्थ जाणार नाही, किंमत मोजावी लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

  • 01 Mar 2026 01:00 PM (IST)

    इराणला ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

    इराणने जर आमच्या लष्करी, नौदल तळावर हल्ले केले तर मग इतके हल्ले करू की त्याची इराणी लष्कराने कल्पना केली नसेल असा निर्वाणीचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्यामुळे आज इराणवर मोठे हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • 01 Mar 2026 12:50 PM (IST)

    इराणमध्ये दोन गट भिडणार?

    एकीकडे इराणमध्ये खोमेनी यांच्या मृत्यूने त्यांचे लाखो समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. तेहरान आणि इतर शहरात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत. तर त्याचवेळी काही शहरांमध्ये खोमेनी यांचे पुतळे पाडून आनंद साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे इराणमध्ये दोन गट लवकरच भिडतील आणि अशांतता माजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

     

  • 01 Mar 2026 12:40 PM (IST)

    कराचीमध्ये अमेरिकन दुतावासाची तोडफोड

    पाकिस्तानचे व्यापारी शहर कराचीमध्ये अमेरिकन दुतावासाची तोडफोड करण्यात आली. इराणवरील हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानमधील नागरिक रस्त्यावर उतरले आहे. इस्लामाबादमधील दुतावासाला संरक्षण देण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. नागरिकांनी कराचीमधील अमेरिकन दुतावासाला आग लावली आणि तिथल्या गाड्याही जाळल्या.

  • 01 Mar 2026 12:30 PM (IST)

    चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू

    अब्दोल रहीम मौसवी या इराणच्या चीफ ऑफ स्टफचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. इराणमध्ये अमेरिका-इस्त्रायलकडून हल्ले सुरू आहे. एका हल्ल्यात चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाला. इराणच्या लष्कराला एकामागून एक धक्के बसत आहेत. त्यांचे अनेक नेते ठार झाले आहेत.

  • 01 Mar 2026 12:20 PM (IST)

    पुतळे पाडण्यास सुरुवात

    खोमेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विरोधक आणि अनेक नागरिक शहरातील रस्त्यावर उतरले. त्यांनी खोमेनी यांचे पुतळे पाडण्यास सुरुवात केली आहे. अनेक मुस्लिम महिलांनी आनंद साजरा केला. त्यामुळे इराणमध्ये लवकरच यादवी पेटण्याची भीती व्यक्त होत आहे.

  • 01 Mar 2026 12:10 PM (IST)

    एंगेलाब चौकात निदर्शने

    खोमेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये शोकाकूल वातावरण आहे. त्यांचे समर्थक आणि नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी तेहरानमधील एंगेलाब चौकात निदर्शने करण्यात आली. अनेक नागरीक शोक व्यक्त करत आहेत. अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.

  • 01 Mar 2026 12:00 PM (IST)

    इराणला चोख प्रत्युत्तर द्या-डोनाल्ड ट्रम्प

    इराणने अमेरिकेच्या लष्करी तळावर पुन्हा हल्ले चढवले. अमेरिका आणि इस्त्रायलला धडा शिकवू असा इशारा इराणच्या NSA ने दिला आहे. त्यावर आता इराणला चोख प्रत्युत्तर द्या असे डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्कराला आदेश दिले आहे.

  • 01 Mar 2026 11:55 AM (IST)

    इराकच्या इबलिस विमानतळावर हल्ला

    इस्त्रायलने इराणच्या अनेक विमानतळांवर हल्ले केले आहेत. इराणचे इबलिस विमानतळ उद्धवस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. इस्त्रायलने इराणची अनेक विमानतळे उद्धवस्त केल्याची माहिती समोर आली आहे.

  • 01 Mar 2026 11:40 AM (IST)

    तेल अवीववर भीषण हल्ला

    इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या युद्ध पेटले आहे. दोन्ही देश एकमेकांच्या महत्त्वाची ठिकाणे उद्धवस्त करताना दिसत आहेत. आता इस्त्रायलने इराणच्या थेट तेल अवीववर हल्ला केला आहे.

  • 01 Mar 2026 11:30 AM (IST)

    अमेरिका इराण युद्धाचा थेट परिणाम देशातील हवाई वाहतूकवर

    अमेरिका इराण युद्धाचा थेट परिणाम देशातील हवाई वाहतूकवर झाला आहे. पुण्यातून आखाती देशात जाणारी अनेक विमाने रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, आखातात होणारी विमान वाहतूक सध्या संपूर्णतः थांबवण्यात आली आहे ही विमानसेवा कधी सुरू होणार याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.

  • 01 Mar 2026 11:15 AM (IST)

    स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

    कांद्याच्या घसरत्या बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. विंचूर येथे बाजार समितीच्या समोर नाशिक-छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास लोकप्रतिनिधींना नाशिक जिल्ह्यात फिरून देणार नसल्याचा दिला इशारा..

  • 01 Mar 2026 10:55 AM (IST)

    खामेनेई यांच्या निधनानंतर मस्जिदवरील ध्वज काळा करण्यात आला

    इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी इमाम रझा मस्जिदवरील ध्वज काळा करण्यात आला.

  • 01 Mar 2026 10:50 AM (IST)

    इराणसोबत चर्चा करणं आता सोपं झालं- ट्रम्प

    इराणसोबत चर्चा करणं आता सोपं झालं. खामेनींच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. इराणचा कारभार चालवण्यासाठी 3 जणांची समिती स्थापन. राष्ट्रपती, सरन्यायाधीश यांचा समितीत समावेश.

  • 01 Mar 2026 10:46 AM (IST)

    पुण्यातील 80 विद्यार्थी दुबईत अडकले

    इस्त्राईल आणि इराण यांच्यात वाढलेल्या युद्धजन्य तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमधील हवाई वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे दुबईमध्ये गेलेले अनेक भारतीय नागरिक विद्यार्थी अडकले असून ते परतीच्या प्रतीक्षेत आहेत पुण्यातील 80 विद्यार्थी देखील दुबईत अडकले असून हवाई वाहतूक सुरळीत झाल्यानंतर या विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांचा परतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

  • 01 Mar 2026 10:40 AM (IST)

    अमेरिकेला याची किंमत मोजावी लागणार, इराणचा इशारा

    सर्वोच्च नेते गमावल्याचं आम्हाला दु:ख… अमेरिकेला याची किंमत मोजावी लागणार… सर्वात मोठा प्रतिहल्ला करणार… खामेनींच्या मृत्यूनंतर इराणचा इशारा…

  • 01 Mar 2026 10:30 AM (IST)

    इस्रायलच्या IDF मुख्यालयावर इराणचा हल्ला

    इस्रायलच्या IDF मुख्यालयावर इराणचा हल्ला करण्यात आला आहे.

  • 01 Mar 2026 10:30 AM (IST)

    इराणच्या हल्ल्याचा कतारकडून निषेध व्यक्त

    इराणच्या हल्ल्याचा कतारकडून निषेध व्यक्त…इराणला योग्य उत्तर दिलं जाईल…कतारचा इराणला इशारा…

  • 01 Mar 2026 10:20 AM (IST)

    इस्रायलमधील तणावामुळे भारतातील ड्रायफ्रूट आयात धोक्यात

    अमेरिका इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे भारतातील ड्रायफ्रूट आयात धोक्यात.. एपीएमसी वाशी, क्रॉफर्ड मार्केट, मस्जिद बंदर, मालाडमध्ये दरवाढीची चर्चा.. मिठाई, हॉटेल, बेकरी, केटरर्स आणि फूड इंडस्ट्रीला मोठा फटका बसण्याची शक्यता..

  • 01 Mar 2026 10:08 AM (IST)

    अयातुल्लाह खामेनींचा मृत्यू, अमेरिकन नागरिकांचा जल्लोष

    इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनींचा अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात मृत्यू.. वॉशिग्टन डीसी शहरात हजारो अमेरिकन नागरिकांचा जल्लोष.. तर मुस्लिम समुदायाकडून वॉशिंग्टन शहरात अल्ला हु अकबरच्या घोषणा..

  • 01 Mar 2026 09:50 AM (IST)

    इराण करणार अमेरिकेवर हल्ला

    अमेरिका इस्रायल इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इराण अधिक आक्रमक भूमिका घेतान दिसतोय. अमेरिकेवर हल्ला करण्याची थेट धमकी देण्यात आलीये.

  • 01 Mar 2026 09:40 AM (IST)

    अमेरिका इस्रायल इराण युद्धाचे जागतिक पडसाद; बाजारात अस्थिरता

    युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरांवर दबाव असल्याने पेट्रोल दरात वाढ होण्याच्या चर्चा. पेट्रोल दर वाढीची शक्यता; असली तरी मुंबई आणि आसपासच्या उपनगरात पेट्रोल पंप वर पेट्रोलचे भाव स्थिर. मुंबईत आजही पेट्रोल 103.50 रुपये प्रति लिटर कायम. तेल कंपन्यांनी किरकोळ दरात केलेला नाही कोणताही बदल. जागतिक तणावाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम?. वाहनचालकांना तात्पुरता दिलासा, पण अनिश्चितता कायम

     

  • 01 Mar 2026 09:20 AM (IST)

    इस्त्रायलच्या शाळांना सुट्टी जाहीर, युद्ध पेटले…

    इस्त्रायलच्या शाळांना सुट्टी जाहीर, इराणच्या हल्ल्यात काही विद्यार्थ्यांचा जीव गेल्याची माहिती.

  • 01 Mar 2026 09:12 AM (IST)

    इराणच्या नव्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा

    इराणच्या नव्या उत्तराधिकाऱ्याची मोजतबा खामेनी यांच्याकडे जबाबदारी असून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीये.

  • 01 Mar 2026 09:10 AM (IST)

    आयातुल्ला अली खामेनेई हल्ल्यात ठार

    अमेरिका आणि इराणने केलेल्या हल्ल्यात आयातुल्ला अली खामेनेई ठार झाले आहेत. आता नव्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा करण्यात आलीये.

  • 01 Mar 2026 08:59 AM (IST)

    आयातुल्ला अली खामेनेई यांचा वारसा पुढे नेऊ, इराणी लष्कराचे आवाहन

    इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने अधिकृत निवेदनाद्वारे आयातुल्ला अली खामेनेई यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना शहीद घोषित केले आहे. या हल्ल्यासाठी थेट अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरत, IRGC ने कठोर बदला घेण्याचा इशारा दिला आहे. तसेच आयातुल्ला अली खामेनेई यांचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेतली आहे, तसेच या संकटाच्या काळात जनतेला एकजूट राहण्याचे आवाहन इराणी लष्कराने केले आहे.

  • 01 Mar 2026 08:47 AM (IST)

    इराणच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी शर्यत सुरु, आयातुल्ला अली खामेनेई यांच्यानंतर प्रमुख दावेदार कोण?

    अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता इस्लामिक रिपब्लिक इराणमध्ये सत्तेची नवी कोंडी निर्माण झाली आहे. इराणी राज्यघटनेतील ‘विलायत-ए-फकीह’ तत्त्वानुसार, आता नवीन सर्वोच्च नेत्याची निवड करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. या शर्यतीत खमेनी यांचे पुत्र मोजतबा खमेनी आणि संस्थापक अयातुल्ला खोमेनी यांचे नातू हसन खोमेनी यांची नावे प्रमुख दावेदार म्हणून समोर येत आहेत.

  • 01 Mar 2026 08:37 AM (IST)

    आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सत्तेची पोकळी

    १९७९ च्या क्रांतीनंतर आयातुल्ला रुहोल्लाह खोमेनी यांच्यानंतर आयातुल्ला अली खामेनेई यांनी इराणची धुरा सांभाळली होती. इराणच्या सर्व प्रमुख धोरणांवर त्यांचा अंतिम शब्द असायचा. मात्र, आता त्यांचा कोणताही अधिकृत उत्तराधिकारी नाही. त्यामुळे इराणमध्ये सत्तेची पोकळी निर्माण झाली आहे. इराणच्या भविष्याबद्दल आता जगभरात शंका व्यक्त केल्या जात आहेत.

  • 01 Mar 2026 08:27 AM (IST)

    इस्रायल आणि अमेरिकेचे हवाई हल्ले सुरूच राहणार, ट्रम्प यांचा दावा

    इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याला मोठे यश आल्याचे सांगितले आहे. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, जरी खामेनेई मारले गेले असले, तरी इराणमधील लष्करी ठिकाणांवर अमेरिकेचा बॉम्बहल्ला पुढील आठवडाभर किंवा त्याहून अधिक काळ सुरू राहील. जगभरात शांतता प्रस्थापित करण्याचे ध्येय साध्य होईपर्यंत ही कारवाई थांबणार नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

  • 01 Mar 2026 08:17 AM (IST)

    इराणी लष्कर आणि पोलिसांनी शांतता राखावी – डोनाल्ड ट्रम्प

    अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आयातुल्ला अली खामेनेई यांना इतिहासातील सर्वात वाईट व्यक्तींपैकी एक म्हटले आहे. आमच्या गुप्तचर संस्था आणि अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टिमपासून खामेनेई वाचू शकले नाहीत. ही इराणी जनतेसाठी त्यांचे नशीब स्वतःच्या हातात घेण्याची सर्वात मोठी संधी आहे. यामुळे इराणी लष्कर आणि पोलिसांनी शांतता राखावी, असे आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

  • 01 Mar 2026 08:08 AM (IST)

    इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत – डोनाल्ड ट्रम्प

    इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला आहे. इराणच्या जनतेसाठी ही देश परत मिळवण्याची मोठी संधी आहे, असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

  • 01 Mar 2026 07:24 AM (IST)

    इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई मृत्यू, इराणी मीडियाचा दावा

    इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणी मीडियाकडून अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या हल्ल्यात खामेनींच्या परिवारातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे.

  • 28 Feb 2026 08:53 PM (IST)

    इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई जनतेला संबोधित करणार

    अमेरिका आणि इस्राईलच्या हल्ल्यानंतर देशाला संबोधित करणार इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेई

     

  • 28 Feb 2026 08:45 PM (IST)

    इराणने स्ट्रेट ऑफ हॉरमुज बंद केला, इंधन टंचाईची भीती

    स्ट्रेट ऑफ हॉरमुज हा जगातला सर्वात मोठा आणि महत्वाचा समुद्री मार्ग असून हा मार्ग इराण, ओमान आणि युएईच्या दरम्यान स्थित आहे. या मार्गातून जगाच्या २० टक्के इंधन आणि गॅसची वाहतूक होते.

  • 28 Feb 2026 08:29 PM (IST)

    आम्ही एक वा दोन कमांडर गमावले – इराणचा दावा

    आम्ही एक किंवा दोन कमांडर गमावले असून उर्वरित सर्व अधिकारी सुरक्षित असल्याचा दावा इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे.

     

  • 28 Feb 2026 08:17 PM (IST)

    इराणशी युद्धात सहभागी होऊ नका, अमेरिकेचा इराकला संदेश

    इराणशी युद्धात सहभागी होऊ नका असा संदेश अमेरिकेने इराकला दिला आहे, अमेरिका आणि इस्राईल यांनी इराणवर हल्ला केला आहे. त्यानंतर इराणने देखील दोहा, कतार, जॉर्डन, अबुधाबी आणि इतर देशातील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केला आहे.

  • 28 Feb 2026 07:45 PM (IST)

    इराण इस्रायल युद्धात मोठी बातमी, आतापर्यंत इराणचा 8 देशांवर हल्ला

    इराणमधून मोठी बातमी समोर येत आहे, आज अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला, त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणकडून अमेरिकेच्या आठ देशांमधील नौदल तळांवर हल्ला करण्यात आला आहे. सध्या मध्य पूर्वेमध्ये मोठा तणाव पहायला मिळत आहे.

  • 28 Feb 2026 07:44 PM (IST)

    जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडून इराणचा निषेध

    सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू झाले आहे. अमेरिकेनेही इराणवर हल्ला केला आहे. उत्तरादाखल इराणनेही सात देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केलंय. इराणच्या या हल्ल्यांचा जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन या देशांकडून निषेध केला आहे.

  • 28 Feb 2026 07:42 PM (IST)

    इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान, संरक्षण मंत्र्याचा मृत्यू  

    इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं आहे, इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये इराणचे अनेक सैनिक मारले गेले आहेत, तसेच इराणच्या संरक्षण मंत्र्यांचा देखील मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

  • 28 Feb 2026 07:28 PM (IST)

    संभाजीनगरात तिसगाव परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच दोन गट एकमेकांवर तुटून पडले आहेत. शेतीच्या वादावरून तिसगावमध्ये ही मारामारी झाली आहे. दोन्ही गट गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. त्या ठिकाणीही संताप अनावर झाल्याने पुन्हा वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

  • 28 Feb 2026 07:05 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमधील बीडकीन येथे हिंदू संमेलन

    छत्रपती संभाजीनगर मधील बीडकीन येथे हिंदू संमेलन होत आहे आणि हिंदू या संमेलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार, तसेच महंत रामगिरी महाराज, नागराज महाराज कपाटे यांची प्रमुख उपस्थिती आहे..

  • 28 Feb 2026 06:30 PM (IST)

    एअर इंडियाचा मोठा निर्णय, मध्य पूर्वेत जाणारी सर्व विमानं रद्द

    अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तरित्या इराणवर हल्ला केला आहे, या हल्ल्याला इराणकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं, त्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला असून, मध्य पूर्वेतील सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत.

  • 28 Feb 2026 06:15 PM (IST)

    इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला, मिनाबमध्ये 51 विद्यार्थांचा मृत्यू

    इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर भीषण हल्ला केला आहे, मोठी बातमी समोर येत असून, या हल्ल्यात मिनाबमध्ये 53 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे इराणकडून देखील या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यात येत असून, अमेरिकेच्या अनेक सैन्य तळांवर हल्ला करण्यात आला आहे.

  • 28 Feb 2026 05:53 PM (IST)

    इस्रायलमध्ये हल्ल्याचा अलर्ट जारी.

    इस्रायलमध्ये हल्ल्याचा अलर्ट जारी…. इस्रायलमधील अनेक शाळांवरही इराणकडून हल्ले… इराणमध्ये अमेरिका- इस्रायलच्या हल्ल्यात 5 शाळकरी मुलांचा मृत्यू…

  • 28 Feb 2026 05:50 PM (IST)

    ‘अमेरिका-इराण आणि इस्रायलमध्ये वाढणारे शत्रुत्व चिंताजनक’- राहुल गांधी

    ‘अमेरिका-इराण आणि इस्रायलमध्ये वाढणारे शत्रुत्व चिंताजनक’. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांचं ट्विट. ‘मध्य पूर्वेतील भारतीयांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या’. राहुल गांधी यांचं केंद्र सरकारला आवाहन

  • 28 Feb 2026 05:40 PM (IST)

    शत्रू पराभव स्वीकारेपर्यंत हल्ले सुरुच राहतील- इराणचं वक्तव्य

    शत्रू पराभव स्वीकारेपर्यंत हल्ले सुरुच राहतील… इराणचं वक्तव्य…इतर देशातील अमेरिकेच्या तळांवरच इराणचे हल्ले… कोणत्याच देशाला टारगेट केलं नाही… इराणचं स्पष्टीकरण….

  • 28 Feb 2026 05:35 PM (IST)

    युद्ध तुम्ही सुरु केलं, संपवणार आम्ही…. इराणचा इशारा

    अमेरिका आणि इस्रायलचा इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्र हल्ला… इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित… इस्रायलमधील शाळांना सुट्ट्या जाहीर… क्षेपणास्त्र हल्ल्याचे व्हिडीओ समोर… युद्ध तुम्ही सुरु केलं, संपवणार आम्ही…. इराणचा इशारा

  • 28 Feb 2026 05:30 PM (IST)

    इस्रायलकडून इराणच्या अणुशक्ती मुख्यालयावरच हल्ला

    इस्रायलकडून इराणच्या अणुशक्ती मुख्यालयावर हल्ला… इराणमध्ये सत्ताबदल करुच, इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांचा खामेनी यांना इशारा…

  • 28 Feb 2026 05:20 PM (IST)

    अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी महाग, तेलाच्या किमतींचा भडका

    अमेरिका-इराण युद्धाचे जगावर गंभीर परिणाम . 8 देशांची हवाईहद्द बंद. सोनं-चांदी महाग, तेलाच्या किमतींचा भडका

  • 28 Feb 2026 05:06 PM (IST)

    जॉर्डनमधील मुवफ्फक अल-सल्ती हवाई तळावरही इराणकडून हल्ला

    कतारमधील अल उदैद हवाई तळावर इराणनं हल्ला केला. कुवेतचं अली अल सलेम हवाई तळ इराणच्या निशाण्यावर आहे. यूएईमधील अल धफ्रा हवाई तळावरही इराणनं हल्ले केलेत.. बहरीनमधील अमेरिकेच्या नौदलाचे मुख्यालय फिफ्थ फ्लीटवर हल्ला झालाय

  • 28 Feb 2026 05:02 PM (IST)

    इराणचे सर्वोच्च नेता खामेनी यांना सुरक्षितस्थळी हलवलं

    इराणचे सर्वोच्च नेता खामेनी यांना सुरक्षितस्थळी हलवलं गेल्याची माहिती. इराणचा टॉप कमांडर मारला गेल्याचा इस्त्रायलचा दावा

    तेहरानवरील हल्ल्यावेळी खामेनींचं मुख्य कार्यालय टार्गेट.

  • 28 Feb 2026 04:47 PM (IST)

    यूएईने इराणचे अनेक मिसाईल हाकून पाडली

    यूएईने इराणचे अनेक मिसाईल हाकून पाडली आहेत. इराणच्या मोठ्या शहरांवर अमेरिकेचा हल्ला. भीषण नुकसान.

  • 28 Feb 2026 04:30 PM (IST)

    वाईट शक्तीवर हल्ला केलाय- इराण

    इराणने इस्त्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्याला उत्तर देण्यास सुरूवात केली. आमचा टॉपचा कमांडर सुरक्षित असल्याचेही इराणने म्हटले. शिवाय इराणने म्हटले की, वाईट शक्तीवर हल्ला केला आहे.

  • 28 Feb 2026 04:13 PM (IST)

    कतारमध्ये इराणकडून तब्बल तिसरा हल्ला

    इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यापासून इराण अमेरिकेचे बेस असलेल्या देशांमध्ये हल्ला करत आहे कतारमध्ये तिसरा हल्ला इराणने केला.

  • 28 Feb 2026 04:04 PM (IST)

    इराणचा अत्यंत मोठा हल्ला..

    इराणने त्यांच्या देशातील अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले आहेत. मिसाईल हल्ला करण्यात आला. इराणकडून विविध देशातील अमेरिकेच्या बेसला टार्गेट केले जात आहे.

  • 28 Feb 2026 03:50 PM (IST)

    इराणच्या हल्ल्यात UAE मध्ये भारतीय नागरिकाचा मृत्यू, मोठी खळबळ..

    इराण आणि अमेरिकेत युद्ध पेटले आहे. इराणच्या हल्ल्यात UAE मध्ये भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

  • 28 Feb 2026 03:48 PM (IST)

    टॉमहॉक मिसाईलने इराणवर हल्ला, मोठी खळबळ…

    टॉमहॉक मिसाईलने इराणवर हल्ला केला. इस्त्रायलच्या अनेक भागात इराणने हल्ला केला. इस्त्रायलवर 70 मिसाईल इराणने टाकली.

  • 28 Feb 2026 03:46 PM (IST)

    तेहरानमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेचे मोठे हल्ले…

    तेहरानमध्ये इस्त्रायल आणि अमेरिकेचे सातत्याने हल्ले सुरू असून परिस्थिती अधिक बिकट असल्याची माहिती मिळत आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे.

  • 28 Feb 2026 03:43 PM (IST)

    कुवेतने पाडले इराणचे मिसाईल, युद्ध पेटले

    कुवेतने पाडले इराणचे मिसाईल. इराणवर हल्ला करण्यात आला, त्यानंतर इराण इतर देशातील अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करत आहे.

  • 28 Feb 2026 03:30 PM (IST)

    चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने हल्ला केला, इराणचा आरोप

    चर्चा सुरू असतानाच अमेरिकेने हल्ला केल्याचा गंभीर आरोप इराणने केला. हेच नाही तर इराणने म्हटले की, इराण आता अगोदरपेक्षा जास्त तयार आहे.

  • 28 Feb 2026 03:14 PM (IST)

    अमेरिकेवर कडाडला इराण, तब्बल इतक्या लष्कर तळांवर हल्ला…

    अमेरिकेने इस्त्रायलच्या मदतीने थेट इराणवर हल्ला केला. त्यानंतर आता इराण पेटला असून थेट त्यांनी विविध देशांच्या सात अमेरिकेच्या तळांवर मोठा हल्ला केला.

  • 28 Feb 2026 03:12 PM (IST)

    साैदी अरेबियामध्ये इराणचा हल्ला

    साैदी अरेबियामध्ये इराणने हल्ला केला. अमेरिकेन स्थळावर इराण हल्ले करत आहेत.

  • 28 Feb 2026 03:00 PM (IST)

    साैदी अरेबियावर इराणचा थेट हल्ला…

    इराणला आता अमेरिका आणि इस्त्रायलने पेटवले असून इराणने आतापर्यंत 7 देशांवर प्रतिहल्ला केला. साैदी अरेबियायावर इराणने थेट हल्ला केला.

  • 28 Feb 2026 02:59 PM (IST)

    कुवैत आणि कतारमधील एअरस्पेस बंद

    कुवैत आणि कतारमधील एअरस्पेस बंद करण्यात आला. पूर्ण युद्ध पेटल्याचे बघायला मिळत आहे. आतापर्यंत 7 देशांवर इराणकडून प्रतिहल्ले केली जात आहेत.

  • 28 Feb 2026 02:58 PM (IST)

    इराणचा 6 देशांवर प्रतिहल्ला.. जहात खळबळ

    इराणकडून अमेरिकेन लष्करी तळांना टार्गेट केले जात आहे. इराणने आतापर्यंत तब्बल 6 देशांवर प्रतिहल्ला केल्याची माहिती मिळत आहे.

  • 28 Feb 2026 02:46 PM (IST)

    जगात खळबळ, अनेक देश थेट युद्धाच्या मैदानात..

    आज इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर मोठा हल्ला केला. आता या युद्धात अनेक देश उतरले असून इराणने सहा देशांवर हल्ला चढवला.

  • 28 Feb 2026 02:42 PM (IST)

    बहरीनमध्ये अमेरिकेच्या नाैदल ठिकाणांकावर हल्ला

    बहरीनमध्ये अमेरिकेच्या नाैदल ठिकाणांकावर हल्ला करण्यात आला, हा हल्ला इराणकडून करण्यात आला. इस्त्रायलच्या चार मोठ्या शहरांवर इराणने हल्ला केला.

  • 28 Feb 2026 02:38 PM (IST)

    डोनाल्ड ट्रम्प यांचे खरे रूप जगापुढे- रशिया

    डोनाल्ड ट्रम्प यांचे खरे रूप जगापुढे आल्याचे रशियाने म्हटले आहे. इस्त्रायलला हाताशी धरून मोठा हल्ला इराणवर अमेरिकेने केला.

  • 28 Feb 2026 02:06 PM (IST)

    भारतीयांसाठी मोठी सूचना जारी, इराणमधील भारतीयांनी…

    इराणमधील भारतीयांनी सुरक्षितस्थळी रहावे, अशी सूचना भारतीय दूतावासांनी नागरिकांनी दिली आहे.

  • 28 Feb 2026 02:03 PM (IST)

    इराणच्या अणुशक्ती मुख्यालयावर अमेरिकेचा मोठा हल्ला

    इराणच्या अणुशक्ती मुख्यालयावर अमेरिकेचा मोठा हल्ला. इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

  • 28 Feb 2026 01:57 PM (IST)

    जगाला ज्याची भीती तेच होतंय, अखेर युद्धाला सुरूवात

    इराणच्या शहरांवर मोठे हल्ले. नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्याचे काम सुरू. स्थिती बिकड होण्याच्या मार्गावर.

  • 28 Feb 2026 01:52 PM (IST)

    इराणच्या टॉप कमांडर हल्ल्यात ठार

    अमेरिका आणि इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचा टॉप कमांडर ठार झाला असल्याची माहिती मिळत आहे. सरकारी इमारतींना टार्गेट केले जात आहे.

  • 28 Feb 2026 01:51 PM (IST)

    इराणवर अत्यंत मोठा हल्ला, जगात खळबळ…

    इराणवर अत्यंत मोठा हल्ला अमेरिका आणि इस्त्रायलकडून करण्यात आला. सात प्रमुख शहरांवर हा हल्ला करण्यात आला आहे.

Follow Us