समुद्रात मोठा हल्ला, अमेरिकन लष्कराने उडवली थेट पाणबुडी, 6 जहाजावर हल्ला, जगात खळबळ, युद्ध..

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने ड्रग्ज विरोधात मोठी पाऊले उचलली असून मोठी कारवाई केली जात आहे. त्यामध्ये आता थेट एक पाणबुडी उडवण्यात आली असून सहा जहाजांना अमेरिकेच्या लष्कराने टार्गेट केले.

समुद्रात मोठा हल्ला, अमेरिकन लष्कराने उडवली थेट पाणबुडी, 6 जहाजावर हल्ला, जगात खळबळ, युद्ध..
US military attack on submarine
| Updated on: Oct 19, 2025 | 12:11 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत जगात खळबळ उडवणारे निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी त्यांच्या ट्रुथआउट सोशल प्लॅटफॉर्मवर दावा केला की, अमेरिकेने कॅरिबियन समुद्रात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या पाणबुडीला टार्गेट करत नष्ट केले. ही पाणबुडी फेंटानिल आणि इतर ड्रग्जने भरलेली होती. विशेष म्हणजे ही ड्रग्जने भरलेली पाणबुडी थेट अमेरिकेच्या दिशेने निघाली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, माझ्यासाठी खरोखरच ही एक अभिमानाची गोष्ट आहे की, ड्रग्ज नेणारी एक पाणबुडी आम्ही पूर्णपणे नष्ट केली. यात दोन दहशतवादी मारले गेले आणि इतर दोघांना कोलंबियाला पाठवण्यात आले आहे. अमेरिका ड्रग्ज तस्करी विरोधात ठोक पाऊले उचलताना दिसत आहे.

सतत जहाजांना निशाणा बनून अमेरिकी सैन्य हल्ला करतंय. या कारवाईवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला. त्यांनी म्हटले की, जर ही पाणबुडी मी येऊ दिली असती तर किमान 25 हजार अमेरिकन मारले गेले असते. ही घटना सप्टेंबर 2025 मध्ये लॅटिन अमेरिकेतून अमेरिकेत ड्रग्ज येण्यापासून रोखण्यासाठी लष्कराने कारवाई करत अख्खी पाणबुडीच उडवून टाकली. हेच नाही तर अमेरिकन सैन्याने कॅरिबियन समुद्रात सहा जहाजांना टार्गेट केले होते.

अमेरिकन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही कारवाई ड्रग्ज पुरवठा साखळीला नक्कीच मोठा धक्का आहे. मात्र, अमेरिकेने अद्याप पुरावे दिलेले नाहीत की, मारले गेलेले सर्व जण ड्रग्ज तस्कर होते. आंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ आणि मानवाधिकार संघटनांनी अशा हत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र, असे असले तरीही अमेरिकेकडून कारवाई ही चालूनच ठेवण्यात आलीये.

स्पष्ट पुरावे आणि योग्य प्रक्रियेशिवाय अशा लष्करी कारवाया आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन मानल्या जाऊ शकतात, असेही सांगितले जातंय, मात्र, तरीही डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या भूमिकेवर ठाम असून त्यांनी पुढेही अशाप्रकारच्या कारवाई केल्या जातील, असे म्हटले. कारवाईत वाचलेल्यांना परत कोलंबियात पाठवण्यात आला आले. मात्र, अमेरिकेच्या कारवाईने तणावाची परिस्थिती नक्कीच निर्माण झालीये.