AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : सवयीप्रमाणे ट्रम्प शब्दावरुन पलटले, आता एका बड्या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याची विकेट काढण्यासाठी लावली फिल्डिंग

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प सध्या हैराण झाले आहेत. इराण युद्धावर काय बोलावं हेच त्यांना समजत नाहीय. दररोज ते आपली वक्तव्य बदलत आहेत. देशांतर्गत त्यांना मोठ्या दबावाचा सामना करावा लागतोय. आता ते आपल्या प्रशासनातून एका बड्या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याला हटवण्याच्या तयारीत आहेत.

Donald Trump : सवयीप्रमाणे ट्रम्प शब्दावरुन पलटले, आता एका बड्या भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याची विकेट काढण्यासाठी लावली फिल्डिंग
Donald Trump
| Updated on: Apr 03, 2026 | 9:11 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन इराण विरुद्ध युद्ध सुरु केलं. एक म्हणजे रेजीम चेंज सत्ता बदल आणि दुसरं इराणमधील समृद्ध युरेनियम ताब्यात घेणं, म्हणजे त्यांना अणू बॉम्ब बनवता येणार नाही. युद्धाला आता एक महिना उलटला आहे. पण अजूनपर्यंत दोघांपैकी एकाही उद्दिष्ट्याची पूर्तता झालेली नाही. अलीकडची अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वक्तव्य बघितली तर ते पार गोंधळून गेलेले दिसतात. दररोज ते नवनवीन वक्तव्य करत आहेत. इराणला डील करायची आहे असा त्यांचा दावा असतो. पण दरवेळी इराणकडून अशी कुठलीही चर्चा सुरु असल्याचा दावा फेटाळून लावला जातो. ट्रम्प यांना हे युद्ध पुढे सुरु ठेवायचय की त्यांना एक्झिट हवीय हे स्पष्ट नाहीय.

या दरम्यान आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. नुकतीच माजी अटॉर्नी जनरल पाम बोंडी यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. मागच्या महिन्यात होमलँड सिक्योरिटीचे सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांना सुद्धा हटवलं. आता डोनाल्ड ट्रम्प यांचं पुढचं लक्ष्य एक भारतीय वंशाचा अधिकारी असेल अशी चर्चा आहे. काश पटेल यांना FBI डायरेक्टर पदावरुन हटवलं जाऊ शकतं. अटलांटिक न्यूजने व्हाइट हाऊसमधील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. FBI डायरेक्टर काश पटेल यांच्यासह आर्मी सेक्रेटरी डॅनियल ड्रिस्कॉल आणि लेबर सेक्रेटरी लोरी चावेज़-डेरेमर यांना सुद्धा ट्रम्प प्रशासनातून हटवलं जाऊ शकतं.

सवयीप्रमाणे आपला शब्द फिरवला

वरती ज्या अधिकाऱ्यांची नाव नमूद केली आहेत, त्यांना कधीपर्यंत हटवणार या बद्दल स्पष्टता नाहीय. ट्रम्प यांनी अजूनपर्यंत अंतिम निर्णय घेतलेला नाही. ट्रम्प यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात ‘नो स्कॅल्प्स’ नियम बनवला होता. म्हणजे कोणालाही नोकरीवरुन काढायचं नाही. पण सवयीप्रमाणे ट्रम्प आपल्या शब्दावरुन फिरल्याचं दिसत आहे.

ट्रम्प यांच्या समर्थनात घसरण

आपल्या कोणत्याही वरिष्ठ सहकाऱ्याला पदावरुन हटवण्याआधी ट्रम्प यांच्या मनात घालमेल सुरु होती. कारण आपल्या सहकाऱ्यांना पदावरुन काढणं म्हणजे ड्रेमोक्रॅट आणि मीडियासमोर एकप्रकारे झुकण्यासारखं आहे, असं ट्रम्प मानतात. मध्यावधी निवडणुकीआधी कॅबिनेटमधून कुठल्याही अधिकाऱ्याला हटवणार नाही असा आदेश होता. पण आता अनेकांना हटवण्याच्या योजनेवर काम चालू आहे. इराण युद्ध चालू झाल्यानंतर ट्रम्प यांच्या समर्थनात घसरण झाली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा