AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक युद्ध संपत नाही तोच दुसरे युद्ध, अमेरिकेच्या मनात आहे तरी काय ?

अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय आणि पेंटागॉन गेल्या अनेक महिन्यांपासून कॅरिबियन समुद्रात सैन्यांची जमवाजमव करत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मंजूरी मिळताच अमेरिकन सैन्य क्युबावर हल्ला करु शकते. या वर्षीचा अमेरिकेचा हा तिसरा हल्ला असेल...

एक युद्ध संपत नाही तोच दुसरे युद्ध, अमेरिकेच्या मनात आहे तरी काय ?
Donald Trump warns of another war
| Updated on: May 28, 2026 | 6:13 PM
Share

अमेरिका आणि इराण युद्धात सध्या स्थिती शांत असली तरी युद्ध संपलेले नाही. आता अमेरिका आणखी एका युद्धाला सुरुवात करण्याची तयारी करत आहे. पॉलिटिकोच्या मते पेंटागॉन सध्या क्युबात ऑपरेशन करण्याची तयारी करत आहे. या प्लानला मंजूरीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठवली आहे. ट्रम्प यांनी जर मंजूरी दिली तर क्युबा आणि अमेरिकेत युद्धाची सुरुवात होऊ शकते. या वर्षी म्हणज २०२६ मध्ये अमेरिकेने आधीच दोन देशांवर हल्ला केलेला आहे.

रिपोर्टच्या नुसार ट्रम्प यांच्या प्रशासनाला आशा होती की आर्थिक निर्बंधानंतर आपोआप क्युबात सत्तापालट होऊन जाईल. परंतू आर्थिक आणि राजकीय दबावानंतरही अमेरिका क्युबात कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारला हलवू शकलेले नाही.त्यामुळे ट्रम्प प्रशासन आता सैनिक कारवाईवर विचार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेने कॅरेबियन समुद्रात आपल्या सैन्याची जमावाजमव वाढविली आहे.

या मोहिमेंतर्गत मे महिन्यात अमेरिकेने निमित्ज एअरक्राफ्ट कॅरियर स्टाईक ग्रुप कॅरेबियन समुद्रात तैनात केला आहे. या सबोत अनेक गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आणि क्रुझर देखील तैनात केले आहे. ही विमानवाहू नौका जमीनीवर अचूक मिसाईल हल्ला करण्यास सक्षम आहे. याशिवाय अमेरिकन ड्रोन आणि टेहळणी विमाने अनेक महिन्यांपासून क्युबाच्या आजूबाजूला सक्रीय आहेत.

क्युबावर हल्ला का करायचा आहे ?

बुधवारी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या कॅबिनेट बैठकी दरम्यान परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की अमेरिकेच्या जवळ एक अस्थिर देश अमेरिकेच्या सुरक्षेसाठी एक मोठा धोका बनू शकतो. रुबिया यांनी सांगितले की क्युबात अस्थिरता आणि तेथे खूप अडचणी निर्माण होऊ शकतो.

काही दिवसात क्युबात चीनचा हस्तक्षेप सतत वाढत आहे. चीनने क्युबासोबत अनेक डील केल्या आहेत. दुसरीकडे व्हेनेझुएलावर नियंत्रणानंतर अमेरिकेचा प्रयत्न क्युबावर कब्जा करण्याचा आहे. या मिशन अंतर्गत क्यूबावर हल्ल्याची तयारी केली जाणार आहे.

क्यूबाची सैन्याची ताकद काय ?

क्यूबाची सर्वात मोठी ताकद त्याची War of All the People ( सर्व लोकांसाठी युद्ध ) पॉलिसी आहे. याचा अर्थ जर देशावर हल्ला झाला तर केवळ सैन्यांसाठी नव्हे तर सर्व सामान्य नागरिक, मिलिशिया आणि पॅरामिलिट्री दल देखील युद्धात सामील होतील.

क्युबाच्या जवळ सुमारे ५० हजार एक्टिव्ह सैन्यदल आहे. ३९ हजाराचे राखीव सैनिक आणि सुमारे ९० हजार पॅरामिलिट्री दल आहे. क्युबाच्या सरकारने इराणसारखेच सैन्याला वेग-वेगळ्या भागात विकेंद्रीकरण केलेले आहे. युद्धाच्या स्थितीत सैन्याच्या पथकाला स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केलेले आहेत.

क्युबा हा गुरिल्ला लढाईत माहिर मानला जातो. १९७० च्या आसपास क्युबाने गोरिल्ला वॉरच्याद्वारे अमेरिकेला गुडघे टेकवण्यास मजबूर केलेले होते.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा