US-Pakistan : ट्रम्प यांच्या मागे-मागे करणाऱ्या शहबाज-मुनीर जोडीला महिन्याभरात दुसरा झटका, अमेरिकेने पाकिस्तानला लायकी दाखवली

US-Pakistan : अमेरिकेने एका महिन्याच्या आत पाकिस्तानला दुसरा मोठा झटका दिला आहे. सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर सतत ट्रम्प यांच्या मागे-मागे फिरताना दिसतात. पण याचा काही उपयोग नाही. कारण अमेरिकेने पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली आहे.

US-Pakistan : ट्रम्प यांच्या मागे-मागे करणाऱ्या शहबाज-मुनीर जोडीला महिन्याभरात दुसरा झटका, अमेरिकेने पाकिस्तानला लायकी दाखवली
shehbaz sharif -Donald Trump-asim munir
| Updated on: Jan 30, 2026 | 9:26 AM

अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी सुरक्षा चिंतांचं कारण देत पाकिस्तानात जाण्याच्या प्लानिंगमध्ये असलेल्या अमेरिकी नागरिकांना आपल्या प्लानवर पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. गुन्हे, दहशतवाद आणि अपहरणाचा धोका या कारणांमुळे पाकिस्तानात जाण्याआधी विचार करा, असं अमेरिकेच्या राज्य विभागाने प्रवाशांसाठी जारी केलेल्या लेटेस्ट एडवायजरीमध्ये म्हटलं आहे. पाकिस्तानी वर्तमानपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार एडवायजरीत पाकिस्तानला लेवल 3 मध्ये ठेवलं आहे. ही हाय रिस्क वाली कॅटेगरी आहे. याचा अर्थ तिथे कुठल्याही वॉर्निंग शिवाय दहशतवादी हल्ले होऊ शकतात. अमेरिकी स्टेट डिपार्टमेंटनुसार, ट्रान्सपोर्टेशन हब, हॉटेल, मार्केट, शॉपिंग मॉल, सैन्य तळ, एअरपोर्ट, ट्रेन, शाळा, हॉस्पिटल, प्रार्थना स्थळं, पर्यटन स्थळ आणि सरकारी इमारती इथे कधीही दहशतवादी हल्ला होऊ शकतो.

खैबर पख्तूनख्वासह काही भागांना लेवल 4 मध्ये ठेवलं आहे. म्हणजे इथे जाऊच नका असा त्याचा अर्थ आहे. एडवायजरीत अमेरिकन नागरिकांना कुठल्याही कारणासाठी लेवल 4 मध्ये ट्रॅव्हलिंग करु नका असं आवाहन करण्यात आलं आहे. इथे हत्या आणि अपहरणाचा प्रयत्न हे सामान्य आहे. डॉननुसार हा इशारा पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांसाठी सुद्धा आहे. दहशतवाद आणि अपहरण यामुळे बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा येथे जाऊ नका असं अमेरिकी एडवायजरीमध्ये म्हटलं आहे. यात आधीच फेडरली एडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाचा (एफएटीए) सुद्धा समावेश आहे. हिंसक कट्टरपंथी गटांनी पाकिस्तानात हल्ले केल्याचं यात म्हटलं आहे. पाकिस्तानात दहशतवादी हल्ले सर्वाधिक बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये होतात. कराची आणि इस्लामाबाद या मोठ्या शहरात सुद्धा हल्ले झाले आहेत.

पाकिस्तानला काय अपेक्षा?

या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकी राज्य विभागाच्या प्रवक्त्याने घोषणा केली होती की, ट्रम्प सरकार 21 जानेवारीपासून 75 देशांच्या अर्जदारांसाठी इमिग्रेंट वीजा प्रक्रिया निलंबित करत आहे. याचा परिणाम आफ्रिका, मिडिल ईस्ट, कॅरेबियन, लॅटिम अमेरिका, बाल्कन क्षेत्र आणि दक्षिण आशियातील काही देशांवर होईल. यात पाकिस्तान आणि बांग्लादेश सुद्धा आहे. अमेरिकेने वीजा प्रक्रिय थांबवल्यानंतर पाकिस्तानच्या फॉरेन ऑफिसने अपेक्षा व्यक्त केली की, हे सस्पेंशन तत्कालीन असेल आणि लवकरच नॉर्मल प्रक्रिया पुन्हा सुरु होईल.