Gold Rate Updates : यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम दोन लाखांच्या जवळ पोहोचले असून यावर्षी ते अडीच ते तीन लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केला आहे. डॉलरवरील अवलंबित्व कमी करणे, भू-राजकीय तणाव आणि चांदीचा वाढता औद्योगिक वापर ही या वाढीमागील प्रमुख कारणे आहेत.
सोन्याच्या दरात सध्या विक्रमी वाढ दिसून येत आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर दोन लाखांच्या जवळ पोहोचले आहेत. यावर्षी 2026 मध्ये हे दर अडीच ते तीन लाखांपर्यंत पोहोचू शकतात, असा अंदाज ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी व्यक्त केला आहे.
या वाढीमागे अनेक जागतिक कारणे आहेत. रशिया-युक्रेन युद्धानंतर अनेक देशांनी आपले परकीय चलन साठे डॉलरमधून सोन्यामध्ये वळवले आहेत. पूर्वी 80% परकीय साठा डॉलरमध्ये असायचा, तो आता वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार 52% पर्यंत खाली आला आहे. उर्वरित साठा सोन्यामध्ये रूपांतरित झाल्याने त्याची मागणी वाढली आहे. तसेच, भू-राजकीय तणाव आणि सोन्याला आता गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जाणे ही देखील दरांमधील वाढीची प्रमुख कारणे आहेत. चांदीच्या दरातही मोठी वाढ अपेक्षित असून, ती प्रति किलो पाच ते सहा लाखांपर्यंत जाऊ शकते.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
यंदाच्या वर्षात सोन अडीच लाखांच्या घरात जाणार? काय आहेत सध्याचे दर?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?

