आता ‘या’ देशाचा राष्ट्रपती अमेरिकेच्या रडारवर, पकडणाऱ्याला मिळणार 4 अब्ज रुपयांचे बक्षीस

अमेरिका सध्या एका व्यक्तीच्या शोधात आहे. जो दहशतवादी नाही, किंवा एखादा गुंड नाही. तरीही अमेरिकेने या व्यक्तीला पकडण्यासाठी 50 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 4 अब्ज रुपये) बक्षीस जाहीर केले आहे.

आता या देशाचा राष्ट्रपती अमेरिकेच्या रडारवर,  पकडणाऱ्याला मिळणार 4 अब्ज रुपयांचे बक्षीस
Trump and maduro
| Updated on: Aug 08, 2025 | 4:09 PM

अमेरिका सध्या एका व्यक्तीच्या शोधात आहे. जो दहशतवादी नाही, किंवा एखादा गुंड नाही. तरीही अमेरिकेने या व्यक्तीला पकडण्यासाठी 50 दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे 4 अब्ज रुपये) बक्षीस जाहीर केले आहे. हा व्यक्ती व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हे आहेत. ही बक्षीस रक्कम अल कायदाचा नेता ओसामा बिन लादेन आणि इस्लामिक स्टेटचा अबू बकर अल बगदादी यांच्यावर ठेवलेल्या बक्षीसापेक्षा जास्त आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अमेरिकेने ओसामा बिन लादेन आणि अबू बकर अल बगदादीवर या दोन्ही दहशतवाद्यांवर 25 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 2 अब्ज रुपयांचे बक्षीस ठेवले होते. मात्र आता व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडण्यासाठी अमेरिकेने पाण्यासारखा पैसा खर्च का करत आहेत ते पाहुयात.

निकोलस मादुरो यांच्यावर बक्षीस का?

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले की, ‘निकोलस मादुरो हा व्यक्ती ड्रग्ज तस्करी टोळीचा प्रमुख आहे. मादुरो यांच्या इशाऱ्यावर अमेरिकेत धोकादायक ड्रग्जची तस्करी केली जाते. अमेरिकन तपास संस्थांनी असेही म्हटले आहे की, व्हेनेझुएला जगभरात ड्रग्ज तस्करीचे काम करतो. दरवर्षी व्हेनेझुएलामधून 250 मेट्रिक टन ड्रग्जची तस्करी केली जाते.

ब्रिटिश वृत्तपत्र डेली मेलने एक बातमी प्रकाशित केली होती. यानुसार व्हेनेझुएला हा देश आपल्या पासपोर्टद्वारे बेकायदेशीर असणाऱ्या इराणी स्थलांतरितांना अमेरिकेत पाठवत आहे. अहवालानुसार काही दहशतवादी बनावट पासपोर्ट वापरून व्हेनेझुएलामधून अमेरिकेत प्रवेश करत असल्याचेही समोर आले आहे.

अमेरिकेचे अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांनी म्हटले की, ‘आम्ही बक्षीस रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण मादुरो थेट ड्रग्ज तस्करीत सहभागी आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. मात्र व्हेनेझुएलाचे परराष्ट्र मंत्री इवान गिल यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत हा मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे.

व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यात वाद

अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात बऱ्याच काळापासून वाद आहे. 1999 मध्ये ह्यूगो चावेझ यांनी व्हेनेझुएलाची सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर चावेझ यांनी अमेरिकन साम्राज्यवाद्यांविरुद्ध एल्गार पुकारला होता. त्यामुळे अमेरिकेने चावेझ यांना शांत करण्यासाठी सत्तापालट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यात अमेरिकेला अपयश आले होते.

ह्यूगो चावेझ यांनी सत्तेत असताना व्हेनेझुएलामध्ये कम्युनिस्ट विचारसरणीवर भर दिला, त्यामुळे ज्यामुळे अमेरिका खूप नाराज आहे. व्हेनेझुएलाचे सध्याचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे चावेझ यांचे राजकीय शिष्य आहेत. तसेच मादुरो यांनी अनेकदा अमेरिकेविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ते आता अमेरिकेच्या रडारवर आहेत.