गोमांस शिजवण्यावरून मोठा गदारोळ, भाडेकरूशी वाद घालणे कॅनडात पडले भारतीय महिलेला महागात, थेट बेड्याच..

सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. एका भारतीय महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत असून कॅनडातील हा व्हिडीओ आहे.

गोमांस शिजवण्यावरून मोठा गदारोळ, भाडेकरूशी वाद घालणे कॅनडात पडले भारतीय महिलेला महागात, थेट बेड्याच..
Indian woman Canada
| Updated on: Sep 12, 2026 | 1:44 PM

कॅनडामध्ये एका किरायदारासोबत वाद घालणे भारतीय महिलेला चांगलेच महागात पडले. हेच नाही तर थेट जेलमध्ये जाण्याची वेळ आली. याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाली आहेत. नक्की काय घडले हे व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून स्पष्ट झाले. कॅनडात भारतीय महिलेचा किरायदारासोबत बार्बेक्यूवरून वाद झाला. गोमांस शिजवण्यासाठी महिलेने विरोध केला. यावरून तिचा किरायदारासोबत वाद झाला. हा वाद किती जास्त विकोपाला गेला हे व्हिडीओवरून दिसतंय. मिळालेल्या माहितीनुसार, राज तिवना असे घरमालकिनीचे नाव आहे. किरायदार त्याच्या एका मित्रासोबत बागेत बार्बेक्यू  वापरत होता. त्यानंतर महिलेने त्याला विरोध केला. हेच नाही तर महिलेने त्यांचे गोमांस फेकून देण्याचाही प्रयत्न केला.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मला म्हणते की, तिला तिच्या मालमत्तेचे होणारे नुकसान टाळायचे आहे. यावेळी किरायदार हा महिलेला निघून जाण्यास सांगताना दिसत आहे. मित्रांना जेवणास बोलवण्याचा अधिकार मला आहे हे सांगताना तो किरायदार दिसत आहे. यावेळी महिला भिंतीकडे बोट दाखवत झालेले नुकसान दाखवत आहे.

भाडेकरून आणि महिलेत वाद होताना दिसतोय. महिला ग्रिलमधील अन्न काढण्याचा प्रयत्न करत आहे भाडेकरू आरोप करतो की, तो रात्रीचे जेवण तयार करत असताना महिलेने त्याला धमकावले. महिला लाकडाच्या तुकड्याच्या मदतीने अन्न फेकून देताना दिसतंय. मात्र, भाडेकरू त्याला तसे करण्यापासून रोखताना दिसतोय. यानंतर हे प्रकरण थेट पोलिसात पोहोचले. भाडेकरू थेट पोलिसांना बोलावले. दुसऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, महिलेच्या घरी पोलिस पोहोचलेले आहेत.

महिलाच दरवाजा उघडते. पोलिस तिला बाहेर येण्यास सांगतात. पोलिसांना महिला बोलत आहे. सर्वात अगोदर तिचा मोबाईल पोलिस घेतात. ती पोलिसांना काहीतरी समजून सांगताना दिसत आहे. मात्र, पोलिस तिचे काही ऐकत नाहीत. पोलिसांकडून थेट महिलेला अटक करण्यात आली. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. कॅनडा गेल्या काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेत आहे. त्यातच हा व्हिडीओ व्हायरल झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us