AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vladimir Putin On US Sanctions : टॉमहॉक मिसाइल द्या, मग बघाच…खवळलेल्या पुतिन यांची अमेरिकेला डायरेक्ट वॉर्निंग

Vladimir Putin On US Sanctions : रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेच्या नव्या प्रतिबंधांना रशिया विरुद्ध युद्धाची कारवाई Act of War म्हटलं आहे. मेदवेदेव हे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत.

Vladimir Putin On US Sanctions : टॉमहॉक मिसाइल द्या, मग बघाच...खवळलेल्या पुतिन यांची अमेरिकेला डायरेक्ट वॉर्निंग
Trump-Putin
| Updated on: Oct 24, 2025 | 9:33 AM
Share

अमेरिकेने रशियाच्या तेल कंपन्यांवर नवीन प्रतिबंध लादल्यानंतर व्लादीमीर पुतिन खवळले आहेत. अमेरिका युक्रेनेला टॉमहॉक मिसाइल देण्याबद्दल बोलत आहे. या टॉमहॉक मिसाइलमुळे युक्रेनला रशियाच्या आत खोलवर हल्ले करता येतील. या टॉमहॉक मिसाइलवरुन पुतिन यांनी स्पष्ट शब्दात सांगितलय की, रशियाची प्रतिक्रिया ही चिरडून टाकणारी आणि आश्चर्यकारक असेल. जेलेंस्की हे रशियाच्या आत खोलवर हल्ले करणार मिसाइल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेते. त्यावर पत्रकारांनी विचारलं असता पुतिन यांनी हे उत्तर दिलं. ट्रम्प आणि पुतिन यांचं बुडापेस्ट शिखर सम्मेलन रद्द झालय आणि अमेरिकेने रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर पुतिन बोलत होते. नवीन प्रतिबंध हे रशियावर दबाव टाकण्याचा आणखी एक प्रयत्न आहे असं पुतिन म्हणाले.

रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी अमेरिकेच्या नव्या प्रतिबंधांना रशिया विरुद्ध युद्धाची कारवाई Act of War म्हटलं आहे. मेदवेदेव हे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं प्रस्तावित बुडापेस्ट शिखर सम्मेलन रद्द झालं आहे. बुधवारी ट्रम्प यांनी ही घोषणा केली. त्यानंतर अमेरिकेने रशियाच्या दोन तेल कंपन्या रुक ऑयल आणि रोजनेफ्टवर प्रतिबंध लावले. या दोन कंपन्यांमधून रशियाचं 50 टक्के तेल निघतं. युक्रेन बऱ्याच काळापासून अमेरिकेकडे लांब पल्ल्याच्या टॉमहॉक क्रूज मिसाइलची मागणी करत आहे.

बैठक रद्द होण्यावर पुतिन काय म्हणाले?

कुठलाही स्वाभिमानी देश बाहेरच्या दबावासमोर झुकत नाही. खासकरुन रशिया असं पुतिन म्हणाले. रशियावर बहुतांश अमेरिकी प्रतिबंध ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात लावण्यात आले होते याची आठवण पुतिन यांनी करुन दिली. बुडापेस्टची बैठक रद्द केलेली नाही, स्थगिती केली आहे असं पुतिन म्हणाले. टॉमहॉक मिसाइलची रेंज 1600 किलोमीटर आहे. अमेरिकी नौदलाकडून या मिसाइलचा वापर केला जातो. अमेरिकेने टॉमहॉक मिसाइल दिले तर रशियाकडून यापेक्षाही भयानक हल्ले युक्रेनवर होऊ शकतात.

Follow Us
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका