
मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धामुळे संपूर्ण जगाची झोप उडाली आहे. इस्रायल आणि अमेरिका इराणवर सतत हल्ले करत आहेत. इराणकडूनही या हल्लांना प्रत्युत्तर दिले जात आहे. आज या युद्धाचा नववा दिवस आहे. इराणने माघार घेण्यासठी अमेरिकेकडून प्रयत्न होताना दिसत आहे, मात्र इराणने युद्धातून माघार न घेण्याची घोषणा केली आहे. जोपर्यंत सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेत नाही तोपर्यंत युद्ध सुरू ठेवणार आणि शत्रूला एक इंचही जमीन देणार नाही असं इराणने म्हटले आहे. अशातच आता आणखी एका देशाने या युद्धात उडी घेतली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इराणने अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले होते. तसेच इराणने युएईमधील काठी ठिकाणांवर हल्ला केला होता. त्यामुळे आता युएईनेही युद्धात उतरण्याचा निर्णय घेतला असून युएईने इराणच्या जलसंपत्तीवर मोठा हल्ला केला आहे. इस्रायली पोर्टल Ynet ने याबाबत माहिती दिली आहे. Ynet म्हटले की, संयुक्त अरब अमिराती पहिल्यांदाच युद्धात उडी घेतली आहे. इराणच्या डिसॅलिनेशन प्लांटवर युएईने हवाई हल्ला केला आहे. यामुळे आता इराणला आणखी एका देशाचा सामना करावा लागणार आहे.
इस्रायली न्यूज पोर्टल Ynet ने युएईने इराणवर हल्ला केल्याचा दावा करताना हल्ल्याचे फोटो देखील शेअर केले आहेत. Ynet ने त्यांच्या सूत्रांचा हवाल्याने म्हटले की, UAE च्या हवाई दलाने इराणी डिसॅलिनेशन प्लांटवर हल्ला केला आहे. यामुळे समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार करणाऱ्या या प्रकल्पाचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. आता जर अमिराती प्रदेशावर इराणी हल्ले आणखी वाढले तर आणखी आक्रमकपणे इराणला उत्तर देऊ शकतो. त्यामुळे इराणची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
⚡️ UAE Strikes Iran for the First Time
The Israeli portal Ynet, citing its sources, reports that the UAE Air Force attacked an Iranian desalination plant.
The publication emphasizes that Israel views this strike more as a signal to Tehran.
It is assumed that the UAE may only… pic.twitter.com/LrQ6BPJCkX
— NEXTA (@nexta_tv) March 8, 2026
दरम्यान, 2 मार्चला इराणच्या हल्ल्यात दुबईतील जेबेल अली बंदरगाहला लक्ष्य करण्यात आले. हा हल्ला जगातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन प्लांट्सपैकी एका प्लांटपासून सुमारे 12 मैल अंतरावर झाला होता, ज्यातून दुबईला पिण्याचे पाणी मिळते. तसेच युएईतील फुजैराह F-1 पॉवर अँड वॉटर कॉम्प्लेक्स आणि कुवैतमधील दोहा वेस्ट डिसॅलिनेशन प्लांट जवळही हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर आता युएईने इराणच्या या हल्ल्याला चोख उत्तर दिले आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.