मानवाचे पूर्वज नरभक्षी होते ? आपल्या सहकाऱ्यांचे मांस खायचे ? आठ लाख वर्षे पुरातन गुहांतून काय मिळाले पुरावे?

सध्या स्पेनच्या साडे आठ लाख जुन्या गुहेतील मानवी इतिहासाच्या त्या रहस्यांवर पर्दा उठण्याचे काम सुरु आहे. जेथील रहस्य आज देखील संशोधकांना हैराण करणारे आहे.

मानवाचे पूर्वज नरभक्षी होते ? आपल्या सहकाऱ्यांचे मांस खायचे ? आठ लाख वर्षे पुरातन गुहांतून काय मिळाले पुरावे?
There is evidence of cannibalism in humans
| Updated on: Jul 30, 2026 | 10:41 PM

 

मानवाचे पूर्वज आपल्या बांधवांचे मांस खायचे काय ? ऐकायला हे एखाद्या हॉरर फिल्मचे कथानक वाटू शकेल. परंतू स्पेनमध्ये पुरातत्व खात्याने केलेल्या नवीन संशोधनाने हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. संशोधकांनी ८.५ लाख वर्षे जुन्या एका गुहेत असे मानवी अवशेष मिळाले आहेत ज्यावर कापण्याचे आणि मांस वेगळे करण्याच्या स्पष्ट खूणा आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की हा या बद्दलचा पुरावा आहे की त्या काळात प्राचीन मानव आपल्या समुदायातील लोकांचे मांस खायायचेत.

मिररच्या बातमीनुसार हे संशोधन उत्तर स्पेनच्या बुर्गोस येथील ग्रान डोलीन गुहेत झाले आहे. कॅटलन इंन्स्टीट्यूट ऑफ ह्यूमन पेलियोयकोलॉजी एंड सोशल इवोल्यूशनचे संशोधक येथे अनेक वर्षांपासून खोदकाम करत आहेत.

मानवी हाडे आणि दात मिळाले

अलिकडे झालेल्या खोदकामादरम्यान संशोधकांना सुमारे दोन डझन हाडे आणि दात सापडले आहेत. यात कवटी, माकड हाड, हात आणि पायाच्या हाडांचे तुकडे आणि तीन दातांचा समावेश आहे. हे सर्व अवशेष होमो एंटेसेसर नावाच्या विलुप्त मानवी प्रजातीचे असल्याचे म्हटले जात आहे. ही मानवी प्रजाती सुमारे ७.७ लाख ते १२ लाख वर्षांपूर्वी युरोपात राहात होती.

हाडांवर मिळाले चाव्याचे अवशेष

संशोधकांनी जेव्हा या हाडांची तपासणी केली तर त्यांना दगडाच्या अवजाराने कापणे आणि मांस वेगळे करण्याचे स्पष्ट निशान सापडले आहे. एवढेच नव्हे तर आधी याच गुहेत सापडलेल्या मुलांच्या हाडांवरही अशाच प्रकारच्या खूणा सापडल्या होत्या. आता पहिल्यांदा वयस्क लोकांच्या हाडांवरही हे पुरावे सापडल्याने संशोधकांचे म्हणणे आहे की त्यावेळी नरभक्षण हे केवळ मुलांपर्यंत मर्यादित नव्हते तर मोठ्या लोकांनाही मारुन त्यांचे मांस खाल्ले जात होते.

गुहेत राहायते १३ ते १५ लोक

नव्या संशोधनात हे देखील समजले आहे की त्याकाळात गुहेत केवळ १३ ते १५ लोक रहात होते. आधी संशोधकांना अंदाज कमी लोकांचा होता. संशोधकांचे म्हणणे आहे की या शोधाने त्यांना या काळातील मानवी लोकसंख्या, सामाजिक जीवन आणि राहणीमान याचा आधीपेक्षा चांगल्या प्रकारे समजण्यास मदत मिळणार आहे.

संशोधकांच्या आधीच्या समजांना धक्का

ग्रान डोलीना गुहेत १९९० च्या दशकांपासून सतत खोदकाम सुरु आहे. येथेच पहिल्यांदा होमो एंटेसेसरचे जीवाश्म मिळाले होते. साल २०२५ मध्ये याच गुहेतून एका मुलाच्या मानेचे हाड मिळाले होते. ज्यामुळे संशोधकांच्या आधीच्या समजांना धक्का बसला होता. हा मुलगा केवळ दोन ते चार वर्षांचा होता. त्याचे मान कापलेली होती आणि हाडांवर अशा खूणा होत्या, जसे जनावराचे मांस कापले जाते तशा त्या खूणा होत्या.

शिकार केलेल्या जनावरांप्रमाणे या लहान मुलाशी व्यवहार केल्याचे दिसत असल्याने याची शक्यता आहे त्या मुलाला मारल्यानंतर त्याचे मांस खाल्ले गेले असावे असे या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या पालमिरा सलाडी यांनी म्हटले आहे.

नरभक्षण का करायचे ?

या संशोधनाने याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे की होमो एंटेसेसर आपल्या समुदायातील लोकांचे मांस खायचे. असा प्रकार ते जेवणाच्या कमतरतेमुळे करायचे ? की कोणत्या हिंसक संघर्षाचा हा परिपाक होता की नरभक्षण  हा  त्यांच्या सामाजिक वा सांस्कृतिक परंपरेचा  भाग होता ? या बाबींवरील पडदा मात्र अजूनही उठलेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us