
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाल्यानंतर भारताने थेट बालकोटमध्ये घुसून एअर स्ट्राइक केला होता. पुलवामा हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मदचा हात होता. त्यामुळे त्यांचाच दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट करण्यात आला होता. 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय फायटर जेट्स सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसली होती. आता पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत काय करणार? ही भिती, चिंता पाकिस्तानला आहे. “या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला नकार देतो” असं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले. भारताची Reaction काय, कशी असेल? याची पाकिस्तानला चिंता आहे. म्हणून आपला या दहशतवादी हल्ल्याशी संबंध नाही हे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वास्तवात कधी, कुठून बॉम्ब येऊन पडेल ही भिती त्यांच्या मनात आहे.
एका पाकिस्तानी पत्रकाराने केलेलं हा टि्वट वाचा. पाकिस्तानच टेन्शन, भिती, चलबिचल त्यांच्या मनात असलेली अस्वस्थतता सगळं तुम्हाला कळून येईल. “जर भारताने हे ठरवलं की, हल्ला कोणी केलाय? आणि प्रत्युत्तराची कारवाई आवश्यक आहे, तर कोणी त्यांना रोखू शकतो का?” असं टि्वट पाकिस्तानी पत्रकार साइरल अलमिदा यांनी केलं आहे. भारताची प्रतिक्रिया काय असेल? याचीच चिंता या टि्वटमधून दिसते.
If India decides who did it and the need for retaliation… would anyone be able to stop them?
— cyril almeida (@cyalm) April 22, 2025
Everyone must condemn gun attack against unarmed tourists in #Pehalgam https://t.co/ChbKowsf14
— Hamid Mir حامد میر (@HamidMirPAK) April 22, 2025
पाकिस्तानी वरिष्ठ पत्रकार हामीद मीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रतिक्रिया दिली आहे. निशस्त्र पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याचा प्रत्येकाने निषेध केला पाहिजे असं हमीद मीर यांनी म्हटलं आहे.
एअरबेसवर हालचाली वाढल्या
तिथे पाकिस्तानी एअरबेसवर हालचाली सुद्धा वाढल्या आहेत. सोशल मीडियावर फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार 24 चे अनेक स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. यात पाकिस्तान एअरफोर्सची (PAF) विमानं कराची येथील दक्षिणी बेसवरुन लाहोर आणि रावळपिंडीच्या उत्तरेला असलेल्या एअरबेसच्या दिशेने उड्डाण करताना दिसतायत.