AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणकडे काय आहे जादूची कांडी?, अमेरिकेचे फायटर जेट एका मोगामाग कोसळताहेत…

इराणने २४ तासात अमेरिकन जेट आणि हेलिकॉप्टरना टार्गेट करुन अमेरिकेच्या हवाई ताकदीला आव्हान दिले आहे. इराणकडे असे कोणते तंत्रज्ञान आहे ज्यामुळे अमेरिकेचे जेट फायटर एकामागोमाग कोसळत आहेत.

इराणकडे काय आहे जादूची कांडी?, अमेरिकेचे फायटर जेट एका मोगामाग कोसळताहेत...
mojtaba and trump
| Updated on: Apr 04, 2026 | 4:12 PM
Share

इराणशी अमेरिका आणि इस्रायलच्या सुरु असलेल्या युद्धाला एक महिन्याहून जास्त काळ झाला आहे. अमेरिका सातत्याने दावा करत आहे की इराणचा पराभव झाला आहे. मात्र, गेल्या २४ तासात जे झाले त्याने अमेरिकेचे हे दावे पोकळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ एका दिवसात अमेरिकेचे दोन लढाऊ फायटर नष्ट झाले आहेत. दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर इराणच्या फायरींगच्या टप्प्यात आले आहेत. कुवैतमध्ये एका ड्रोन हल्ल्यात चिनूक हेलिकॉप्टर देखील नष्ट झाल्याचा दावा केला जात आहे. या घटना अमेरिकेसाठी केवळ सैन्य नुकसानच नाहीत अमेरिकेच्या इराण कमजोर झाल्याच्या दाव्यावर देखील प्रश्न चिन्ह निर्माण करीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ मार्च रोजी म्हटले होते की आमची विमाने तेहराणवर उडत आहेत आणि ते ( इराण ) काही करु शकत नाहीत. मात्र, एका आठवड्यात परिस्थिती उलट झाली आहे.

इराणने अखेर कसे काय शक्य केले ?

इराणची एअर डिफेन्स सिस्टीम कमजोर झाली आहे. त्या सिस्टीमने अमेरिकेच्या विमानांना कसे काय टार्गेट केले आहे. याचे उत्तर इराणची ‘असिमेट्रिक वॉरफेअर’ म्हणजे अनपेक्षित आणि वेगळ्या पद्धतीची लढण्याची रणनिती आहे. इराणने थेट टक्कर घेण्याच्या ऐवजी त्याच्या पद्धतीने लढत आहे. ज्याची आशा अमेरिकेने केली नव्हती. इराणने हे सांगितलेले नाही की त्याने कोणत्या पद्धतीने अमेरिकन फायटरना टार्गेट केले. तज्ज्ञांच्या मते इराण मजिद इन्फ्रारेड एअर डिफेन्स सिस्टीम वा खांद्यावर डागता येणाऱ्या मिसाईलचा चमत्कार असावा. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डने शुक्रवारी दावा केला की त्याने अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टीमचा वापर करुन F-15E स्ट्राईक ईगल विमानाला पाडले. त्याच्या काही तासात जेव्हा अमेरिकन हॅलिकॉप्टर पायलटला वाचवयाला पोहचले ते देखील हल्ल्याचे लक्ष्य ठरले. त्याच बरोबर एक A-10 वॉर्थॉग विमान देखील क्रॅश झाल्याची बातमी आली आहे.

मजिद एअर डिफेंस सिस्टम काय आहे ?

मजिद एअर डिफेंस सिस्टम ही खास करुन कमी उंचीवरुन उडणाऱ्या विमानांना टार्गेट करण्यासाठी तयार केली आहे. याची सर्वात खास बाब म्हणजे हे रडारवर अवलंबून रहात नाही. हे इन्फ्रारेड तंत्राने काम करते. म्हणजे विमानाच्या इंजिनाची उष्णता पकडून हल्ला करते. त्यामुळे पायलटला जेव्हा कळते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. वृत्त संस्था एपीला दिलेल्या मुलाखतीत एक संरक्षण तज्ज्ञ बेहनाम बेन तालेब्लू यांनी सांगितले की एअर डिफेन्स कमजोर असू शकते. परंतू संपलेली नाही. त्यामुळे आश्चर्याची गोष्ट म्हणजे इराण आताही प्रत्युत्तर देत आहे.

जमिनीच्या खाली असली खेळ

इराणने आपल्या रणनितीत एक मोठा बदल केला आहे. आता तो स्थिर ठिकाणांऐवजी मोबाईल लाँचर आणि भूमिगत ठिकाणांचा वापर करत आहे. इराणने त्याची मिसाईल सिस्टीम ‘मिसाईल सिटीज’ म्हणजे बोगद्यात आणि गुफेत लपवून ठेवली आहेत. सीएनएनच्या बातमीनुसार अमेरिकेच्या गुप्त अहवालात म्हटले आहे की सातत्याने हल्ल्यानंतरही इराणचे सुमारे अर्धे मिसाईल लाँचर आताही सुरक्षित आहेत. मोबाईल लाँचरची खासियत अशी आहे की ते हल्ला करुन लागलीच त्याची जागा बदलतात. म्हणजे ‘मारो और भागो’ रणनिती वापरतात. याला पकडणे खूपच कठीण आहे.

इराणचा हा विजय आहे ?

ही घटना दर्शवते की इराणचा एअरस्पेस अमेरिकेसाठी संपूर्ण सुरक्षित नाही. तज्ज्ञाचे मत आहे की आता इराणच्या वर एअर सुपिरियरिटी मिळवणे सोपे नाही. खास करुन इराण नवे तंत्रज्ञान, मोबाईल लाँचर आणि लपलेल्या ठिकाणांचा वापर करत आहे. याचा अर्थ नाही की इराण जिंकत आहे. अमेरिका इराणच्या खूपच पुढे आहे.

Follow Us
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या...
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या....
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा.