AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, खामेनेई यांच्या मृतदेहाजवळ सर्वात आधी इराणी पोहोचले नाहीत, तो मृतदेह खेचून बाहेर काढणारे कोण होते?

Iran Israel War : अली खामेनेई यांच्या मृत्यूला 48 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलाय. पण त्यांच्या मृतदेहाचा कोणताही फोटो समोर आलेला नाही. इराणने अजूनपर्यत अधिकृतरित्या या बद्दल काही म्हटलेलं नाही. दोन चर्चा आहेत.

धक्कादायक, खामेनेई यांच्या मृतदेहाजवळ सर्वात आधी इराणी पोहोचले नाहीत, तो मृतदेह खेचून बाहेर काढणारे कोण होते?
ali Khamenei
| Updated on: Mar 02, 2026 | 2:38 PM
Share

सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेईच्या निधनानंतर इराणने त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरु केला आहे. एक प्रश्न निर्माण होतोय, खामेनेई यांचा मृतदेह कुठे आहे? इराणमधून अजूनपर्यंत त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल कुठलीही अपडेट का समोर आलेली नाही? शनिवारी 28 फेब्रुवारीला अमेरिका-इराणच्या हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. खामेनेई त्यांच्या सरकारी निवासस्थानी असताना मारले गेले. खलीज टाईम्सनुसार, खामेनेईंची त्यांच्या निवासस्थानी रिवोल्यूशनरी गार्डचे प्रमुख मोहम्मद पाकपूर आणि सुरक्षा सल्लागार अली शमखानी यांच्यासोबत बैठक चाललेली. त्याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाला. हल्ला इतका भीषण होता की, खामेनेई यांचा जागीच मृत्यू झाला.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, खामेनेई यांचा मृतदेह अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पाहिलाय. खामेनेई यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून खेचून बाहेर काढला. त्यांच्या मृतदेहाचा फोटो काढला. तो फोटो अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना पाठवला. कान मीडियानुसार सुरुवातीला मोसादचे एजेंट्सनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्याचे काही फोटो काढले व मृतदेह तिथेच सोडून निघून गेले. खामेनेई यांच्या मृतदेहाचा फोटो इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सुद्धा पाठवण्यात आला. इराणने अजून पर्यंत अधिकृतरित्या काही सांगितलेलं नाही.

कुठे होणार दफनविधी?

इराणने अजूनपर्यत अधिकृतरित्या या बद्दल काही म्हटलेलं नाही. दोन चर्चा आहेत. एक पहिली चर्चा म्हणजे त्यांचे अंत्यसंस्कार तेहरानमध्ये केले जाऊ शकतात. इराणचे पहिले सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनी यांचे अंत्यसंस्कार सुद्धा तेहरानमध्येच झाले होते. दुसरी चर्चा खामेनेई यांचा दफनविधी त्यांचं होमटाऊन मशहद मध्ये होईल अशी चर्चा आहे. मशहदमध्येच शिया धर्माचे 8 वे इमाम अली इब्न मूसा अल-रजा यांचा दफनविधी झाला होता. इराणमधील हे पवित्र स्थळ मानलं जातं. 2024 मध्ये खामेनेई यांचे निकटवर्तीय इब्राहिम रईसी यांचा सुद्धा दफनविधी याच ठिकाणी झाला होता.

युद्धाच्या समाप्तीनंतर खामेनेई यांच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकतात. हिजबुल्लाह चीफ हसन नसरुल्लाहचा अंत्यविधी सुद्धा त्याच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी केला होता. स्वत: खामेनेई या अंत्यसंस्कारात सहभागी झालेले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...