Brics Summit 2026 : शी जिनपिंग यांनी भारतात येताना आपल्या राईट हँडलाही सोबत आणलय, कोण आहेत काई की ?

Brics Summit 2026 : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले आहेत. ब्रिक्स परिषदेसाठी ते आले आहेत. भारतात येताना जिनपिंग आपल्या राईटहँडला सुद्धा सोबत घेऊन आलेत. कोण आहेत काई की?.

Brics Summit 2026 : शी जिनपिंग यांनी भारतात येताना आपल्या राईट हँडलाही सोबत आणलय, कोण आहेत काई की ?
Brics Summit 2026
| Updated on: Sep 12, 2026 | 3:32 PM

गलवानमधील हिंसक झडपेनंतर चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी आपल्या पूर्ण ताफ्यासह भारतात आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांची चर्चा होणार आहे. ही बैठक दोन्ही देशांसाठी खूप महत्वाची आहे. राष्ट्रपती जिनपिंग पूर्ण तयारीनिशी भारतात आले आहेत. त्यांच्यासोबत 400 सदस्यांचं प्रतिनिधीमंडळही आलं आहे. जिनपिंग आपल्यासोबत चीनचे नंबर दोनचे नेते काई यांनाही सोबत घेऊन आलेत. त्यांना शी जिनपिंग यांचं राईट हँड मानलं जातं. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी जिनपिंग सुद्धा सोबत आले आहेत. चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग सात वर्षानंतर भारतात आले आहेत. मागच्यावेळी नरेंद्र मोदी चीनला गेले होते. त्यानंतर जिनपिंग यांनी ब्रिक्सला येण्याची तयारी केली. गलवान नंतर दोन्ही देशातील संबंध खूप बिघडले होते. पण जिनपिंग यांच्या दौऱ्याने दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.

शी जिनपिंग आणि काई अनेक दशकापासून सोबत आहेत. 1996 साली शी यांना फुजियानाचं सेक्रेटरी बनवण्यात आलेलं. त्यावेळी काई यांना त्यांच्या मदतीसाठी नियुक्त केलेलं. त्यानंतर काई बीजिंगचे महापौर सुद्धा झाले. 2022 मध्ये ते सीपीसी सेक्रेटेरिएटचे फर्स्ट सेक्रेटरी बनले. त्यानंतर 2023 मध्ये जनरल ऑफिसचं निर्देशक बनवण्यात आलं. चीनमध्ये अधिकृतपणे पंतप्रधान ली च्यांग यांना दोन नंबरचा नेता मानलं जातं. पण निर्णयाच्या अनुषंगाने काई खूप महत्वाचे आहेत.

आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये काय घडलय?

भारताचा चीन सोबत फक्त सीमावादच नाहीय, तर गुंतवणूक आणि व्यापारावरूनही वाद आहे. जिनपिंग यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने या वादांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होईल. ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात थेट चर्चा होईल. LAC बद्दलही चर्चा होऊ शकते. शी शेवटचे 2019 साली भारतात आलेले. पण वर्ष 2024 नंतर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांची पीएम मोदींसोबत चर्चा झाली आहे.

मागच्यावर्षी चीनच्या तियांजिनमध्ये शंघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर सम्मेलनात दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झालेली. दोन्ही नेते किर्गिस्तानची राजधानी बिश्केक मध्येही SCO परिषदेत भेटले होते. दोन्ही देशांमध्ये सीमावादासंदर्भात दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. दोन्ही बाजूला शांतता नांदावी आणि परस्परसंबंध सामान्य बनवण्यासाठी अनेक पावलं उचलण्यात आली आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us