Nvidia च्या अंतरिम CEO कोलेट क्रेस कोण आहेत? एका माणसाचे विवाहबाह्य संबंध अख्ख्या अमेरिकेला भारी पडू शकतात, अखेर जेनसन हुआंग यांना हटवलं

जगातील सर्वात मोठी AI चीप मेकिंग कंपनी Nvidia सध्या चर्चेत आहे. या कंपनीच्या CEO ची दोन-दोन अफेअर समोर आली आहेत. यात एक अफेअर थेट राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करु शकतं. त्यामुळे जगभरात या प्रकरणाची चर्चा आहे.

Nvidia च्या अंतरिम CEO कोलेट क्रेस कोण आहेत? एका माणसाचे विवाहबाह्य संबंध अख्ख्या अमेरिकेला भारी पडू शकतात, अखेर जेनसन हुआंग यांना हटवलं
Nvidia Interim CEO
| Updated on: Nov 12, 2026 | 10:37 PM

विवाहबाह्य संबंध, हेरगिरी आणि राष्ट्रीय सुरक्षा या मुद्यांमुळे अखेर जेनसन हुआंग यांना Nvidia च्या CEO पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता त्यांच्या जागी विद्यमान चीफ फायनान्शियल ऑफिसर (CFO) कोलेट क्रेस यांची अंतरिम CEO पदी निवड करण्यात आली आहे. स्थायी CEO ची नेमणूक होईपर्यंत कोलेट क्रेस ही जबाबदारी संभाळतील. जगातील सर्वात मोठी AI चीप मेकिंग कंपनी Nvidia ची जबाबदारी संभाळणाऱ्या कोलेट क्रेस कोण आहेत?. कोलेट क्रेस टेक्नोलॉजी आणि फायनान्स क्षेत्रात दीर्घकाळापासून काम करत आहेत. त्यांनी सप्टेंबर 2013 साली Nvidia मध्ये एग्जीक्यूटिव वाइस प्रेसिडेंट आणि CFO पदाची जबाबदारी संभाळली होती. मागच्या 13 वर्षांपासून त्या कंपनीचा भाग आहेत. त्यांनी Nvidia ला ग्राफिक्स चीप बनवणाऱ्या कंपनीमधून जगातील प्रमुख AI टेक्नोलॉजी कंपनीमध्ये बदलताना पाहिलय.

कोलेट क्रेस यांनी यूनिवर्सिटी ऑफ एरिजोना मधून फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन केलय. त्यानंतर सदर्न मेथोडिस्ट यूनिवर्सिटी मधून MBA ची पदवी घेतली. त्यांच्या करिअरची सुरुआत टेक्सास इंस्ट्रूमेंट्स मधून झाली. तिथे त्यांनी जवळपास आठ वर्ष फायनान्सशी संबंधित वेगवेगळ्या पदांवर काम केलं. त्यानंतर 1997 साली मायक्रोसॉफ्ट जॉईन केली. तिथे त्यांनी जवळपास 13 वर्ष काम केलं. 2006 मध्ये त्यांना मायक्रोसॉफ्ट सर्वर आणि टूल्स डिवीजनचं CFO बनवण्यात आलेलं. चार वर्ष त्यांनी हे पद संभाळलं.

Loading...

फायनान्स मॅनेजमेंटची चांगली समज

2010 साली कोलेट क्रेस यांनी सिस्को जॉइन केलं. त्या बिजनेस टेक्नोलॉजी आणि ऑपरेशंस फायनान्स विभागाच्या सीनियर वाइस प्रेसिडेंट आणि CFO होत्या. जवळपास तीन वर्षानंतर सप्टेंबर 2013 मध्ये त्यांनी Nvidia जॉइंन केली. त्यावेळी Nvidia चे CEO जेनसन हुआंग यांनी त्यांच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त केलेला. क्रेस यांच्याकडे शानदार अनुभव, फायनान्स मॅनेजमेंटची चांगली समज आणि टेक्नोलॉजी इंडस्ट्रीची डिटेल माहिती असल्याचं म्हटलं होतं.

Nvidia च्या सीईओची किती अफेअर समोर आलीत?

Semafor च्या रिपोर्ट नुसार, Nvidia चे काही बोर्डाचे सदस्य नेतृत्व बदलाच्या स्थितीत कोलेट क्रेस यांना अंतरिम CEO बनवण्याच्या मताचे होते. Crypto Briefing मध्ये काही बोर्ड सदस्यांनी समर्थन देण्याच मुद्दा मांडलेला. पूर्व CEO जेनसन हुआंग यांची दोन प्रेम प्रकरण असल्याची माहिती समोर आली आहे. यातील एकाचा संबंध सिंगापूरची डेटा कंपनी मेगास्पीडच्या अधिकारी एलिस हुआंग यांच्याशी आहे. त्या चिनी हेर असल्याचं मीडियामध्ये बोललं जात आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांना त्या चिनी गुप्तचर यंत्रणेच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. सध्या फक्त हा आरोप आणि संशय आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us