Special Story : भारताच्या वाघिणीची डरकाळी… पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फुटला घाम; कोण आहे पेटल गहलोत?
पेटल गहलोत यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 'ऑपरेशन सिंदूर' आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानची पोलखोल करत, बिन लादेनच्या आश्रयावरून त्यांनी पाकिस्तानच्या ढोंगीपणाचा पर्दाफाश केला.

ऑपरेशन सिंदूरमध्ये तोंडावर आपटल्यानंतरही पाकिस्तानची जिरलेली दिसत नाहीये. संयुक्त राष्ट्र संघात पाकिस्तानने पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा उचलला. जगाची सहानुभूती मिळवण्याचा पाकिस्तानने केविलवाणा प्रयत्न केला. पण भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला तोंडघशी पाडलं आहे. भारताने त्याच मंचावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना करारा जवाब दिला आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनची फर्स्ट सेक्रेटरी असलेल्या पेटल गहलोत यांनी शहबाज शरीफ यांची पुरती पोलखोल केली आहे. भारताच्या या कन्येने पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं. ‘फॉर्म 47 सरकार’ आणि लादेनचा शहबाज यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला होता. पेटलने त्याच शब्दात शहबाज शरीफ यांना सर्वांसमोर सुनावले. त्यामुळे भारताच्या या कन्येचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण, पाकिस्तानला थेट जागतिक मंचावर ललकारणारी पेटल गहलोत आहे तरी कोण?
संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनची फर्स्ट सेक्रेटरी पेटल गहलोत यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीने आज पाकिस्तानच्या काही प्रतिनिधींच्या अजब गोष्टी ऐकल्या. ही घटना न्यूयॉर्क शहर आणि 9/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या 25 व्या स्मृती दिनाच्या दोन आठवड्यानंतर घडली आहे. या घटनांचा मास्टरमाइंड ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानी सैन्याच्या प्रमुख अकादमीच्या जवळच राहत होता. त्याच संस्थेबाबत आज पाकिस्तानने मोठा सन्मान दाखवला आहे. खरंतर पाकिस्तानचे लोक ज्याला फॉर्म 47 सरकार म्हणतात, त्यांच्याकडून अशी अपेक्षा केली जाऊ शकते का? असा सवाल पेटल गहलोत यांनी केला.
शरीफ यांना सुनावले
यावेळी पेटल गहलोत यांनी शहबाज शरीफ यांना चांगलंच सुनावलं. ज्यांच्या देशाच्या राजधानीत नागरिकांची धरपकड सुरू आहे. ज्यांच्या राजधानीत घेराबंदी सुरू आहे, अशा सरकारकडून आपण लोकशाही अधिकार आणि मानवी मूल्यांबाबतच्या बकवास गोष्टी ऐकल्या आहेत. मिस्टर प्रेसिडंट असं यासाठी होतंय कारण सरकार सैन्याचं आहे. सैन्या द्वारे चालणार आहे आणि सैन्यासाठीचं आहे. त्यांचे कठपुतळी नेते येतील आणि जातील, पण नेमकं निर्णय कोण घेतंय, हे आपण पाहिलं पाहिजे. त्यामुळे आपण कोणत्याही भ्रमात राहता कामा नये. पाकिस्तानच्या संविधानातील 27 वी दुरुस्ती आणि त्यांच्या शासकाला मिळालेली अजीवन सूट यावरून पाकिस्तानचं वास्तव नेमकं काय आहे, हे स्पष्ट होतंय, असा हल्लाचे पेटल यांनी चढवला.
कोण आहेत पेटल गहलोत?
संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या पंतप्रधानांना खडेबोल सुनावणाऱ्या पेटल गहलोत यांची सध्या चर्चा सुरू आहे. पेटल गहलोत कोण आहेत? अशी चर्चा सुरू आहे. त्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सेक्रेटरी आहेत. त्यांना संगिताची आवडही आहे. गिटार वाजवणे आणि गाणं गाण्याची त्यांनी आवड आहे.
पेटल गहलोत या पॉलिटकल सायन्स, ट्रान्सलेशन आणि आंतरराष्ट्रीय बॅकग्राऊंड असलेल्या राजकारणी आहेत. त्या सध्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनच्या फर्स्ट सचिव म्हणून कार्यरत आहेत.
जुलै 2023मध्ये त्यांच्याकडे ही सूत्रे आली. त्यानंतर सप्टेंबर 2024मध्ये त्या संयुक्त राष्ट्रात सल्लागार बनल्या.
न्यूयॉर्कमध्ये पोस्टिंग होण्यापूर्वी त्यांनी जून 2020 ते जुलै 2023 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयात अवर सचिव म्हणून काम पाहिलं.
पेटल गहलोत यांनी सेंट झेवियर्स कॉलेजातून (2005–2010) पॉलिटिकल सायन्स, सोशिओलॉजी आणि फ्रेंच लिटरेचरमध्ये बीए केलं आहे. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजातून (2010–2012) पॉलिटिकल सायन्समधून पदव्यूत्तर पदवी घेतली आहे.
त्यानंतर त्यांनी यूएसच्या मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून लँग्वेज इंटरप्रिटेशन आणि ट्रान्सलेशनमध्ये मास्टर केलं.
त्या इंडियन फॉरेन सर्व्हिसेजच्या अधिकारी आहेत. 2015मध्ये त्यांनी इंडियन फॉरेन सर्व्हिस ज्वॉइन केली होती.
यापूर्वी त्यांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयात यूरोप वेस्ट डिव्हिजन, पॅरिस आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या भारत मिशनमध्ये अंडर सेक्रेटरी म्हणून काम पाहिलं आहे.
त्यांना संगिताची प्रचंड आवड आहे.
त्यांच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर गिटार वाजवतानाचे त्यांची व्हिडिओ आहेत