
टोकियो – जपानचे माजी पंतप्रधान (Former Japanese Prime Minister)शिंजो आबे ( Shinzo Abe)हे स्टेजवर भाषण करत असताला त्यांच्यावर गोळीबार (shot)करण्यात आला. आबे यांना दोन गोळ्या मारण्यात आल्या. गोळ्या मारल्यानंतर हल्लेखोर जागीच उभा राहिला. त्याने हल्ला केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. आबे यांच्यावर हा हल्ला नारा शहरात निवडणूक प्रचारावेळी करण्यात आला आहे. जगभरातील नेते आबे यांचा सन्मान करीत होते. या हल्ल्यानंतर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करण्यात येते आहे. दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या शिंजो आबे यांचे निधन झाले आहे.
Man who shot at former Japanese PM Shinzo Abe identified
Read @ANI Story | https://t.co/Yc8hp38Iye#ShinzoAbeShot #shinzouabe #Japan #Nara pic.twitter.com/892dL9JNG6
— ANI Digital (@ani_digital) July 8, 2022
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या हल्लेखोराने हा गोळीबार केला त्याचे वय ४२ वर्ष आहे. त्याचे नाव यामागामी तेत्सुया असे सांगण्यात आले आहे. तो माजी सैनिक होता आणि आबे यांची धोरणे त्याला पसंत नव्हती म्हणून त्याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येते आहे. यामागामी याने वापरलेली स्टेनगनही जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण जगात जपानमध्ये बंदुकीच्या वापराबाबत सर्वात कठोर नियम आहेत. त्या ठिकाणी खुलेआम हा प्रकार घडल्याने अनेकांचा आश्चर्य वाटले आहे. आबे यांच्यावर हल्ला करण्यासाठी स्टेनगनचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.
शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान होते. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांची निवड पंतप्रधानपदासाठी करण्यात आली होती. सर्वात कमी वयात पंतप्रधान होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. २०२० साली कोलायटिस या आजारामुळे त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.
Sharing a picture from my most recent meeting with my dear friend, Shinzo Abe in Tokyo. Always passionate about strengthening India-Japan ties, he had just taken over as the Chairman of the Japan-India Association. pic.twitter.com/Mw2nR1bIGz
— Narendra Modi (@narendramodi) July 8, 2022
आपल्या प्रिय मित्रांपैकी एका मित्राचे निधन झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारत आणि जपान यांच्यातील संबंध दृढ होण्यात आबे यांचा मोलाचा वाटा असल्याचेही मोदी म्हणाले आहेत. आबे यांनी नुकतंच जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारल्याचा उल्लेही मोदींनी केला आहे. आबे यांच्या निधनानंतर भारतातही एका दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.