अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसचं दिसणं कुणाला, का खटकतंय?

| Updated on: Jan 11, 2021 | 4:17 PM

एका फोटोत कमला हॅरिस तपकिरी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहेत. | Kamala Harris Vogue Cover photo

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसचं दिसणं कुणाला, का खटकतंय?
Follow us on

न्यूयॉर्क: अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris )यांनी ‘व्होग’ या जगप्रसिद्ध नियतकालिकासाठी केलेले फोटोशूट सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. ‘व्होग’च्या फेब्रुवारी महिन्यातील आवृत्तीच्या कव्हर पेजवर कमला हॅरिस यांचे छायाचित्र झळकणार होते. मात्र, ‘व्होग’ (Vogue Cover ) मासिकाकडून कमला हॅरिस यांचे हे छायाचित्र ट्विट करण्यात आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Why Kamala Harris’s Vogue Cover Has Sparked A Controversy)

यापैकी एका फोटोत कमला हॅरिस तपकिरी रंगाच्या सूटमध्ये दिसत आहेत. त्यांच्यापाठी गुलाबी बॅकग्राऊंड आणि पायात स्निकर्स दिसत आहेत. त्यांची ही वेशभुषा अनेकांना खटकली आहे. कमला हॅरिस चांगल्या दिसू नयेत, यासाठी व्होग नियतकालिकाकडून जाणुनबुजून हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा आता रंगली आहे. कव्हर पेजवरील हे छायाचित्र ‘व्होग’च्या दर्जाला साजेसे नसल्याचे फॅशनविश्वातील जाणकारांचे म्हणणे आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कमला हॅरिस या आकाशी रंगाच्या सूटमध्ये ‘व्होग’च्या कव्हर पेजवर झळकणार असल्याचे निश्चित झाले होते. तसा करारही झाला होता. मात्र, व्होग मासिकाकडून कमला हॅरिस यांच्या टीमला कोणतीही पूर्वकल्पना न देता हे छायाचित्र बदलण्यात आले. त्यामुळे बराच गदारोळ निर्माण झाला.

या सगळ्या वादानंतर अखेर व्होग मासिकाने कमला हॅरिस यांना आकाशी रंगाच्या सूटमधील छायाचित्रही शेअर केले आहे. हे छायाचित्र ‘व्होग’च्या डिजिटल आवृत्तीच्या कव्हर पेजवर असेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र, मासिकाच्या छापील आवृत्तीच्या कव्हर पेजवर तपकिरी सूटमधील छायाचित्रच असेल, असे ‘व्होग’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

‘तिने’ही इतिहास घडवला! जाणून घ्या कोण आहेत कमला हॅरिस?

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा ऐतिहासिक विजय, अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष

(Why Kamala Harris’s Vogue Cover Has Sparked A Controversy)