अमेरिकेत येत्या १५ वर्षांत मुस्लीमांची भाऊगर्दी, ख्रिश्चनांची लोकसंख्या कमी होणार? धक्कादायक अहवाल

Muslim Population In America : अमेरिकेत वाढलेली मुस्लीम संख्या केवळ संख्यात्मक नाही तर एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल ..वाढीचा कल असाच राहीला तर येत्या काही वर्षांत मुसलमान अमेरिकेत धार्मिक आणि सामाजिक चर्चेचे केंद्र बनू शकतात.

अमेरिकेत येत्या १५ वर्षांत मुस्लीमांची भाऊगर्दी, ख्रिश्चनांची लोकसंख्या कमी होणार? धक्कादायक अहवाल
| Updated on: Apr 08, 2025 | 3:07 PM

अमेरिका खरेतर ख्रिश्चनांची संख्या सर्वाधिक आहे. परंतू एका अहवालाने खळबळ उडाली आहे. प्यु रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार येत्या १५ वर्षात अमेरिकेतील मुसलमानांची संख्या ख्रिश्चनांपेक्षा जास्त होणार आहे. अहवालाच्या मते साल २००७ मध्ये अमेरिकेत मुसलमानांची संख्या २.३५ दशलक्ष ( २३ लाख ) होती. जी साल २०१७ मध्ये वाढून ३.४५ दशलक्ष झाली आहे. या लोकसंख्येत बहुतांशी लोक एनआरआय किंवा एनआरआय लोकांची दुसरी पिढीतील आहेत. सध्या ही लोकसंख्या दरवर्षी १००,००० च्या वेगाने वाढत आहे आणि २०५० पर्यंत ही ८.१ दशलक्षापर्यंत ( ८१ लाख ) पोहचण्याची शक्यता आहे. ही वाढ केवळ संख्यात्मक रुपानेच महत्वाची नसून अमेरिकेतील धार्मिक लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा उलटफेर करणारी ठरणार आहे.

प्यु रिसर्च संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेत मुसलमानाची सरासरी आयुष्य अन्य धार्मिक समुहाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे त्यांचे प्रजनन दर जास्त आहे. ज्यामुळे लोकसंख्या वाढण्यास मदत होणार आहे. २०१६ मध्ये अमेरिकेत येणारे मुस्लीम अप्रवाशांची संख्या प्रचंड जास्त विक्रमी होती. अमेरिकेत येणारे एनआरआय मंडळीत मुसलमानांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे लोकसंख्या वाढीचे मु्ख्य कारण ही मुस्लीम संख्या म्हटले जात आहे.

मुस्लीम समुदायाचा भागीदारी

अमेरिकेतील सामाजिक संरचनेत धार्मिक विविधता आणि स्वांतत्र्याला खूप महत्व दिले जाते. यामुळे मुसलमानांना तेथे स्थैर्य आणि प्रगतीची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. २०४० पर्यंत भलेही ख्रिश्चन धर्माचे लोक जास्त असतील परंतू मुस्मील समुहाची सामाजिक आणि राजकीय भागीदारी उल्लेखनीय रुपाने वाढलेली असेल. उदाहरण म्हणून अमेरिकेतील मुस्लीम समुदायातील लोक उच्च शिक्षण आणि व्यापारात अधिक सक्रीय होत आहेत. विविधता असूनही या मुस्लीम लोकसंख्येचा वाढीने इस्मामोफोबिया आणि पूर्वग्रह सारख्या आव्हानांचे त्यांना सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

मुस्लीम जीवनाचा सामाजिक प्रभाव-

अमेरिकेत मुस्लीम समुदाय वाढल्याने अमेरिकन समाजात हिजाब, रमजान, ईद सारख्या सांस्कृतिक तत्वांची स्वीकार्यता आणि दृश्यता वाढणार आहे. बहुतांशी मुसलमान आता शिक्षण,आरोग्य, टेक्नॉलॉजी आणि मीडिया सारख्या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत आहेत, त्यामुळे मुस्लीमांची ओळख ठळक होणार आहे. अमेरिकेत समुदाय आधारीत मस्जिद आणि संस्थानांची संख्या वेगाने वाढत आहे.

मुस्लीम लोकसंख्येचा वेग वाढत आहे

अमेरिकेत वाढलेली मुस्लीम संख्या केवळ संख्यात्मक नाही तर एका मोठ्या सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. हे परिवर्तन अमेरिकेतील धार्मिक विविधता, सांस्कृतिक समावेशकता आणि राजकीय ओळखीला नवा आयाम देणारी ठरणार आहे. ही वाढ अशीच कायम राहीली तर मुसलमान येत्या काही वर्षांत अमेरिकेत धार्मिक आणि सामाजिक चर्चेचे केंद्र ठरणार आहेत.