हल्ले थांबले नाही तर तेहरानला जाळून टाकू, इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी

इराणद्वारा मिसाईल हल्ल्याला उत्तर देताना इस्रायलने तेहरानवर हल्ला केला आहे आणि इशारा दिला आहे इराणने हल्ले सुरुच ठेवले तर आम्ही "तेहरानला जाळून टाकू" अशी धमकी दिली आहे.

हल्ले थांबले नाही तर तेहरानला जाळून टाकू, इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी
| Updated on: Jun 14, 2025 | 9:29 PM

इस्राईल आणि इराणमध्ये तुंबळ युद्ध सुरु आहे. इस्रायलने इराणच्या अण्वस्र कार्यक्रमाला संपवण्यासाठी ड्रोन हल्ले करुन इराणच्या अनेक संशोधक आणि लष्करी अधिकाऱ्यांचा खात्मा केल्यानंतर इराणने शंभरहून अधिक क्षेपणात्र तेल अविववर डागली आहेत. त्यामुळे आता या दोन्ही देशातील युद्ध कोणत्या स्तरापर्यंत जाते याकडे लक्ष लागले आहे.याच दरम्यान इस्रायलचे संरक्षण मंत्री इजरायल काट्ज यांनी इराणला धमकी दिली आहे. जर इराणने हल्ले थांबवले नाही तर तेहरानला आम्ही जाळून टाकू असा इशारा इस्रायलने दिला आहे.

एका उच्च स्तरीय बैठकीत इस्रायल डिफेन्स फोर्सेस ( IDF)चे चीफ ऑफ स्टाफ एयाल जामीर, मोसाद प्रमुख डेव्हीड बारनेआ आणि अन्य सैन्य अधिकारी सामील होते. काट्ज यांनी म्हणाले की इराणी हुकूमशाह स्वत:च्या नागरिकांना बंधक बनवत आहे आणि अशी स्थिती तयार करीत आहे की त्यामुळे विशेष रुपाने तेहरानच्या रहिवाशांना याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

क्षेपणास्रे डागली तर तेहरानला जाळून टाकू

काट्ज इराणी सर्वोच्च नेता अली खामेनेई यांना सावधान करताना सांगितल की, “जर खामेनेई इस्रायली नागरिकांवर मिसाईल डागतच राहीले तर तेहरानला पेटला जाईल. गेल्या रात्रीपासून इराणने इस्रायलवर सुमारे २०० बॅलिस्टीक मिसाईल डागली आहेत. यातील बहुतांशी इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीमने आकाशात नष्ट केली आहेत. परंतू सुमारे २५ टक्के मिसाईल ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार इंटरसेप्ट झाली नाहीत आणि काही खुल्या जागांवर पडली.

काही मिसाईल डिफेन्स सिस्टीमला चकमा देऊन निवासी विभागातच कोसळली. ज्यामुळे तेल अवीव. रमात गन आणि रिशोन लेजिओन सारख्या शहरात जीवित आणि मालमत्ता हानी झाली आहे. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे.तर ७० जण जखमी झाले आहेत. सर्व लष्करी आणि वायूसेनेची ठिकाणे सुरक्षित असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

इराणचे इस्राईलवर 100 ड्रोन हल्ले

इराणने शुक्रवार सोडलेले 100 ड्रोन शिवाय अन्य ड्रोन देखील रात्री डागले. या ड्रोनना इस्रायली वायूसेना आणि नौसेनाने नष्ट केले आहे. दरम्यान IDF प्रमुख एयाल जामीर आणि इजरायली वायुसेना प्रमुख टॉमर बार यांनी म्हटले की तेहरानपर्यंत पोहचण्याचा मार्ग आता साफ आहे. इस्रायली सैन्याने स्पष्ट केले की आता इस्रायली लढावू विमाने तेहराममध्ये ऑपरेशन करु शकतात.

इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीवर हल्ला केला आहे, ज्यामुळे इस्रायली विमानांना तेथे अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे. टोमर बार म्हणाले, “आम्ही एकाच दिवसात शेकडो लक्ष्यांवर हल्ला केला, ज्यामध्ये डझनभर विमानविरोधी प्रणालींचा समावेश आहे.

हे हल्ले आमच्यासाठी धोरणात्मक आणि राष्ट्रीयदृष्ट्या खूप महत्वाचे आहेत.” ते पुढे म्हणाले की युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच, इस्रायली लढाऊ विमाने तेहरानवरून १,५०० किलोमीटर अंतरावरून उड्डाण करू शकली आणि तेथील संरक्षण लक्ष्यांवर हल्ला करू शकली.