सर्व प्रायव्हेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना 2 आणि 3 डिसेंबर रोजी मिळणार पेड सुट्टी, का घेण्यात आला निर्णय?

सर्व प्रायव्हेट सेक्टमधील कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची दोन आणि तीन डिसेंबर रोजी पेड सुट्टी मिळणार आहे, तर सरकारी कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे.

सर्व प्रायव्हेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना 2 आणि 3 डिसेंबर रोजी मिळणार पेड सुट्टी, का घेण्यात आला निर्णय?
Holiday
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 9:07 PM

युनाइटेड अरब अमिरात (UAE) मध्ये काम करणाऱ्या सर्व प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी तेथील सरकारने दोन दिवसांच्या सुट्टीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ही पेड सुट्टी आहे. या सुट्टीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांच्या पगारामधून कोणतेही पैसे कट होणार नाहीयेत. 55 वा यूनियन डे अर्थात ईद अल एतिहाद 2026 च्या निमित्ताने सरकारने देशातील सर्व प्रायव्हेट कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना दोन डिसेंबर गुरुवार आणि तीन डिसेंबर शुक्रवार रोजी सुट्टी जाहीर केली आहे. ही पेड सुट्टी असणार आहे, म्हणजे कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुट्टी मिळणार असून, त्याबदल्यात कोणतेही पैसे कट होणार नाहीयेत. येथील नागरिकांना राष्ट्रीय उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी तेथील सरकारने हा निर्णय घेतला आहे.

युएईच्या मानव संसाधन आणि व्यवस्थापन मंत्रालयाकडून सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ट्विट करून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. मात्रालयाने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार ही सुट्टी देशातील सर्व प्रकारच्या प्रायव्हेट सेक्टरमधील कर्माचाऱ्यांसाठी लागू असणार आहे. या कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली असून, दिनांक दोन डिसेंबर गुरुवार आणि तीन डिसेंबर शुक्रवार रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लोकांना उत्सवात सहभागी होता यावं यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान सरकारी कर्मचार्‍यांना तर तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Loading...

सरकारी कर्मचार्‍यांना तीन दिवसांची सुट्टी

मानव संसाधन आणि व्यवस्थापन मंत्रालयाकडून खासगी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची तर सरकारी कर्मचाऱ्यांना तीन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दोन डिसेंबर ते चार डिसेंबरपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यानंतर लगेच विकेएंड असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांला सलग पाच दिवस सुट्टी मिळणार आहे, थेट सात डिसेंबर रोजी येथील सरकारी ऑफिस पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. सुट्टी जाहीर झाल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र दुसरीकडे सलग आलेल्या या सुट्ट्यांमुळे देशातील जवळपास सर्वच कामकाज या काळात ठप्प राहण्याची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us