इराणमध्ये मृत्यूचं तांडव! कर्मचाऱ्यांनी खच्च भरलेल्या बसचा भीषण अपघात; अनेकांचा मृत्यू, मन हेलावणारे फोटो समोर
Iran bus accident : पश्चिम इराणमध्ये इराकच्या सीमेजवळ बस उलटल्याने 12 जणांचा मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गॅस रिफायनरीमध्ये कामगारांनी घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तब्बल १६ जण गंभीर जखमी आहेत. ही घटना पश्चिम इराणच्या इराकी सीमेजवळ घडली आहे. इराणची सरकारी मीडियासंस्था आयआरएनएने या अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. हा अपघात अब्दनान आणि देहलोरानला जोडणाऱ्या रस्त्यावर घडला आहे. स्थानिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे की, बस जेव्हा उलटली तेव्हा ती गॅस रिफायनीच्या दिशेने जात होती. तिच्यामध्ये कर्मचारीही होते.
दरम्यान, या अपघाताच्या घटनेमध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे पण या आकड्यामध्ये वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने आणखी आकडा वाढू शकतो, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, आप्ताकालीन बचाव पथक हे घटनास्थळी पोहोचले आहे त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे.
बस पलटण्यामागील नेमकं कारण काय याबाबत अद्यापपर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही. पण अपघाताचे कारण शोधण्यासाठी आता अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होतं याकडे लक्ष लागलं आहे.
🔴 İran’ın İlam eyaletinde işçileri taşıyan otobüsün devrilmesi sonucu hayatını kaybedenlerin sayısı 12’ye yükseldi
https://t.co/MN5WD7rtkk https://t.co/ejVAtNkEPU
— Gerçek Gündem (@gercekgundem) November 15, 2026
अब्दनान काऊंटीचे गव्हर्नर बेहजाद नूरमोहम्मदी यांनी शनिवारी रात्री उशिराला माध्यमांशी बोलताना सांगितलं की, जखमींना उपचारासाठी इलम, देहलोरान देझफुल आणि अब्दनाना येथील विविध रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे. ३२ जवांनांचा समावेश असलेली १२ बचाव पथकं सहा रुग्णवाहिकांसह घटनास्थळी पोहोचलेली आहेत.
दरम्यान, इराणमध्ये रस्ते अपघात प्रकरणं गंभीर होत चालली आहेत. असं या घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. रस्ते प्रवासाची सुरक्षितता हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर अनेकदा असे प्राणघातक रस्ते अपघात झाले आहेत. इराणच्या संस्थने प्रसिद्ध केलेल्या काही आकडेवारीनुसार मार्चपर्यंत या देशामध्ये रस्ते अपघातात सुमारे २० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकारी आणि नागरिकांनी या अपघाताच्या घटनेनंतर आता सरकारचा निषेध केला असून घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तपास सुरु आहे. अपघाताचं कारण समोर आल्यानंतर पुढे काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
