अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचे योगदान मोठे, आकडेवारीच पुढे, थेट..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून H-1B व्हिसाबाबत कडक नियम करताना दिसत आहेत. अमेरिका फर्स्ट आपले धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हेच नाही तर त्यांच्याकडून अनेक नियमात बदल करण्यात आली आहेत. त्याचा फटका भारतीय नागरिकांना बसतोय.

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीयांचे योगदान मोठे, आकडेवारीच पुढे, थेट..
Donald Trump H1B
| Updated on: Oct 12, 2026 | 5:45 PM

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेले एक नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत व्हिसाच्या नियमात बदल करत आहेत. अमेरिका फर्स्ट धोरण असून इतर देशांचे कामगार अमेरिकेत येऊन मोठ्या प्रमाणात पैसे कमावत आहेत. यामुळे अमेरिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहे. इतर देशांचे कामगार येऊन अमेरिकेत स्वस्तामध्ये नोकरी वेठबिगारी कामगारांसारखे करत आहेत, त्यामुळे अमेरिकन कामगारांना नोकऱ्या मिळत नाहीत. यासोबतच अनेक कंपन्यांनी अमेरिकन कामगारांना नोकऱ्यांहून काढले आहे. H-1B व्हिसाच्या नियमात अनेक बदल केली जात आहेत. ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी प्रति विद्यार्थी 70000 डॉलर्सचे शुल्क आकारण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित नियमामुळे अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि रोजगाराचे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलू शकते.

विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्याबाबत कठीण निर्णयांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. कारण अमेरिकेने नियम कडक केले आहेत. यासोबतच भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी जाऊन अमेरिकेत नोकऱ्या करतात, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

Loading...

कामगारांच्या प्रणालीतील काही गैरप्रकार झाल्याचे पुरावेही आढळली आहेत. कामगार विभागाच्या महानिरीक्षकांनी केलेल्या तपासामध्ये H-1B व्हिसाशी संबंधित कथित फसवणूक आणि वेतन परत घेण्याच्या प्रकारांची पडताळणी करण्यात आली. न्याय विभागाने एका अशा कंपनीशी संबंधित प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढले, ज्या कंपनीवर H-1B, OPT आणि H-4 कामगारांसाठी जाहीर केलेल्या पदांवरून अमेरिकन कामगारांना अयोग्यरित्या वगळल्याचा आरोप होता.

त्यामुळे आता अमेरिकन प्रशासन याविरोधात कडक भूमिका घेताना दिसत आहे. मात्र, याचा थेट फटका भारतीय लोकांना मोठ्या संख्येने बसताना दिसत आहे. नॅशनल सायन्स फाउंडेशनची आकडेवारी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतासह इतर देशांच्या लोकांचे महत्व अधिक आहे. 2023 मध्ये, अमेरिकेतील अंदाजे 3.6 कोटी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील व्यावसायिकांपैकी 22 टक्के कर्मचारी हे परदेशातील आहेत. या आकडेवारीवरून असेही दिसून येते की, भारतासह इतर देशांच्या कर्मचाऱ्यांचे अमेरिकेत योगदान मोठे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us