सर्वात मोठी बातमी… जिनपिंग यांची तब्येत अचानक बिघडली, भारतातून जाताच विमानतळावरून थेट रुग्णालयात; काय झालं?

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तब्येतीबाबत मोठे दावे समोर आले आहेत. भारतातील ब्रिक्स परिषदेनंतर ते थेट बीजिंगमधील रुग्णालयात दाखल झाल्याचे बोलले जात आहे. परिषदेदरम्यानच त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तातडीने उपचार घ्यावे लागले, असा दावा आहे. मात्र, या दाव्यांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सर्वात मोठी बातमी... जिनपिंग यांची तब्येत अचानक बिघडली, भारतातून जाताच विमानतळावरून थेट रुग्णालयात; काय झालं?
Xi Jinping
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 16, 2026 | 12:20 PM

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या तब्येतीबाबत चिनी लोकशाही पार्टी (CDP)चे चेअरमन जी वानजुन यांनी मोठा दावा केला आहे. वानजुन यांच्या मते, भारतातील ब्रिक्स परिषदेला हजेरी लावल्यानंतर शी जिनपिंग चीनला आले होते. बीजिंग विमानतळावर उतरल्यानंतर जिनपिंग थेट सैन्य हेलिकॉप्टरने बीजिंग 301 रुग्णालयात गेले. रुग्णालयात गेल्यावर जिनपिंग यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत, असा दावा वानजुन यांनी केला आहे.

वानजुन यांनी कथित प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने हा दावा केला आहे. जिनपिंग चीनमध्ये आले. पण बीजिंग विमानतळावर त्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करण्यात आलं नाही. शिवाय विमानतळावर अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित नव्हते. त्यांचं कोणतंही औपचारिक स्वागत करण्यात आलं नाही. हे पहिल्यांदाच घडत होतं, असं वानजुन यांनी म्हटलं आहे. एअरपोर्टवर उतरल्यावर जिनपिंग थेट रुग्णालयात गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रिक्समध्येच तब्येत बिघडली

वानजुन यांनी आणखी एक दावा केला आहे. वानजुन यांच्या मते, ब्रिक्स समिटमध्येच जिनपिंग यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यांच्यासोबत असलेल्या मेडिकल टीमने त्यांना सांभाळले. त्यामुळेच शी जिनपिंग हे भारतातून लवकर निघून आले आणि त्यानंतर त्यांनी थेट रुग्णालय गाठले.

दरम्यान, या दाव्यावर कुणीही पुष्टी केली नाही. जिनपिंग यांना 301 रुग्णालयात भरती करण्यात आले, त्यांच्यावर तातडीचे उपचार करण्यात आले आणि त्यांनी भारताचा दौरा लवकर आटोपला यावर अद्याप चीन सरकारकडून किंवा जिनपिंग यांच्या निकटवर्तीयांकडून कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाहीये. तसेच कोणत्याही विश्वसनीय सूत्रांनीही त्याबाबतची माहिती दिलेली नाहीये.

गाला डिनरमध्ये नव्हते

ब्रिक्स परिषदेच्यावेळी नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्वीपक्षीय बैठक झाली होती. मात्र, मोदींनी आयोजित केलेल्या गाला डिनरमध्ये जिनपिंग सामील झाले नव्हते. जिनपिंग गाला डिनरला का उपस्थित नव्हते? याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिनपिंग यांची तब्येत खरोखरच खराब होती का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. शी जिनपिंग तब्बल सात वर्षानंतर ब्रिक्स समिटमध्ये भाग घेण्यासाठी भारतात आले होते. यापूर्वी ते ऑक्टोबर 2019मध्ये तामिळनाडूच्या महाबलीपूरममध्ये अनौपचारिक शिखऱ संमेलनात भाग घेण्यासाठी आले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us