
सापांविषयी अनेक समज आहेत. तसेच साप चावला तर लगेच काय केलं पाहिजे? किंवा त्याच्यापासून आपला बचाव कसा केला जाऊ शकतो असे बरेच गोष्टींबद्दल ऐकलं असेल, वाचलं असेल. पण जर तुम्हाला सांगितलं की साप हा साप मृत्यूनंतरही चावू शकतो तर, तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की सापाच्या मृत्यूनंतर 3-4 तासांत त्याचे विष प्राणघातक ठरू शकते. अशा घटना घडलेल्या देखील आहेत.
पहिली घटना – कापलेल्या डोक्याचा डंक
शिव सागर जिल्ह्यात, एका माणसाने कोंबड्यांवर हल्ला करणाऱ्या नागाचे डोके कापले. नंतर, जेव्हा त्याने सापाचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा कापलेल्या डोक्याने त्याच्या अंगठ्याला चावा घेतला. अंगठा काळा झाला आणि वेदना खांद्यापर्यंत पसरल्या. त्याला विषविरोधी औषध दिल्यानंतर त्याचा जीव वाचला.अशा घटना घडलेल्या देखील आहेत. त्यामुळे जरी सापाचा मृत्यू झालेला तुम्हाला दिसलं तरी त्याच्याजवळ जाणं किंवा त्याला उचलणं टाळावं.
दुसरी घटना: चिरडला गेल्यावरही नागाने डंक मारला
एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरखाली चिरडून एका नागाचा मृत्यू झाला. पण काही तासांनंतर, जेव्हा शेतकरी ट्रॅक्टरमधून उतरला तेव्हा मृत नागाने त्याच्या पायाला चावा घेतला. सूज आणि उलट्या झाल्यानंतर, त्याच्यावर 25 दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
तिसरी घटना – ब्लॅक क्रेटचा ‘कमबॅक अटॅक’
कामरूप जिल्ह्यात लोकांनी ब्लॅक क्रेट मारून फेकून दिला. तीन तासांनंतर, एका माणसाने उत्सुकतेपोटी त्याला उचललं आणि तेव्हा सापाने त्याच्या बोटाचा चावा घेतला. सुरुवातीला कोणताही परिणाम झाला नाही, परंतु रात्री न्यूरोटॉक्सिनचा परिणाम सुरू झाला. चिंता, वेदना आणि सुन्नपणा वाढला, परंतु उपचारानंतर तो माणूस वाचला.
याबद्दल शास्त्रज्ञ काय म्हणतात?
या घटनांबद्दल युनिव्हर्सल स्नेकबाइट रिसर्च इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, सापाच्या मृत्यूनंतरही त्याच्या विष ग्रंथी काही तास सक्रिय राहते. जर चुकून त्या ग्रंथींवर दबाव आणला गेला तर विष बाहेर येऊ शकते. म्हणजेच त्याचा चावा बसू शकतो. कधीकधी साप चावण्यावर मेंदू नियंत्रण ठेवत नाही, परंतु ते पाठीच्या कण्यातून येणाऱ्या रिफ्लेक्समुळे देखील होऊ शकते. हेच कारण आहे की मृत साप देखील चावू शकतात.
साप मेल्यानंतर किंवा त्याचं डोकं कापल्यानंतरही काही तास साप चावण्याची शक्यता असते. संशोधनानुसार काही साप मृत्यूनंतर 3 तासांपर्यंत चावू शकतात असं संशोधनातून समोर आलं आहे.त्यामुळे सापाला मारलं जरी असेल तरी देखील त्याला हात लावणे किंवा त्याच्याजवळ जाणे शक्यतो टाळावं.
मेलेला साप धोकादायक का असतो?
मृत्यूनंतर, साप त्याच्या विषावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता गमावतो.
जर त्याचे दात त्वचेत रुतले गेले तर संपूर्ण विष एकाच वेळी बाहेर येऊ शकते
एलापिडे आणि व्हायपेरिडे सारख्या विषारी सापांमध्ये हा धोका आणखी जास्त दिसू शकतो