अरे देवा, इतक्या एकटेपणात साधं रडूही शकत नाही! अंतराळात घडतं तरी काय? डोळ्यातून का येत नाही पाणी?

Crying In Space: अंतराळाचं कोणाला आकर्षण नाही. भुईवर ताणून दिलेल्या अनेक लुकलुकत्या डोळ्यांना निभ्रम आकाशातील ताऱ्यांची भुरळ असते. डोळ्याच्या माध्यमातून आपण ताऱ्यांशी जणू संवाद साधतो. पण अंतराळात गेल्यावर त्याच डोळ्यांतून अश्रु बाहेर येत नाही असं जर तुम्हाला सांगितलं तर?

अरे देवा, इतक्या एकटेपणात साधं रडूही शकत नाही! अंतराळात घडतं तरी काय? डोळ्यातून का येत नाही पाणी?
इतक्या एकटेपणात साधं रडूही शकत नाही! अंतराळात घडतं तरी काय?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 16, 2026 | 10:28 PM

Crying In Space: अश्रु बाहेर येणे ही मानवी स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. केवळ मन दुखावले तेव्हाच नाही तर भावनिक हिंदोळा आला तेव्हा. आनंदाच्या झोक्यावर अश्रु नकळत ओघळतात. अश्रु हे जिवंतपणाचे लक्षण समजले जाते. अश्रु हे दुधारी शस्त्रही मानले जाते. स्त्रीया त्याचा बखुबी वापर करतात. त्यांच्या भावनिक विश्वातील अश्रु हा जणू दूत असतो. पण अंतराळात भावना टिकत असल्या तरी अश्रु बाहेर येत नाही. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, स्पेसक्राफ्टमध्ये मायक्रो ग्रॅव्हिटी, शून्य गुरूत्वाकर्षणाच्या वातावरणात अश्रु बाहेर पडत नाही. अश्रु डोळ्यातून झरझर खाली येत नाहीत. तर डोळ्याला चिकटतात आणि पाण्याचा एक गोळा तयार होतो. यामागे भौतिकशास्त्राचा नियम आहे. यामुळे अंतराळवीराच्या डोळ्यातून अश्रु येत नाहीत.

शून्य गुरूत्वाकर्षण असेल तर काय घडतं?

पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणाचा नियम लागू होतो. डोळ्यात घळाघळा अश्रु टपकतात. टियर डक्टस पाणी तयार करते आणि गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली ओघळतात. पण अंतराळात अशी स्थिती नसते. शून्य गुरुत्वाकर्षण असल्याने तिथे अश्रु ओघळून खाली येत नाहीत. अश्रु जसे बाहेर येतात तिथले वातावरण त्याला वरच्या दिशेने फेकते. इतकेच नाही तर पाण्याचे थेंब एकमेकांना ओढतात आणि पाण्याचा एक गोळा तयार होतो. त्याला कोहेजन प्रक्रिया म्हणतात. यामुळे पाण्याचे हे थेंब डोळ्याभवतीच चिकटून राहतात. ते काही केल्या खाली येत नाहीत. पाण्याची धार लागत नाही. तर हे पाण्याचे गोळे डोळ्याभोवती फिरतात. डोळ्यावर चिकटतात.

पाणी वर्तुळाकार का तयार करते?

पृष्ठीय तणामुळे द्रव पदार्थ जास्त पसरत नाही. तो क्षेत्रफळ मर्यादित करतो. सुक्ष्म अथवा शून्य गुरुत्वाकर्षणामुळे डोळ्यातील पाणी गोलाकार आकार तयार करते. यामुळे अंतराळवीरांना अंतराळयानाच्या जवळपास पाण्याचे थेंब हवेत तंरगताना दिसू शकतात. तसेच अश्रुंसोबत होते. अश्रुचे थेंब जवळ येत जोडल्या जातात आणि मोठा थेंब तयार होतो. हा थेंब चेहऱ्यावर चिकटुन राहतो आणि चेहऱ्यावर पसरू शकतो.

कॅनडाचे अंतराळवीर ख्रिस हॅडफिल्ड यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर या घटनेचे अतिशय सुंदर प्रात्यक्षिक करून दाखवले होते. या प्रयोगादरम्यान त्यांनी थेट आपल्या डोळ्यात पाणी टाकले. त्यावेळी पृथ्वीवर ते पाणी खाली जमिनीवर पडले असते. पण हे पाणी अंतराळात त्यांच्या चेहऱ्यावर पसरत पुढे सरकले. अखेरीस पाण्याचा हा थर दुसऱ्या डोळ्यापर्यंत पसरला. डोळ्यावरून पाणी हटत नसल्याने मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. जर हे पाणी आपत्कालीन स्थितीत डोळ्यावर आल्यास स्पष्टपणे समोरील काही दिसत नाही आणि मोठी अडचण येऊ शकते. अर्थात हे पाणी पुसण्यासाठी अंतराळवीर कपडा अथवा इतर वस्तूचा वापर करू शकतात. स्पेस सूट घातल्याने अंतराळवीर त्यांच्या हाताने चेहरा पुसू शकत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us