AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरने मंचावर जोडे काढले, मुख्यमंत्री बघत राहिले… क्रिकेटच्या देवाचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल

Sachin Tendulkar Gesture Win Hearts: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा साधेपणा, नम्रपणा या गुणांनी ओळखल्या जातो. वादापासून दूर राहणारा क्रिकेटमधील हा देव आता अजून एका जुन्या व्हायरल व्हिडिओने नेटजगतात गाजत आहे. त्याच्या एका कृतीने अनेकांची मनं त्यानं जिंकली आहे.

सचिन तेंडुलकरने मंचावर जोडे काढले, मुख्यमंत्री बघत राहिले... क्रिकेटच्या देवाचा तो व्हिडिओ तुफान व्हायरल
सचिन तेंडुलकरImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 16, 2026 | 9:45 PM
Share

सचिन तेंडुलकर हा केवळ क्रिकेटमधील विक्रमांमुळे ओळखल्या जातो असे नाही. तर त्याचा नम्रपणा, मृदुपणाही त्याचे व्यक्तिमत्व उंचावतो. त्याच्या साधेपणाची चर्चा शेजारच्या पाकिस्तानमध्ये सुद्धा होते. हा सदगुण टिकणे, जपणे सोपे नसते. जेव्हा माणूस यशाच्या शिखरावर असतो आणि त्याचे पाय जमिनीवर असतात अशा व्यक्ती दुर्मिळ होत असताना सचिन तेंडुलकर सारखी जिवंत उदाहरणं बरंच काही शिकवून जातात. आंध्रप्रदेशातील एका कार्यक्रमात मास्टर ब्लास्टरची नम्रता पाहून चाहते भारावले आहेत. काय घडलं त्या कार्यक्रमात?

अन् तेंडुलकरने जिंकली लाखो मनं

या वर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस एका कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांचा विनम्रपणा समोर आला. विशाखापट्टणम येथील आंध्र विद्यापीठाच्या शताब्दी सोहळ्याला त्याने हजेरी लावली होती. तो विशेष पाहुणा म्हणून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होता. या कार्यक्रमात त्याचा सत्कार करण्यात आला. त्याचवेळी त्याला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती भेट देण्यात आली.

मूर्ती स्वीकारण्यापूर्वी सचिन तेंडुलकर याने पायातील जोडे काढले आणि आदराने तो नतमस्तक झाला. मूर्ती स्वीकारण्यापूर्वीची त्याची ही कृती अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेली. त्याच्या या कृतीचे उपस्थितींनी जोरदार टाळ्यांनी स्वागत केले. मंचावर उपस्थिती सर्वांनी हिंदू परंपरेनुसार त्याने केलेल्या कृतीचे कौतुक केले. त्यानं अनेकांची मनं जिंकली. आता हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर पुन्हा व्हायरल झाला आहे. सचिनचे सर्वच जण कौतुक करत आहेत.

अनेक विक्रम नावावर

1989 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी पाकिस्तानविरोधात सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. क्रिकेटमध्ये त्याने 24 वर्षांची म्हणजे तब्बल दोन तपांची उमेदवारी गाजवली. क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून त्याने निवृत्ती स्वीकारली. क्रिकेटविश्वातील एक आदरणीय आणि अढळ स्थान त्याने मिळवले. त्याने जगातील महान क्रिकेट खेळाडू म्हणून अमिट छाप सोडली. तेंडुलकराच्या नावावर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम आहे. सचिनचा वाढदिवस 24 एप्रिल रोजी झाला. त्याने नुकताच 53 वा वाढदिवस साजरा केला.

Follow Us