DMart Shopping: डीमार्टमध्ये घरगुती उपयोगी वापराच्या तीन वस्तू कधीच मिळत नाहीत, यामागची बिझनेस स्ट्रॅटेजी काय?

डीमार्टमध्ये बाहेरच्या तुलनेत अगदी कमी किमतीत वस्तू मिळत असल्याने लोकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. आता जर तुम्ही या तीन वस्तू खरेदी करण्याच्या हेतूने डीमार्टला जात असला तर थांबा नाही तर तुमची फेरी वाया जाऊ शकते.

| Updated on: Jul 09, 2026 | 11:03 AM
1 / 6
DMart हे भारतातील लोकप्रिय रिटेल स्टोर आहे. सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. अनेक जण अगदी महिनभराचे सामान देखील डीमार्ट स्टोरमधून खरेदी करतात. DMart स्टोर मध्ये दूध, डाळी, तेल साबण, कपडे चप्पल सर्व वस्तू मिळतात. मात्र, रोजच्या वापरातील अशा तीन वस्तू आहेत जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला डीमार्टमध्ये मिळणार नाही.

DMart हे भारतातील लोकप्रिय रिटेल स्टोर आहे. सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध असल्याने ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. अनेक जण अगदी महिनभराचे सामान देखील डीमार्ट स्टोरमधून खरेदी करतात. DMart स्टोर मध्ये दूध, डाळी, तेल साबण, कपडे चप्पल सर्व वस्तू मिळतात. मात्र, रोजच्या वापरातील अशा तीन वस्तू आहेत जर तुम्ही घ्यायला गेलात तर तुम्हाला डीमार्टमध्ये मिळणार नाही.

2 / 6

डी मार्ट स्टोरचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे सर्व वस्तू स्वत दरात म्हणजेच छापील किंमतीपेक्षा पेक्षा सवलीतीच्या दरात किंवा अनेक अर्ध्या किंमतीत देखील मिळतात. शनिवारी आणि रविवारी तर डिमार्टमध्ये इतकी गर्दी असते की लोकांना पाय ठेवायलाही जागा नसते. अशा ठिकाणी या तीन महत्त्वाच्या वस्तू नाही हे ऐकून आश्चर्य वाटू शकते पण त्यामागे तसं कारणही आहे.

3 / 6

डी मार्टमध्ये साखर, चहा पावडर, तांदूळ, डाळ, तेल, हळद, मीठ यासह सर्व प्रकारचे किराणा सामान मिळते. दूध, दही, पनीर बटर यासारखे अन्न पदार्थ मिळतात. मसाले, बिस्कीट, स्नॅक, चॉकलेट असे खाद्य पदार्थ देखील मिळतात. यासह तेल साबण, शाम्पू, टूथपेस्ट, पावडर सर्व प्रकारचे क्लिनींग सामान मिळते. इतकचं नाही तर कपडे, चप्पल, बॅग यासह किचनमध्ये वापरली जाणारी भांडी यासारख्या वस्तू देखील उपलब्ध आहेत.

4 / 6

मोठ्या इलेक्ट्रॉनीक वस्तू जसे की फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, ओव्हन या वस्तू डी मार्ट स्टोर मध्ये विकल्या जात नाहीत. या वस्तू विकायच्या असल्यास याबद्दल माहिती सांगणारे वेगळे आणि ट्रेन सेल्समन ठेवावे लागतील. तसेच या वस्ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या वस्तूंची होम डिलीव्हरी करण्यासाठी डी मार्ट मार्फत वाहनाची व्यवस्था करावी लागू शकते. यामुळे या वस्तू विकताना कामाचा व्याप वाढू शकतो. यामुळे डी मार्ट स्टोर या वस्तू विकत नाहीत.

5 / 6

DMart स्टोर मध्ये किराणा सामानसह सर्व प्रकारच्या गरजेच्या वस्तू मिळतात पण भाजीपाला, अंडी, मांस जसे की चिकन आणि मोठ्या इलेक्ट्रॉनीक वस्तू विकल्या जात नाहीत. भाजीपाला हा नाशवंत पदार्थ आहे. भाजपीला लगेच खराब होतो यामुळे स्टोर मध्ये भाजीपाला विकायला ठेवल्यावर त्याची फ्रेशनेस टिकवणे शक्य होत नाही. यामुळे भाजीपाला खराब होण्याची शक्यता असतेय. भाजपाला खराब झाल्यास ग्राहकांच्या तक्रारी येऊ शकतात. यामुळे DMart स्टोर मध्ये भाजीपाला विकला जात नाही.

6 / 6

भाजीपाल्यासह अंडी आणि फ्रोजन चिकन देखील DMart स्टोर मध्ये विकले जात नाही. भाजीपाल्या प्रमाणे अंडी आणि फ्रोजन चिकन देखील नाशवंत पदार्थ आहेत. अंडी ग्राहकाच्या हातून फुटल्यास किंवा फ्रोजन चिकन व्यवस्थीत मेन्टेन न केल्यास दुर्गंधी पसरू शकते यामुळे डी मार्ट स्टोर मध्ये या वस्तू देखील विकल्या जात नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us