प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !

स्त्री आणि पुरुष यांच्यावर आधारित एक सर्वेक्षण घेण्यात आले. महिला आणि पुरुष समान असतात. स्त्री आणि पुरुष हे दोघेही उत्तम नेतृत्व करणारे समाजातील घटक आहे,असे अनेकांनी आपले मत मांडले.

प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे..? ,जाणून घेऊया भारतीयांचे विचार !
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 04, 2022 | 3:46 PM

पत्नीला प्रत्येक परिस्थिती मध्ये आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला हवे ? कुटुंबामध्ये कमीत कमी एक मुलगा असणे गरजेचे आहे (A Son in Every Family) ? या सारख्या अनेक प्रश्नांबद्दल तुम्ही नेमके काय विचार करतात जर तुम्ही सुद्धा अन्य लोकांपैकी एक आहेत का जे अशा प्रकारचे विचार करतात..खरेतर एका अमेरिकी थिंक टँक (US Think Tank) द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये थक्क करणारी गोष्ट समोर आलेली आहे. अधिकतर भारतीय (Indians) या गोष्टीबद्दल पूर्णपणे सहमत आहेत किंवा काहीनी वरील विधानांना फक सहमती दर्शवली आहे. अमेरिकी थिंक टँक ने नुकतेच एक सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या अभ्यासातर्गत काही गोष्टी समोर आल्या. प्यू रिसर्च सेंटरचा हा नवीन अहवाल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. अहवालामध्ये अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत. भारतीय घर आणि समाजामध्ये लैंगिक भूमिकाकडे कसे पाहिले जाते. याबद्दल अनेक मतांतरे दिसून आले.

हा रिपोर्ट 29,999 भारतीय तरुण मंडळी वर घेण्यात आलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. हे सर्वेक्षण 2019 च्या शेवटी ते 2020 सुरुवाती पर्यंत करण्यात आले होते. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की,भारतीय मंडळींनी सर्वसाधारण स्वरूपामध्ये मत असे आहे की महिलांना सुद्धा पुरुषांसारखेच समान अधिकार असायला हवे.प्रत्येकी 10 पैकी 8 लोकांचे म्हणणे असे आहे की, प्रत्येक महिलांना पुरुषासारखे अधिकार द्यायला पाहिजेत. काही परिस्थितीमध्ये भारतीयांना वाटत आहे की महिलांना कमी अधिकार मिळायला हवेत व पुरुषांना जास्त अधिकार देण्यात यावे असे सुद्धा अनेकांनी व्यक्त केलेले आहे.

87 % लोकांचे हे आहे म्हणणे…

या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, सर्वसाधारण 80 टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की जेव्हा नोकरी कमी उपलब्ध असतात तेव्हा पुरुषांना महिलांच्या तुलने मध्ये नोकरी करण्याचे अधिकार जास्त मिळायला पाहिजे. या रिपोर्टमध्ये असे सुद्धा मत दिसून आले की 10 पैकी 9 भारतीय(87%) पूर्णपणे एका मताशी सहमत आहेत, ते मत म्हणजे पत्नीला नेहमी आपल्या पतीचे म्हणणे ऐकायला पाहिजे.

महिला सुद्धा हाच विचार करतात परंतु…

रिपोर्ट नुसार प्रत्येक परिस्थितीमध्ये पत्नीला पतीचे म्हणणे ऐकायला पाहिजे. या विचारावर अधिक तर भारतीय महिलांनी सहमती दर्शवली आहे.खरेतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिवंगत माजी विदेश मंत्री सुषमा स्वराज सारख्या राजकारण क्षेत्रात अव्वल ठरलेल्या महिलांचा उल्लेख करत महिलांना व्यापक स्तरावर त्यांचा स्वीकार केला गेला आहे. असे सुद्धा अनेक पुरुषांनी महिलांचे बद्दल मत व्यक्त केले.

स्त्री आणि पुरुष दोघेही चांगले नेतृत्व करणारे असतात..

करण्यात आलेल्या अभ्यासातर्गत अधिकतर पुरुषांनी म्हटले आहे की, स्त्री आणि पुरुष हे दोन्ही समाजातील एक महत्त्वाचे घटक आहे. या दोघींच्या अंगी समाजाचे उत्तम नेतृत्व करण्याचे गुणधर्म असतात. अनेक भारतीयांचे असे ही म्हणणे आहे की स्त्री व पुरुष यांनी आपापल्या क्षमतेनुसार व आवश्यकतेनुसार कौटुंबिक जबाबदारी सुद्धा वाटून घ्यायला हवी त्याचबरोबर काहींच्या मते आज सुद्धा लैंगिक भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे तो अद्याप बसलेला नाहीये.

कुटुंबामध्ये एक मुलगा आणि मुलगी आवश्यक

जेव्हा मुलांबद्दल बोलले जाते तेव्हा अनेक भारतीयांनी आपले मत मांडले आहे.त्यांच्या मते कुटुंबांमध्ये कमीत कमी एक मुलगा(94%) आणि एक मुलगी (90%) असायला पाहिजे. अधिक तर भारतीयांचे म्हणणे आहे की, आई वडील यांची महत्त्वाची जबाबदारी प्राथमिक स्वरूपामध्ये मुलांची असली पाहिजे.

मुस्लिम (74 टक्के), जैन (67 टक्के)आणि हिंदू (63 टक्के )लोकांचे मत आहे की, आई-वडिलांच्या अंतिम संस्काराची प्राथमिक जबाबदारी मुलांची असली पाहिजे त्याचबरोबर (29 टक्के)शीख, (44 टक्के) ख्रिचन आणि (46 टक्के) बौद्ध धर्मावलंबी आपल्या अधिक तर इच्छा मुलाकडूनच पूर्ण करून घेण्याचा त्यांचा मानस असतो. आई-वडिलांच्या अंतिम संस्कार जबाबदारी मुलगा आणि मुलगी या दोघांनी उचलली पाहिजे.

इतर बातम्या: 

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांवर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई नको, हायकोर्टाकडून फोन टॅपिंग प्रकरणी दिलासा

पाकिस्तानमधील मशीदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, स्फोटामागे हात कुणाचा?