AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: इराणची अमेरिकेला टशन, तेलाचा महासाठा, एक लिटर पेट्रोलचा भाव तरी काय आता?

One liter Petrol Price in Iran: इराण या चिमुकल्या देशाशी पंगा घेणे अमेरिकेला जड जात आहे. गेल्या सव्वा महिन्यापासून हा देश वरिष्ठ नेते ठार झाल्यावरही टफ फाईट देत आहे. इराणने अमेरिकेला झुंजवले आहे. तेलाचा महासाठा असलेल्या या देशात सध्या एक लिटर पेट्रोलची काय आहे किंमत?

GK: इराणची अमेरिकेला टशन, तेलाचा महासाठा, एक लिटर पेट्रोलचा भाव तरी काय आता?
इराण युद्ध, इराणमध्ये पेट्रोल-डिझेलचा भाव काय
| Updated on: Apr 04, 2026 | 3:43 PM
Share

One liter Petrol Price in Iran: अमेरिका आता इराणवर युद्ध संपवण्यासाठी दबाव आणत आहे. पण या चिमुकल्या देशाने अमेररिकेला कडवी झुंज दिली आहे. वरिष्ठ नेते ठार झाल्यावरही हा देश युद्धभूमीतून मागे हटलेला नाही. अमेरिकेला निकराचा लढा देत आहे. तेलाचे महाकाय साठे असलेल्या या देशात पेट्रोल आणि डिझेलची किंमत काय असेल याची उत्सुकता जगातील सर्वांनाच आहे. जगभरात इराण युद्धाने ऊर्जेचे मोठे संकट उभे ठाकले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती उसळल्या आहेत. भारताच्या शेजारील पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळ यासारख्या देशात इंधनाची स्थिती बिकट आहे. भारतही या संकटाशी दोन हात करत आहे. पण इराणमध्ये काय आहेत तेलाच्या किंमती?

पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेल महागले

स्थानिक वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत भरीव वाढ झाली आहे. या देशात डिझेलची किंमत जवळपास 54.9 टक्क्यांनी भडकली आहे. सध्या या देशात एक लिटर डिझेल 520.35 रुपयांना मिळत आहे. तर पाकिस्तानमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 458.40 पाकिस्तानी रुपये आहे. पेट्रोलच्या किंमतीत 42.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर वाहतुकीचा खर्च वाढल्याने महागाई भडकली आहे. सर्वसामान्य नागरिकाला मोठा फटका बसला आहे.

हाँगकाँगमध्ये सर्वात महाग पेट्रोल-डिझेल

जगात सर्वात महागडे इंधन हे हाँगकाँगमध्ये मिळत आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत जवळपास 4.1 डॉलर इतकी आहे. हा जगातील सर्वात महाग पेट्रोल भाव आहे. विशेष म्हणजे हाँगकाँगला 80 टक्के इंधनाचा पुरवठा आता चीन करत आहे. तो चीनचाच एक भाग झाला आहे. त्यामुळे अनेक लोक स्वस्त पेट्रोलसाठी चीनमध्ये जातात. पण हाँगकाँगमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर होतो.

इराणमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल -डिझेल

इराण या देशात इंधनाचा मोठा साठा आहे. अनेक मोठ्या विहिरी आहेत. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 2.86 डॉलर इतकी आहे. त्यानंतर स्वस्त पेट्रोल नेदरलँड (2.74 डॉलर), डेन्मार्क (2.66 डॉलर), सिंगापूर ( 2.55 डॉलर), जर्मनी ( 2.42 डॉलर) असा क्रमांक लागतो. अल्बेनिया, ग्रीस आणि नॉर्वेमध्ये पण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भडकल्या आहेत. भारतात यापूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 100 रुपयांच्या घरात पोहचल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून त्यात कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. जागतिक बाजारात कच्चे तेल भडकल्यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्याने संभाव्य पेट्रोल-डिझेल वाढ होण्याची शक्यता मावळली आहे.

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?