या देशात वाहन चालकाची स्थिती पाहून वाहतूक पोलीस दंड आकारतात, कशी ठरते रक्कम? जाणून घ्या

वाहतूक पोलीस चुका करणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्यासाठी कायम सज्ज असतात. अनेकदा तर सिग्नलच्या पाठीपुढे दडी मारून असतात. त्यामुळे वाहतूक नियम मोडण्याची चालकांची हिम्मत होत नाही. कारण दंडाची रक्कम ऐकून पायाखालची वाळू सरकते. पण एका देशात दंड वसुलीची पद्धत काहीशी वेगळी आहे.

या देशात वाहन चालकाची स्थिती पाहून वाहतूक पोलीस दंड आकारतात, कशी ठरते रक्कम? जाणून घ्या
या देशात वाहन चालकाची स्थिती पाहून वाहतूक पोलीस दंड आकारतात, कशी ठरते रक्कम? जाणून घ्या
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 02, 2025 | 7:59 PM

भारतात गेल्या काही वर्षात वाहतुकीचे नियम अधिक कठोर झाले आहेत. पण असं असलं तरी चिरिमिरीचं प्रकरणं अधिक आहेत. त्यामुळे श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती असाल तर सुटण्याची शक्यता अधिक असते. पण जगात असं सर्वत्र नाही. एका देशाबाबत चित्र काही वेगळं आहे. येथे तुम्ही जितके श्रीमंत तितका जास्तीचा दंड भरावा लागतो. युरोपच्या फिनलँडमध्ये वाहतूक नियम मोडल्यानंतर दंड आकारण्याची वेगळी पद्धत आहे. येथे वाहतूक चलन किंवा दंडाची रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर ठरवली जाते. फिनलँडमध्येच नाही तर युरोपातील इतर काही देशातही अशीच पद्धत आहे. पण फिनलँडने अशी पद्धत पहिल्यांदा सुरु केली. 1920 मध्ये उत्पन्नावर आधारित दंड लागू करणारा फिनलँड हा पहिला देश ठरला. त्यानंतर स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या युरोपियन देशांनी ही पद्धत अवलंबली.

फिनलँडच्या फिनिश भाषेत या दंडाच्या पद्धतीला पॅवासक्को असं संबोधलं जातं. म्हणजेच एका दिवसाचा दंड असा अर्थन निघतो. कारण हा दंड त्या व्यक्तीच्या दिवसाच्या उत्पन्नावर आधारित असतो. इतकंच तर इतर गोष्टीही तपासल्या जातात. गुन्ह्याची गंभीरता आणि गुन्हा करणाऱ्याची दिवसाची कमाई यावर कॅलक्युलेशन केलं जातं. फिनलँडमध्ये ही पद्धत गेल्या 100 हून अधिक वर्षे सुरु आहे. या दंडाच्या पद्धतीमुळे श्रीमंत असो की गरीब पण दंडाचा प्रभाव तितकाच प्रभावी ठरतो. यामुळे सरकारच्या तिजोरीत पैसा येतो. तसेच रस्ते अपघाताची संख्याही कमी होते.फिनलँडमध्ये प्रति लाख व्यक्तींचया मागे 3.8 अपघात होता. जागतिक सरासरीच्या 17.4 पेक्षा कमी आहे. फिनलँड हा जगातील सर्वात कमी अपघात होणाऱ्या देशापैकी एक आहे.

त्या व्यक्तीचं उत्पन्न कसं कळतं?

एखाद्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम मोडले तर अधिकारी डिजिटल माध्यमातून त्या व्यक्तीचं सध्याचं उत्पन्न आणि संपत्ती याची माहिती मिळवतात. त्यानंतर दंडाची रक्कम ठरवातत. दिवसाचं उत्पन्न हे कर कापल्यानंतर मासिक मिळकतीच्या 1/60वा भाग मानली जाते. जर कोणाकडून 20 दिवसांचा दंड मिळाला तर त्याचं दिवसाचं उत्पन्न 100 युरो मानलं जातं. त्याला एकूण 2000 युरो दंड द्यावा लागेल. या पद्धतीचा सर्वात जास्त मुजोरी करणाऱ्या धनदांडग्यांवर प्रभाव टाकतो. त्यामुळे कायदे समान असल्याचं अनुभूती येते. दोन वर्षांपूर्वी 76 वर्षीय फिनिश कोट्यधीस अँडर्स विकलॉफ यांना जास्त वेगाने गाडी चालवल्याबद्दल 1,21,000 युरो (सुमारे ₹1.1 कोटी) दंड ठोठावण्यात आला होता.