साप ठराविक कालावधीनंतर कात का टाकतात? किती महिने न खाता जगू शकतात? जाणून घ्या कारण
Snake Molting process : सापाचं विश्व वेगळं असलं तरी त्याबाबत कायमच माणसाला कुतुहूल राहिलं आहे. हिंदू धर्मात सापांबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. तसेच त्याला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सापाबाबत अनेक कथा, भाकडकथा आणि अंधश्रद्धा आहेत. असं असताना साप कात का टाकत असावेत असा प्रश्न पडतो. चला जाणून घेऊयात त्याबाबत

हिंदू धर्म आणि साप याबाबत वेगळंच नातं आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. भगवान विष्णू शेष नागावार शयन अवस्थेत असतात, तर महादेवांच्या गळ्यात वासुकी नाग आहे, इतकं ते धार्मिक आहे. सापांचा देश म्हणून अनेक जण उल्लेख करतात. जगभरात सापाच्या 3000 हून अधिक जाती आहेत. यापैकी फक्त 20 ते 25 टक्के साप विषारी आहेत. भारतात कोब्रा, क्रेट, रसेल वायपर, सॉ स्केल्ड वायपर यासारख्या विषारी जाती आहेत. त्यात सापांच्या या विश्वाबाबत कायमच आकर्षण राहिलं आहे. मग चित्रपट, मालिका, कथा आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्याचं आकर्षण वाढतं. अनेक लोककथा या सापाच्या अवतीभोवती फिरतात. त्यामुळे या सापाच्या विश्वाबाबत अनेक प्रश्न पडतात. साप कात का टाकतात? साप काहीच न खाता किती महिने राहू शकतात? वगैरे वगैरे प्रश्न पडतात. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील तर त्याची उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे काही अंशी तुमच्या शंकांचं निरसन होईल. ...
